विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 19 August 2021

" परनारी सहोदर: " अर्थातच 👇👇👇 परस्त्रीला मातेसमान मानणारे साळुंखे राजे


 

" परनारी सहोदर: " अर्थातच
👇👇👇
परस्त्रीला मातेसमान मानणारे साळुंखे राजे
----------------------
----------------------
सतीशकुमार सोळंके देशमुख,
............✍️
सार्वभौम चक्रवर्ती सम्राट दख्खनाधिपथेश्वर राजे साळुंखे चाळुक्य राजे हे "परनारी सहोदर:" अर्थात परस्त्रीला माते समान मानणारे राजे होते, हे त्यांच्या अभिलेखांना अभ्यासल्यानंतर लक्षात येते. साळुंखे राजे हे परस्त्रीला माते समान मानणारे राजे होते, याविषयीच्या त्यांच्या अभिलेखीय नोंदी आणि त्यावरील मुद्द्यांचे सविस्तर विश्लेषण या लेखामध्ये करण्यात आलेले आहे.
राजे साळुंखे चाळुक्यांच्या अभिलेखातील नोंदी येणेप्रमाणे आहेत.
--------
श्लोक :
--------
पुष्पिता पतिता कन्या लिंगिता श्रेष्ठजातिजा।
परस्त्री विधवा श्वश्रृ स्वसा च दुहिता तथा॥
गुरुब्राह्मणपन्त्यश्च पुत्रमित्रनृपस्त्रिय:।
पन्त्यश्च भृत्यबंधूना मगम्या परिकीर्तिता:॥
-------------
राजे साळुंखे चाळुक्यांच्या मतानुसार प्रत्येक व्यक्तीसाठी आपली धर्मपत्नीच गमन करण्यासाठी योग्य असून इतर स्त्री बरोबर गमन करणे पापमुलक, आयुष्याला कमी करणारे आणि परलोकासाठी भयावह आहे. म्हणून मनुष्याने परस्त्री गमनाला त्यागले पाहिजे, हे मत साळुंखे राजांनी व्यक्त केले आहे. राजे साळुंखे चाळुक्यांनी त्यांच्या अभिलेखातून याबद्दल विस्तृत वर्णन केले असून गमनासाठी योग्य नसलेल्या स्त्रियांची त्यांनी एक मोठी सूचिच आपल्या अभिलेखातून दिली आहे. ज्यात गमन करण्यासाठी अयोग्य असलेल्या समाजातील स्त्रियांचा उल्लेख आहे.
राजे साळुंखे चाळुक्यांनी त्यांच्या अभिलेखातून 'अमैथुनादी नारी' अर्थात अशा स्त्रीया, ज्यांच्यासोबत कोणत्याही व्यक्तीने गमन करू नये. हे सांगून त्यांनी केवळ आपली धर्मपत्नीच गमन करण्यासाठी योग्य असल्याचे म्हटले आहे.
सार्वभौम चक्रवर्ती सम्राट दख्खनाधिपथेश्वर राजे साळुंखे चाळुक्य राजे हे "परनारी सहोदर:" अर्थात परस्त्रीला माते समान मानणारे राजे होते, हे त्यांच्या वरील अभिलेखिय नोंदींना अभ्यासल्यानंतर लक्षात येते. विशेष म्हणजे, चाळुक्यांच्या परस्त्री मातेसमान या धोरणावर अधिक प्रकाश टाकणाऱ्या आशयाचा शिलालेख सुद्धा नुकताच मिरज इतिहास संशोधन मंडळाने शोधून काढला आहे. हा शिलालेख दानलेख स्वरूपातील असला तरी राजे साळुंखे चाळुक्यांच्या राजवटीतील तिसरा सोमेश्वर अर्थात भूलोकमल्ल साळुंखे राजाचा मांडलिक असलेल्या बिज्जल कलचुरी याचा आहे. बिज्जल कलचुरी हा भूलोकमल्ल चाळुक्य राजाचा भाचा असून षष्ठ विक्रमादित्य साळुंखे राजाच्या मुलीचा मुलगा म्हणजेच त्याचा नातू आहे.
मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्रा. गौतम काटकर व मानसिंग कुमठेकर यांनी राजे साळुंखे चाळुक्य नरेश भूलोकमल्ल अर्थात तिसरा सोमेश्वर याचा भाचा आणि मांडलिक असलेल्या बिज्जल कलचुरी याचा जत तालुक्यातील बालगाव येथील नुकताच उजेडात आणलेला दानलेख स्वरूपातील शिलालेख चाळुक्यांच्या "परनारी सहोदर:" या धोरणाची अजूनच पुष्टी करणारा ठरतो. बिज्जल कलचुरी हा सार्वभौम चक्रवर्ती सम्राट दख्खनाधिपथेश्वर उत्तरकालीन कल्याण साळुंखे चाळुक्य नरेश षष्ठ विक्रमादित्य व त्याच्या चंदलादेवी राणीच्या मुलीचा मुलगा असून जत तालुक्यातील बालगाव येथे सापडलेल्या दानलेखातील दान त्याने इ.सन ११३७ मध्ये दिलेले आहे. यावरून राजे साळुंखे चाळुक्य राजवंशातील राजांमध्ये परस्त्री मातेसमान मानण्याचे ब्रीद कटाक्षाने पाळले जात होते हेच वरील अभिलेखिय नोंदीवरून लक्षात येते.
याबद्दल साळुंखे राजांच्या जीवनातील एखादे उदाहरण द्यायचे झाल्यास ते सार्वभौम चक्रवर्ती सम्राट दख्खनाधिपथेश्वर कल्याण नरेश षष्ठ विक्रमादित्य साळुंखे चाळुक्य याचे देता येईल. विक्रमादित्य साळुंखे राजाला सात राण्या होत्या. यातील सहा राण्या त्याने राजघराण्यातून वरलेल्या होत्या. असे असताना या राजाला एका सामान्य गावकामगाराची मुलगी आवडली, मात्र त्याने तिच्यासोबत व्याभिचार न करता लग्न करून तिला पत्नीचा दर्जा दिला, पण तिच्यासोबत व्यभिचार केला नाही. संपूर्ण दक्षिण भारत ज्याच्या साम्राज्यात होता, ज्याचे साम्राज्य तिन्ही समुद्रापर्यंत विस्तारलेले होते, असा सार्वभौम चक्रवर्ती सम्राट असणारा राजा त्या आवडलेल्या गावकामगाराच्या मुलीसोबत व्यभिचारही करू शकला असता? मात्र त्याने असे न करता अगोदर तिला पत्नीचा दर्जा दिला आणि त्यानंतरच तिच्यासोबत गमन केले. सामान्य गाव कामगाराची ही मुलगी विक्रमादित्य राजाची सातवी राणी होती. या घटनेवरून साळुंखे चाळुक्य राजे हे परस्त्री गमनाला विरोध करणारे राजे होते हेच यातून लक्षात येते. साळुंखे राजांच्या अभिलेखिय नोंदींना अभ्यासल्यानंतर आणि खुद्द त्यांच्या स्वत:तील वरील उदाहरणावरून याची खात्रीच होते.
राजे साळुंखे चाळुक्यांनी गमन करण्यासाठी अयोग्य स्त्रियांची मोठी सूची आपल्या अभिलेखातून दिली असून ज्या स्त्रियांसोबत राजाच काय, पण राज्यातील कोण्याही पुरुषाला सुद्धा त्या गमन करण्यासाठी अयोग्य आहेत. असे सांगून गमन करण्यासाठी स्वतःची पत्नीच योग्य असल्याचे साळुंखे राजांनी म्हटले आहे. गमन करण्यास अयोग्य स्त्रियांमध्ये पुष्पिता (ज्यांचा मासिक धर्म आरंभ झाला), पतीता (जी पतित आहे), कन्या (अविवाहित मुलगी), लिंगिता (संन्यासिनी), श्रेष्ठजातीजा (श्रेष्ठ कुळात उत्पन्न झालेली स्त्री), परस्त्री (लग्नाची बायको सोडून), विधवा, सासू, बहिण, मुलगी, गुरू किंवा ब्राह्मण पत्नी, मुलगा-मित्र-राजाची स्त्री, भाऊ-बंधूजनांची स्त्री वगैरे वगैरे स्त्रियांसोबत गमन करणे कोण्याही पुरुषासाठी अनायुत्य करण्यासारखे किंवा परलोकात भय, पीडा देणारे आहे असे साळुंखे चाळुक्य राजांचे मत होते.
राजे साळुंखे चाळुक्यांचे अभिलेख अभ्यासल्यानंतर हे राजे "परनारी सहोदर:" अर्थात परस्त्रीला मानाची वागणूक देणारे म्हणजेच तिला मातेसमान मानणाऱ्यापैकी होते हेच लक्षात येते.
( अपूर्ण )
------------
मार्गदर्शक :
------------
प्रोफेसर डॉ. नीरज साळुंखे,
असोसिएट प्रोफेसर,
पी.एचडी गाईड,
------------
@
सतीशकुमार सोळंके-देशमुख,
👉मुख्य आयुर्विमा सल्लागार LIC,
👉ऑल इंडिया चेअरमन्स क्लब मेंबर
👉एम.डी.आर.टी. यू.एस.ए.
👉"अग्निवंश",
सिद्धीविनायक कॉलोनी गेवराई,
ता. गेवराई, जि. बीड.
९४ २२२ ४१ ३३९,
९९ २२२ ४१ ३३९.

No comments:

Post a Comment

क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10

  क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10 औरंगजेबाचा बिदरला वेढा: २८ फेब्रुवारीला औरंगजेब बिदरच्या परिसरात पोहोचला आणि त्याने २ मार्चला बिदरच्या किल्ल्या...