विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 19 August 2021

राजे साळुंखे चाळुक्याच्या निर्मितीतील मंदिर 👇👇👇 बनले मुस्लिमांच्या डोली बसवण्याचे स्थळ!

 


राजे साळुंखे चाळुक्याच्या निर्मितीतील मंदिर
👇👇👇
बनले मुस्लिमांच्या डोली बसवण्याचे स्थळ!
------------------------
------------------------
सतीशकुमार सोळंके देशमुख,
................✍️
@
सार्वभौम चक्रवर्ती सम्राट दख्खनाधिपथेश्वर राजे साळुंखे चाळुक्यांच्या शैलीतील निर्मित करमाळा येथील ब्रह्मा-विष्णू-महेश यांच्या मंदिराची वास्तु आज मुस्लिमांच्या ताब्यात दिसते. येथे मुस्लिमांचे दहा दिवसाचे डोली बसवण्याचे उत्सव पार पाडले जातात. यामध्ये सरतेशेवटी मिरवणूक काढून मुहम्मद पैगंबर यांच्या जावयांच्या मुलांच्या हत्तेचा शोक व्यक्त केला जातो. ही वास्तू मुस्लिमांच्या ताब्यात असल्यामुळे हिंदू मंदिराची वास्तू असूनही या वास्तूवर कोणत्याही हिंदू कडून लावा केला जात नाही हे विशेष आहे!
करमाळा किल्ल्याला अगदीच चिकटून असलेली ही वास्तू उत्तरकालीन कल्याणच्या राजे साळुंखे चाळुक्य राजांनी अकराव्या बाराव्या शतकात निर्मिलेली वास्तू आहे. ही वास्तू ब्रह्मा -विष्णू -महेश यांचे मंदिर आहे. मात्र आज या मंदिराचा फक्त नवरंग मंडप (सभा मंडप) शाबूत असून, बाकी मंदिर नंतरच्या मुस्लिम सत्तेच्या काळात जमीनदोस्त केल्याचे लक्षात येते. सभामंडपात (नवरंग मंडप) आजही राजे साळुंखे चाळुक्यांनी कोरलेल्या अनेक खुणा पाहावयास मिळतात. खांबावरिल कोरलेली अनेक शिल्पे नंतरच्या काळात घासून नष्ट केलेली दिसून येतात. याचे कारण म्हणजे ही वास्तू हिंदूधर्मीय असल्याचे लक्षात येऊ नये हा असावा, किंवा हिंदूधर्मीय वास्तूची तोडफोड हा उद्देश असावा!
मंदिरातील देवकोष्टके (देवड्या), खांबावरिल नाग शिल्पे, रांगोळी शिल्पे, सभागृहाचे नवरंग मंडपातील विभाजन (नऊ खण), मंदिराच्या दक्षिणी बाजूला असलेला भव्य आणि अतिशय देखण्या पद्धतीने बांधलेला पण नंतरच्या काळातील जिर्णोध्दारीत पुष्करणी बारव आदी बाबी आजही जणूकाही राजे साळुंखे चाळुक्यांच्या वास्तु निर्माण शैलींचीच साक्ष देत दिमाखात उभ्या आहेत. मंदिर गर्भगृहाच्या दरवाजाला नंतरच्या काळात मुस्लिम शासकांनी मोठी शिळा बसवून त्या मागील देवाचे गर्भगृह नष्ट केले आहे. मंदिराच्या पाठीमागून पाहिल्यास या गोष्टी जाणवल्या शिवाय राहात नाहीत.
सध्यातरी मुस्लिमांच्या अधिपत्याखाली असलेल्या या पुरातन ब्रह्मा -विष्णू -महेश यांच्या मंदिरा शेजारी महादेव आणि विष्णू यांची अजून वेगळीच दोन मंदिरे आहेत. मात्र त्यांचा काळ हा पुरातन नसून आधुनिक म्हणजे पंधराव्या सोळाव्या शतकानंतरचा वाटतो. राजे साळुंखे चाळुक्यांच्या स्थापत्य शैलीतील ब्रह्मा -विष्णू -महेश यांच्या मंदिराचे सभागृह पाहिल्यानंतर चिकटून समोर असलेल्या किल्ल्याकडे कटाक्ष टाकल्यानंतर करमाळा येथील भुईकोट किल्ल्याचे मूळ निर्माण अकराव्या बाराव्या शतकातील केलेले असल्याचे लक्षात येते. त्यानंतरच्या काळात गरजेनुसार किल्ल्याचे जीर्णोद्धार झालेले आहेत.
राजे साळुंखे चाळुक्य निर्मित करमाळा येथील ब्रह्मा विष्णू महेश यांचे हे मंदिर आज करमाळा येथील मुस्लिमांच्याच ताब्यात असल्यासारखेच आहे. या ठिकाणी हिंदू धर्मियांकडून कोणतेही कार्यक्रम आयोजित केले जात नाहीत, मात्र मंदिरात मुस्लिमांकडून दहा दिवस डोली बसवण्यात येते आणि त्यानंतर शहरातून मिरवणूक काढून मुहम्मद पैगंबर यांच्या जावयांच्या मुलांच्या हत्तेचा शोक व्यक्त केला जातो. त्यानंतरच्या काळात वर्षभर येथे दोन्ही धर्मीयांकडून कोणतेही कार्यक्रम घेतले जात नाहीत.
---------------
मार्गदर्शक :
प्रोफेसर डॉ. नीरज साळुंखे,
असोसिएट प्रोफेसर,
पीएचडी गाईड,
---------------
@
शब्दांकन :
सतीशकुमार सोळंके-देशमुख,
👉मुख्य आयुर्विमा सल्लागार LIC,
👉ऑल इंडिया चेअरमन्स क्लब मेंबर
👉एम.डी.आर.टी. यू.एस.ए.
👉"अग्निवंश",
सिद्धीविनायक कॉलोनी गेवराई,
ता. गेवराई, जि. बीड
👉9422241339,
👉9922241339.

No comments:

Post a Comment

क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10

  क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10 औरंगजेबाचा बिदरला वेढा: २८ फेब्रुवारीला औरंगजेब बिदरच्या परिसरात पोहोचला आणि त्याने २ मार्चला बिदरच्या किल्ल्या...