[ गनीमास शरण आणण्यासाठी मराठ्यांचे युद्धनीती मधले डावपेच ]
दक्षिणेत औरंगजेब उतरला तेव्हा त्याच्या सत्तेला तोंड देण्यासाठी मराठ्यांनी अगदी विचारपूर्वक हालचाली आखल्या होत्या
- औरंगजेबच्या छावणीभोवती सतत घिरट्या घालत रहाणे . स्वता संधी मिळवून छावणी वर हल्ले करणे , रसद तोडणे , रसद आणण्यास निघालेल्या पथकांवर हल्ले करणे .
- औरंगजेबाला किल्ले घेणे जितके अवघड दिरंगाईचे करता येईल तितके करणे . ( आणि खास करून किल्ला जितका लढविता येईल तितका लढविणे )
- मोगल सेनापतींना पाठीवर घेऊन शेकडो मैल पायपीठी करण्यास लावणे .
- दक्षिणेत सर्वत्र संचार करून मोगलांची ठाणी मारणे , मोगल सत्ता उध्वस्त करणे .
- शत्रू वर चाल करून त्यांच्या अधिकाऱ्यांना कैद करून भक्कम खंडणी वसूल करून त्यांना सोडून देणे .
- ठिकठिकाणी चौथाई गोळा करणे , आणि मोगल सत्तेच्या जागी आपल्या स्वताच्या छावण्या बसवणे .
- वऱ्हाडातून पुढे सरकून , मावळ , सह्याद्री व पश्चिम किनाऱ्यापासून उत्तरेकडे गुजरात पर्यंत सत्ता चालवण्याचा प्रयत्न करणे .
- नागपुरचे गोंड राजे , बुंदेलखंडातील बुंदेले व कर्नाटकातील गुलबर्गा , विजापूर भागातील बेडर जमातींचे सरदार ह्यांचे सहकार्य मिळवणे .
|| जय भवानी, जय शिवाजी....||



No comments:
Post a Comment