विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 17 August 2021

फर्जंद शहाजी राजे भाग ३

 


फर्जंद शहाजी राजे

भाग ३
शिवाजी महाराजांना इतिहासात एवढे मोठे झाले की अनेक लोक त्यापुढे खुजे झाले. मंदिर पाहताना आपण पाया मात्र विसरलो.दख्खनेतील राजकारणात सांभाळले दिल्लीच्या बादशाही कडून निजामशाही कुतुबशाही व आदिलशाही यांचे अस्तित्व टिकवणे महत्त्वाचे आहे हे महाराज साहेब शहाजीराजांनी पुरते ओळखले होते.
त्यामुळे मूर्तुझा सारखा लहान बालक त्यांनी मांडीवर घेऊन निजामशाही ला पुनर्जीवन देण्याचे काम केले. दुर्दैवाने निजामशाही टिकली नाही आणि मुर्तुजाला दिल्लीच्या बादशहाच्या स्वाधीन करण्यात आले व महाराज साहेब शहाजीराजांना आदिलशाहीत नोकरी पत्करावी लागली.
आदिलशाही दरबारात महाराज ना मान खूप होता त्यांनी मराठी लोकांना सरदारां पद द्यायला लावली . शहाजी महाराजांसाठी त्या भागातले छोटे नायक राजे शहाजी राजाना शरण येऊ लागले. शहाजी राजांनी या लहान लहान राजन अंकित बनवून मुळे त्यांची राज्य वाचली नाहीतर आदिशाही ला यांची राज्ये खुपत होती पण शहाजी राजांनी या लोकांना घेऊन अदृश्य फळी केलेली . आदिलशहा पेक्षा हे सर्व सर्व जण शहाजी राजन मनात होते . महाराज साहेबांच्या मुत्सद्देगिरीने व तलवारीच्या धाकाने आदिलशाहीच्या सीमा चार पटीने वाढल्या.
महाराज साहेब ध्येयपूर्तीसाठी अहोरात्र कष्ट करत होते. त्यांची होणारी प्रगती अर्थातच आदिलशाहीच्या काही सरदारांना खुपू लागली होती. अफजल खान, मुस्तफा खान, बाजी घोरपडे, बडी बेगम यांसारखा एक गट महाराज साहेबांना कायम पाण्यात पाहू लागला होता. त्यांनी आदिलशहाला मशहाजी राजांविषयी भडकवले व आदिलशहाच्या मनात विषयी घृणा निर्माण करू लागले.शहाजी राजांवर कित्येकदा कटकारस्थाने रचण्यात आली परंतु बुद्धीच्या आणि शौर्याच्या बळावर त्यांनी ती सर्व कटकारस्थाने मोडीत काढली.
_________________________________________

No comments:

Post a Comment

क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10

  क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10 औरंगजेबाचा बिदरला वेढा: २८ फेब्रुवारीला औरंगजेब बिदरच्या परिसरात पोहोचला आणि त्याने २ मार्चला बिदरच्या किल्ल्या...