विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 17 August 2021

औरंगजेबाचे कुटुंबाची माहिती भाग २



 औरंगजेबाचे कुटुंबाची माहिती

भाग २
दिलरसबानू बेगम ला पाच अपत्य तीन मुली आणि दोन मुले
१ ) झेबुनिसा ,ती एक चांगली कवियत्री होती ,पहिली मुलगी झेबुन्निसा हिला पण त्याने तुरुंगात टाकून तिचे हाल हाल केले.झेबुन्निसा दिसायला अतिशय सुंदर होती . लहानपणी कुराण पाठ करून तिने ३० हजार मोहोरा बापाकडून मिळवल्या होत्या.अकील कण्ह याच्याशी तिचे प्रेमप्रकरण चालू होते ते औरंगझेब ला कळले आणि तिथून दोघांमध्ये संघर्ष चालू झाला ती बापाची सर्वांत लाडकी होती पण 'अकबराच्या आपल्याविरुध्दच्या बंडात तिची सहानुभूती अहे' असे समजताच औरंगझेबने तिला कैदेत टाकले , तिने शेवटची २० वर्ष सालीमगड च्या तुरुंगात काढले काही वर्षांनी ती कैदेतच मरण पावली.हि आजन्म अविवाहित राहिली .अफाट ग्रंथसंपदा असणार्या या औरंगझेबाच्या मुलीकडे अनेक विद्वान आणि पंडित दरबारी होते.तिने स्वत मखफी उर्फ एक अवगुंठीत या टोपण नावाने पर्शियन भाषेत सुनीते रचली.२६ मे १७०२ ला दिल्ली येथे मृत्यू झाला.काबुल दरवाजा समोर असणार्या ३०,००० वृक्षांच्या बगीच्यात तिचे दफन केले

No comments:

Post a Comment

आंगरे घराण्याची वंशावळ

  आंगरे घराण्याची वंशावळ पुढीलप्रमाणे तुकोजी सेखोजी संकपाळ आणि त्यांच्या पत्नी अंबाबाई यांचे चिरंजीव कान्होजी जे पुढे सरखेल कान्होजी आंग्रे...