विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 17 August 2021

औरंगजेबाचे कुटुंबाची माहिती भाग ३

 



औरंगजेबाचे कुटुंबाची माहिती

भाग ३
दिलरसबानू बेगम ला पाच अपत्य तीन मुली आणि दोन मुले
२ ) झीनत उन्निसा झीनत उन्निसा ला मराठ्यांच्या जवळकीसाठी जास्त ओळखतात .तिचा सावत्र भाऊ कामबक्ष हा झीनत ऊन निस्सं चा जास्त जवळचा होता. कामबक्ष च्या बचावासाठी तिने औरंगझेब कडे खूप वेळा आर्जवे केली . मात्र सक्खा भाऊ आझम शाह याच्या शी तिचे वैर चालू होते .हि आजन्म अविवाहित राहिली
३ )झूब्दात ऊन निस ५६ वर्ष जगलेली हि राजकन्या ने आपल्याच चुलत भाऊ सिपोर शुकोह बरोबर लग्न केले . सिपोरे शुकोह हा दारा शुकोह चा चौथा मुलगा
४ ) मोहम्मद आझम शाह मोहम्मद आझम शाह हा औरंझेबच लाड़क कारण हा पराक्रमी आणि धोरणी होता. शहा आलं आणि कामबक्ष हे औरंगझेबाच्या हिंदू बायको पासून झालेले असल्यामुळे आझम हा जास्त लाडका होता . त्याचा पहिला विवाह शाहिस्तेखानच्या मुलीशी ठरला पण तिचा लवकर मृत्ययु झाला मग त्याचा दुसरा विवाह चुलत बहीण म्हणजे दारा शुकोह ची मुलगी जहाँझेब बानू शी झाला त्यांचा पहिला मुलगा बेदार बख्त औरंग्याच्या सर्वात लाडका नातू होता. औरंगझेब च्या मृत्यू नंतर जी भांडणे चालू झाली त्यात आझम आणि त्याचा मुलगा बेदार बख्त त्याच्या सावत्र भाऊ मुअज्जम कडून मरण पावला . त्याने विजापूर वेढा टाकून ५०००० सैन्यासह मोठी कामगिरी गाजवलेली होती . आदिलशाह ची मुलीशी शहर बानू बेगम शी त्याने तिसरे लग्न केले होते
५ ) सर्वात लाडका शाहजादा अकबर एकेकाळचा औरंगझेब च्या जीवाचा तुकडा आणि खूप लाडका असा हा अकबर मात्र नंतर बाप विरुद्ध बंद केले. जरी लाडका असला तरी आयुष्य पूर्ण ऐय्याशीत घालवले. संभाजी महाराजा बरोबर मिळून औरंग्याला तोंड दद्यायचे ठरले असताना हा अकबर अचानक पाने इराण ला निघून गेला . तिथेच तो १७०६ मध्ये मरण पावला. त्याचा मुलगा निकूशियार १७१९ ला मुघल बादशाह झाला .३

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...