औरंगजेबाचे कुटुंबाची माहिती
भाग ४
औरंगजेबाची दुसरी बायको
राहमतउन्नीस उर्फ नवाब बाई हिचे घराणे काश्मीर च्या राजुरी संस्थानाचे.खरे तर हि पहाडी राजपूत, .बैजीपुरा हे औरंगाबाद जवळचा भाग तिने बांधून काढला.हिचे सौंदर्य न टिकल्याने हि बादशाह च्या मर्जीतूनलवकर उतरली.१६९१ मध्ये दिल्ली येथे तिला मृत्यू आला.
राहमतउन्नीस उर्फ नवाब बाई ला तीन अपत्य , दोन मुलगे आणि एक मुलगी
१ ) मोहम्मद सुलतान याचा कुतुबशाह च्या दुसऱ्या मुली पडिश बीबी शी लग्न झाले आणि शूज च्या मुलीशी म्हणजे सख्य्या चुलत बहिणी शी पण लग्न केले (माह खानुम ). पण १६५७ ला दिल्ली साठी जेंव्हा औरंगजेब आपल्या भाव बरोबर युद्ध चालू केले तेंव्हा मोहम्मद सुलतान ने सासर्याच्या पक्ष धरला तेंव्हा चिडून औरंगझेब ने त्याला १६ वर्ष म्हणजे मारोपर्यंत १६७६ पर्यंत मोहम्मद सुलतान ला सलीमगड च्या तुरुंगात ठेवले .
२ )बहादूर शाह उर्फ मोहम्मद मुअज्जम उर्फ शाह आलम पण महाराष्ट्र्रात याला कोकण मध्य संभाजी महाराजांकडून प्रचंड पराभव झेलला, कुतुबशाही ला वेढा घातला असताना त्याने कुतुबशाही ची संधान केले ते औरंगझेब ला कळले तेंव्हा त्याने त्याला तुरुंगात कोंडले एक नाही दोन नाही तर आठ वर्ष नंतर त्याची रवानगी दिल्लीला केली . हा सर्वात धूर्त निघाला कारण औरंगझेब नंतर हाच मुघल चा बादशाह झाला . शाहूमहाराजांकडून दिल्ली कधी काबीज करणार नाही असा त्याने वचन पण घेतले . १६ फेब.१७१२ ला लाहोर येथे मृत्यू.झाला
३ ) बद्र ऊन निस्सं अवघ्या विसाव्या वर्षी हिला मृत्यू आला . पण सर्व भाईंची हि हुशार आणि शिक्षित होती

No comments:
Post a Comment