संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यात ह्या हिंदूस्थानाच्या इतिहासाला कलाटणी देणार्या दोन पुरूषांची समाधी आहे एक वेरूळ च्या घृष्णेश्वर मंदिर परिसरात मालोजीराजे भोसले चिरविश्रांती घेताहेत साक्षात स्वराज्य संकल्पक शहाजीराजे महाराज यांचे पिताश्री आणि पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मराठेशाहीच्या इतिहासातील एक महत्त्वाच्या व्यक्ती ज्या राजे भोसले घराण्याने शतकानुशतके गुलामगिरीच्या अंधकारमय राजवटीत होरपळून निघालेल्या रयतेला स्वातंत्र्याचा ,स्वराज्याचा राष्ट्रप्रेमाचा धर्मनिष्ठेचा महामंत्र दिला त्या भोसले घराण्याचे संस्थापक एक कर्तबगार व्यक्ती घृष्णेश्वर मंदीराचा जिर्णोद्धार मालोजीराजे भोसले यांनीच केला होता.तसेच शिखर शिंगणापूर च्या शंभू महादेवाच्या परिसरातील पुष्करणी तलाव आताचे शिवतीर्थ हे मालोजीराजे यांनीच बांधले आहे.
फलटणचे जहागिरदार ज्यांना बारा वंजीराचा काळ असेही म्हणत त्यांचा पातशाही दरबारात विशेष दबदबा होता ते वणंगपाळ उर्फ जगपाळराव यांच्या मालोजीराजे आणि विठोजीराजे त्यांच्या सहवासात असताना मालोजीराजे आणि विठोजीराजे यांनी जगपालराव यांच्या कोल्हापूर मोहिमेत विशेष पराक्रम गाजवला .त्यांची किर्ती सर्वत्र झाली. मालोजीराजे यांचे शौर्य कर्तृत्व पाहून जगपाळराव नाईक यांनी आपल्या बहिण दिपाबाई ह्या मालोजीराजे यांना पत्नी म्हणून दिल्या होत्या. ह्या जगपाळराव आणि मालोजीराजे यांच्या मध्ये खूप स्नेह होता वेळोवेळी त्यांनी एकमेकांना मदत केली.मालोजीराजे यांच्या पराक्रमाने त्यांच्या अहमदनगर च्या निजामशाही दरबारात प्रवेश झाला आणि तिथे त्यांच्या विशेष सन्मान हि झाला त्यांना 1604 साली अहमदनगर च्या निजामशाही कडून जहागिरी मिळाली.आणि राजा हा किताब हि मिळाला होता. मालोजीराजे यांना स्वराज्य संकल्पक शहाजी राजे आणि शरिफजीराजे हि दोन मुले होती. मालोजीराजे हे इंदापूर येथे आदिलशाही विरुद्ध च्या लढाईत धारातीर्थी पडले.ह्याच मालोजीराजे भोसले यांच्या पुत्रानं परकीय शत्रूत राहून हि आपल्या पराक्रमाच्या जोरावर परकीय शत्रूतही आपला दरारा ठेवला आणि एका सार्वभौम राजाप्रमाणे कर्नाटकात बंगलोर राजधानी बनवून राज्य केले आणि त्यांच्या नातवाने म्हणजे पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी तर हि अख्खी पातशाही पायदळी तुडवून रयतेचे आपले स्वराज्य निर्माण केले. आपल्या पराक्रमाने आणि शौर्याने स्वराज्याच्या भगवा ह्या हिंदूस्थानाच्या मातीत फडकवला आणि रयतेच्या गवताच्या काठीला हि कोणाची हात लावण्याची हिम्मत होत नव्हती असे सुशासन निर्माण केले आजही रयतेच्या मनात आपल्या महाराजांच्या बद्दल प्रचंड अभिमान आहे आणि आदर आहे. अश्या विश्ववंदनीय थोर महामानवांचे आजोबा मालोजीराजे भोसले. त्यांची हि समाधी राजे शिवभक्त शुभम गायकवाड चरणीं सदैव नतमस्तक
एक अशी व्यक्ती ती म्हणजे औरंगजेब त्याची हि कबर वेरूळ जवळ खुलताबादेत आहे हा तोच औरंगजेब ज्याला मराठ्यांना हरविण्यासाठी लाखोंची फौज घेऊन महाराष्ट्रात यावे लागले तब्बल 25 वर्षे त्याला मराठ्यांना हरविण्यासाठी दिल्ली सोडून महाराष्ट्रात भटकावे लागले पण त्याला मराठ्यांना हरविता आले नाही शेवटी त्याला मरावं लागले ह्या महाराष्ट्रात भिंगार मध्ये आणि त्याची कबर खोदली संभाजीनगरच्या खुलताबादेत .ती पण मराठ्यांनीच त्यांची साक्ष आजही त्याची कबर देतेय. हा योगायोग म्हणावा लागेल कि ज्या हिंदूस्थानाला परकीय सत्तांच्या जुलमी राजवटीतून मुक्त करण्याचा महामंत्र देणार्या म्हणजे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे महाराज यांच्या पित्याची हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांची मालोजीराजे भोसले यांची समाधी. वेरूळात घृष्णेश्वर मंदीराच्या परीसरात चिरविश्रांती घेताहेत हे महापितामह
आणि तेथून फक्त पाच किलोमीटरच्या अंतरावर खुलताबाद मध्ये
ज्या तैमुर खानदानानं ह्या अखंड हिंदूस्थानावर आपल्या जुलमी राजवटीचे स्वप्न पाहिले. ह्या हिंदूस्थानातील निष्पाप रयतेवर व इथल्या संस्कृतीवर धर्मावर आपल्या जुलमी राजवटीत अगणित अन्याय अत्याचार केल्या त्या तैमुर खानदानाचा वंशज स्वतःला हिंदूस्थानाचा शहेनशहा आलमगीर बादशहा म्हणून औरंगजेब त्याच स्वप्न होतं ह्या अखंड हिंदूस्थानावर आपल्या मुघली सत्तेचे निशाण फडकावे पण मराठ्यांनी त्याच स्वप्न पुर्ण होऊ दिले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्रुत्यु नंतर मराठ्यांना हरविण्यासाठी तो त्याच दिल्लीचे मुघली तख्त सोडून 1682 ला दख्खनेत आला मराठ्यांना हरविण्यासाठी पण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या नेतृत्वात मराठ्यांनी त्याच संपूर्ण हिंदूस्थानवर मुघली निशान फडकविण्याच स्वप्न पुर्ण होई दिलं नाही. त्याने मराठ्यांना हरविण्यासाठी जंगजंग पछाडला .प्रत्येक डाव टाकून पाहिला पण मराठे हरले नाहीत झुकले नाहीत लढत राहिले त्या औरंगजेबाला 25 वर्षे जिंकण्याची स्वप्नं पाहायत दख्खनेत फिरावं लागले शेवटी बलाढ्य फौजेचा नायक बादशहा दिल्लीपती म्हणून आला होता पण मराठ्यांच्या पुढे तो हरला एवढा मोठा सैन्य सागर संपत्ती पण त्याला मराठ्यांनी हरविले सैन्य संपत्ती कितीही असूद्या पण नेतृत्वात युध्दकौशल्य नेतृत्व क्षमता म्हणजे सर्वांना सांभाळून घेणे राष्ट्रप्रेम ,आपलेपणा ,स्वातंत्र्याची जिद्द,ज्वलंत देशाभिमान मोडेन पण झुकणार नाही हि मराठ्यांची निती शिवछत्रपतींची प्रेरणा छत्रपती शंभूराजेंनी आपल्या देश धर्मासाठी दिलेल्या बलिदानाने ह्या मातीत निर्माण धैर्याने आणि शेवटी छत्रपती रामराणी भद्रकाली ताराराणींच्या नेतृत्वाने त्या औरंगजेबांची कबर खोदली इ.स 1707 मध्ये तो मेला ह्या महाराष्ट्रात अहमदनगर जवळील भिंगार येथे त्यांची कबर संभाजीनगर(औरंगाबाद) जिल्ह्यातील खुलताबाद मध्ये आहे .त्याची कबर मराठ्यांच्या शौर्याची सामर्थ्याची राष्ट्रप्रेमाची आत्मविश्वासाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून नेतृत्वातून सुरू झालेल्या एका महापर्वाच्या विजयाची साक्ष म्हटलं तरी वावगे ठरणार नाही.
तात्पर्य मला एकच सांगायचे आहे ह्या दोन व्यक्ती दोन्हींचे विचार भिन्न कार्य कर्तृत्व भिन्न काळभिन्न औरंगजेबाच्या जन्माच्या पुर्वी अगदी थोड्या काळापुर्वी मालोजीराजे यांचे निधन झाले होते औरंगजेबाचा जन्म 1618 ला झाला पुढे त्यांच्या एकूण कर्तृत्वाने काय पाहिजे आणि त्यानंतर त्यांच्या बलाढ्य मुघल सत्तेचे काय झाले हि एक विचार करायला लावणारी गोष्ट .
मालोजीराजे यांच्या कर्तृत्वाने नेतृत्वाने काय दिले.
ह्या दोन व्यक्ती एकाच भूमीत चिरविश्रांती घेताहेत अंतर फक्त पाच किलोमीटरच आहे
हा शुभम गायकवाड सांगतोय मालोजीराजे यांच्या नेतृत्वानं बलाढ्य मराठेशाहीचा पाया रचला. शहाजीराजे महाराज यांच्या सारखे पुत्र घडविले पुढे ह्याच छत्रपती घराण्याने स्वातंत्र्य,स्वराज्याचा दिवा घराघरात पेटविला. परकिय सत्तेच्या जुलमी सत्तेचा शेवट करून अटकेपार झेंडा फडकवणारे कर्तृत्व नेतृत्व ह्या घराण्याने दिले
औरंगजेब
औरंगजेबाच्या तैमुर खानदानानं काय केलं निष्पाप रयतेवर अन्याय अत्याचार सत्ता संपत्ती साठी त्यांनी मानवतेच्या सर्व मर्यादा पार केल्या .आणि औरंगजेब याने त्यांच्या सत्तेसाठी काय केले कोणतीच मानवतेची मर्यादा पाळली नाही शेवटी त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मुघल सत्तेचे काय झाले? सत्ता संपत्तीचा आणि ताकदीचा मोह नसावा हेच माणसाला र्हासास कारणीभूत ठरतात हेच औरंगजेबाचा तैमुर वंशाचा इतिहास सरकारकडे एकच विनंती आहे की ह्या शिवभक्त शुभम गायकवाड ची कि आपल्या विश्ववंदनीय हिंदवी स्वराज्याच्या पराक्रमी गौरवशाली वैभवशाली लोकहितवादी सांगणार्या आणि जपणार्या छत्रपती घराण्याच्या आद्य पितामहाचे मराठेशाहीचा पाया रचणाऱ्या महामानवाच्या श्रीमंत मालोजीराजे भोसले यांच्या समाधीचा जिर्णोद्धार व्हायला पाहिजे त्याठिकाणी भव्य ऐतिहासिक समाधी स्मारक व्हायला पाहिजे हि एक शिवभक्त म्हणून सदिच्छा काही चुकलं असेल तर क्षमस्व पण कधी कधी बोलाव वाटतं आपला ज्वलंत आभिमानी इतिहास सांगा वाटतो म्हणून तर हा लेखन प्रपंच हा शुभम गायकवाड सांगेन कधी वेरूळ ला गेलात तर घृष्णेश्वरांच्या चरणी नतमस्तक व्हा तसेच जवळच मालोजीराजे हे चिरविश्रांती घेताहेत त्यांच्या हि चरणी नतमस्तक व्हायला विसरू नका. जय मालोजीराजे जय शहाजीराजे जय शिवराय
No comments:
Post a Comment