पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वाळकी या गावात मराठा सरदार आनंदराव थोरात यांच्या घराण्याची शाखा आहे आणि त्याची गढी आहे. वाळकी हे गाव पुणे नगर रस्त्यावरील वाघोली या गावापासून राहूमार्गे ३५ कि.मी अंतरावर आहे. ही गढी आतमध्ये संपूर्णपणे नष्ट झालेली आहे. बाहेरून गढीची तटबंदी , बुरूज पहायला मिळतात. आतमध्ये चौथरे दिसतात. गढीला लागूनच उत्तर मराठा कालखंडात बांधलेले दोन वाडे आहेत ते पण थोरातांचेच आहेत. त्या वाड्याचे प्रवेशद्वार आणि भिंत सुस्थितीत आहे बाकी आतमध्ये पूर्ण पडझड झालेली आहे. एका वाड्याच्या प्रवेशद्वारावर अश्वशिल्प आहे. गावात प्रवेश करताना एक समाधी दिसते. वाळकी या गावी भीमा-मुळा-मुठा नद्यांचा संगम आहे
सरदार आनंदराव थोरातांबद्दल एकदम विस्तृत पोस्ट यापूर्वी केलेली आहे. त्याची लिंक
टीम - पुढची मोहीम
No comments:
Post a Comment