विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 8 March 2022

१६ व्या शतकातील सुपे येथील गढी

 


१६ व्या शतकातील सुपे येथील गढी

नगर पुणे रस्त्यावरील सुपे हे ऐतिहासिक गाव जहागिरीचे गाव म्हणून गाजल गेलं. मराठ्यांच्या इतिहासात पुणे जिल्ह्यातील सुपे, चाकण, इंदापूरला जेवढे महत्त्व. तेवढच नगर जिल्ह्यातील सुपे गावाला महत्त्व होते. या गावाला १६ व्या शतकाच्या इतिहासाची उज्ज्वल परंपरा आहे. नगर-पुणे हमरस्त्याच्य बाजूला जातानाच उजव्या हाताला प्रचंड गढी लागते. गढीच्या समोरच ऐतिहासिक सुंदर, संगमेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराचे रंगकाम नुकतेच पुर्ण झाले आहे. हे मंदिर स्थापत्यशास्त्राचा अद्वितीय, अजोड, कलाकृतीचा उत्तम नमुना आहे. साधारणपणे ३ एकरावर उभी असलेली १६ व्या शतकातील गढी अजूनही [काही पडझड वगळता] उभी आहे. गढी शेजारील बारवेत शिलालेख आहे. या शिलालेखावरुन शके १६५६ मध्ये ही गढी बांधली असे कळते. कृष्णाजीराव पवारांनी ही गढी १६ व्या शतकात बांधली. ही गढी म्हणजे १६ व्या शतकातले लष्करी ठाणे होते. लष्करी केंद्र होते, गढीच्या डाव्या बाजूला एक वाडा थोरली पाती रुपाने तर दुसरा वाडा धाकटी पाती म्हणून एक वाढा बांधला आहे. गढीच्या पूर्वेस शेजारी घोडे, हत्ती यांची पागा होती आज ही पागा सपाट झाली आहे. तालीम शोजारी आहे. गढीचे प्रवेशद्वार विटा व चुण्याने भक्कमपणे बांधलेले आहे. या प्रवेशद्वाराचा निम्मा भाग दगडाने व निम्मा भाग विटाने बांधलेला असून तो तीन मजली आहे. तीन मजल्यावरील खिडक्या व काही ठिकाणी आक्रमणासाठी मारा करण्यासाठी असून मधून छिद्रे आहेत. शत्रूंवर मारा करण्यासाठी त्याचा वापर होत असावा असे वाटते. ठग, दरोडेखोर, शत्रू यांचेपासून रक्षण करण्यासाठी ह्या गढीत, तळघरे, बळद, विहीर असून समोरच्या बुरुजांचा उपयोग रखवालदार करत होते. गढी हे दसरा दिवाळी व इतर सण साजरा करण्यासाठी महत्वपूर्ण सांस्कृतिक केंद्र मराठ्यांच्या व पेशव्यांच्या इतिहासात मानले जाते. गढीचा आतील भाग पूर्णपणे सपाट असा आहे. कृष्णाजी पवारांनी ही गढी बांधली तत्पूर्वी सुपे येथील जवळच सुकेवाडी येथे मराठ्यांच्या व पेशव्यांचा कारभार चालत होता. सुकेवाडीहून सुपे हे नाव पडले असावे. असे इतिहास संशोधकांना वाटते. श्रीमंत साबुरिन परमार हे राजपुतण्यातून [राजस्थान] सुकेवाडी येथे आले असावे. सुकेवाडीतून ते सुप येथे आहे. सुपे येथे परमारांची राजगादी होती. नगर तालुक्यातील भातोडी, सुकेवाडी येथे परमारांचे नाव आहे. याच परमारांचे मध्य प्रदेशात पोवार तर महाराष्ट्रातच पवार नाव झाले. श्रीमंत आनंदराव पवार महाराज हे मुळ वंशज सुपे येथे होते. आनंदराव पवारांना, जगदेवराव, तुकडोजीराव ही दोन मुले, नंतर तुकोजीराव हे देवास [मध्यप्रदेश] येथे दत्तक गेले. जगदेवरांनी वाडा बांधला. जगदेवराव हे देवास संस्थानचे मुख्य प्रधान होते. तुकोजीराव महाराजांना कोल्हापूरच्या राजाराम महाराजांनी कन्या दिली. तेव्हापासून कोल्हापूरचे राजघराणे व सुपे यांचा नातेसंबंध आला व इतिहासात दोन राजघराण्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. या परमार घराण्याची मूळ राजगादी सुपे येथे आहे. आज परमार घराण्याची देवास, मलठण, धार, अहमदाबाद [पुणे] येथील राजघराणी मुलगी सुपे येथील आहेत. सुपा हे संस्थान काही काळ तुकोजी महाराज पाहत होते. तुकोजी महाराज हे दत्तक गेले. या संस्थानाला मध्यप्रदेश देवास येथून मदत मिळत होती. देवासचे पोवार मलठणचे पवार यांची सुपा ही मुळ राजगादी होळकर व पवार यांनी मालवा प्रांत जिंकला. होळकर हे इंदोर तर पवार धार येथे गेले. तुकोजी महाराजांनी देवास व धार येथून सुपे येथील जहागिरीची नेमणूक दिली होती. सरदार मल्हारराव शितोळे, कोल्हापूरचे रजक विक्रमसिंग यांचे देवासमध्ये एकाच मंडपात विवाह झाले होते. गढी शेजारीच शितोळे यांचा वाडा आहे. हा वाडा बांधताना पाया खोदताना पांडूरंगाची व कृष्णाची मुर्ती सापडली. पांडूरंगाच्या मुर्तीची प्रतिष्ठापण सुपे येथे तर कृष्णाच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा देवास [म.प्रदेश] येथे झाली आहे. आषाछी एकादशाीला येथे मोठा उत्सव साजरा होतो. शितोळे यांच्या वाड्यात परमाराची मुळ राजगादी आहे. संपूर्ण सागवानी वाड्यात दिवाणखाना बैठक स्वयंपाकगृह, परसदार, विश्रामिका आहेत. दोन खणी वाडा असून त्यावर नक्षीकाम अप्रतिम आहे. साबुसिंग पवार व हंगा येथील दगडोजी दळवी यांच्यात हंगे येथे युध्द झाले होते. व या युध्दानंतर कृष्णाजी पवारांनी हा वाडा बांधला असलयाची माहिती येथे समजली. ५० वर्षापूर्वी गढीचा समोरील काही भाग जळाला होता. गढीला आज चारशे वर्षेपूर्ण होवून गेली. गढीचे आज चारशे वर्षपूर्ण झाली. गढीचे मातीचा भाग पूर्वी उडदाचे पीठात कालवून त्याला भक्कमपणा दिला होता. ४०० वर्षे झाली तरी हे बांधकाम टिकून आहे. तर त्याशेजारील वाडा २५० वर्षाचा आहे. वाड्यातील आबासाहेब माधवराव शितोळे देशमुख हे मुळचे राळेगण थेरपाळ येथून आले. त्यांचे पणजोबा व आनंदराव पवार हे मावसभाऊ होते. त्यामुळे ते इथला कारभार पाहू लागले. त्यानंतर विक्रमसिंग महाराज १९४२ मध्ये सैन्यात गेले. युरोप खंडात मध्ययुगाचे कालखंडात सामंतशाही प्रभावी बनली व सामंतशाहीचा प्रभाव वाढला. सामंतांनी राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी मùनार म्हणजे गढी बांधल्या ह्या गढीचे स्वरुप तत्कालीन कालखंडातून सांस्कृतिक केंद्र म्हणून मानले जायचे. काही वेळेस गढीचा उपयोग शस्त्रागार म्हणून केला तर गढीत सामंत राहत होते. विविध सण समारंभ येथे साजरे होत होते. युरोपात ज्या पध्दतीने सामंतशाहांनी सांस्कृतिक चळवळींना गढीच्यारुपाने प्रोत्साहन दिले. तशी सुप्याची गढी म्हणजे १६ व्या शतकापासूनच्या सांस्कृतिक चळवळीचा एक जिताजागता इतिहासच आहे. दसरा हा पारंपारिक सण साजरा होताना घोडे, हत्ती, उंट यांची मिरवणूक शस्त्रपुजन होत होते. सर्व धर्मियांत एकजूट करणारी गढी, सण समारंभ विविध कार्यक्रमांसाठी या गढीचा उपयोग होत असे.

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...