विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 17 September 2022

सातवाहन राजा हाल याची महाराष्ट्री प्राकृत मधील "गाथा सप्तशती"

 

      • सातवाहन राजा हाल याची महाराष्ट्री प्राकृत मधील "गाथा सप्तशती" :

सातवाहन राजा हाल यांनी महाराष्ट्री प्राकृत भाषेतील निवडक ७०० गाथांचा संग्रह संपादित केला होता. त्यास गाथासप्तशती असे म्हणतात.

महाराष्ट्री भाषेतल्या सप्तशती या हालसातवाहन राजाच्या ग्रंथाचा काळ विन्सेन्ट स्मिथच्या मतानुसार इ. स. ६८ आहे. याकोबीच्या मतानुसार हालाचा काळ इ. स.४६७ तर मॅक्डोनेलच्या मतानुसार इ.स १००० आणि वेबरच्या मतानुसार तिसरे शतक ते सातवे शतक असा आहे. म्हणजेच, आपण ढोबळ मानाने हालाचा काळ पहिले शतक असेल असे म्हणू शकतो. हया ग्रंथामध्ये ७०० गाथा आहेत. ज्यातील ५० गाथा ह्या एकट्या हालराजाने रचल्या आहेत.

महाराष्ट्री प्राकृत भाषेत रचलेला हा पहिला ग्रंथ आहे. त्मyaध्ये-- मानवी भावना, व्यवहार आणि निसर्गाचे अत्यंत सुरस व सौंदर्यपूर्ण चित्रण आहे. विविध व्रत्ते, आचार आणि उत्सव यांचेही वर्णन त्यात आहेत.

गाथासप्तशती हे महाराष्ट्राचे आद्य लोकसाहित्य आहे. गाथासप्तशतीतील भौगोलिक स्थाने, नद्या सारे महाराष्ट्र देशातीलच आहेत. गिरणा, गोदावरी, तापी, नर्मदा, मुळा या नद्या आहेत. यमुना नदी, मन्दार पर्वत, मलय पर्वत यांचे उल्लेख सांकेतिक मात्र आहेत. बहुसंख्य उल्लेख गोदावरी नदीचे आहेत. त्र्यंबकेश्वर, पैठण यांचे उल्लेख आहेत.

त्यात काव्यगत कृत्रिमता अजिबात नाही. जीवनाची करुण, दारुण व हृदयस्पर्शी अशी सर्व अंगे सारख्याच कुशलतेने तिच्यात रेखाटलेली आहेत. निसर्गाप्रमाणे मानवी कृतींची व पशुपक्ष्यांच्या जीवनाचीही लोभसवाणी चित्रणे तिथे भरपूर आहेत. खेळकर विनोद हेही त्यांचे वैशिष्ट्य आहे. मराठी स्वभावातला रोखठोकपणा आणि कोमलता हे दोन्ही विशेष त्यात प्रतिबिंबित झालेले आहेत. गृहिणी, विरहिणी, खंडित नायिका यांच्या आविष्कारांची चित्रणे आहेत. सज्जन प्रशंसा, दुर्जननिंदा, भरघोस पीक पाहून चांदण्यात स्वच्छंद गाणारा शेतकरी, मृत पत्नीसाठी विलाप करणारा हलिकपुत्र, पशुपक्ष्यांचे निरुपाधिक जीवन, त्यांचा निरागस प्रणय, यौवनात पदार्पण केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलीचे मुग्ध व वेधक सौंदर्य याविषयीची चित्रणे मानवी भावना हेलावून सोडणारी आहे.

थोडक्यात तत्कालीन महाराष्ट्रातील समाज जीवनाचे प्रतिबिंब त्यात उमटलेले आहे. आधुनिक मराठी भाषेतील अनेक शब्दांचे मूळ या ग्रंथातील शब्दांमध्ये सापडते. यातील कविता वरून महाराष्ट्र प्राकृत आणि आधुनिक मराठी भाषा यांच्यातील दुवे स्पष्ट होतात.

◼️गाथा सप्तशती या ग्रंथातील काही गाथा (मराठी अनुवाद):

  • गाथा क्रमांक ९
  • गाथा क्रमांक १०३
  • गाथा क्रमांक २४६
  • गाथा क्रमांक ३०
  • गाथा क्रमांक ८

जवळपास ४५० वर्ष सातवाहन वंशाने राज्य चालवले. आजच्या महाराष्ट्राच्या संस्कतीची बीजे तर रोवलीच पण माहाराष्ट्री प्राकृत साहित्यात स्वत:ही मोलाची भर घालत आजच्या मराठीची पायाभरणी केली.

पैठणला त्यांनी जागतिक व्यापाराचे केंद्र बनवले. व्यापारी मार्ग बांधले. बंदरे उभारली. बलाढ्य आरमार उभारले. कुशाण सत्तेला विंध्यापाशीच थोपवून धरले. शकांच्या पारतंत्र्यापासून महाराष्ट्राला मुक्त केले.

मराठा, यादव साम्राज्यांचे महाराष्ट्र व मराठी भाषेच्या जडणघडणीत जेवढे योगदान आहे तेवढेच सातवाहन साम्राज्याचेही आहे.

धन्यवाद!

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...