बाळाजीपंत नातू इंग्रजांना सामील झाले. शनिवारवाड्यावर त्यांनी ब्रिटीशांचा झेंडा लावला.
बाळाजीपंत नातू म्हणजे मराठा साम्राज्याला लागलेला काळिमा .... गद्दार म्हणून जर आपणास सूर्याजी पिसाळ आठवतात तर सूर्याजी पिसाळ म्हणजे बाळाजीपंत नातू यांच्या गद्दारीपुढे शून्य .... बाळाजीपंत नातू यांनी शनिवार वाडा वर इंग्रज चा झेंडा फडकवायला मदत नाही केले तर सातारा च मराठांची राजधानी सुद्धा पडायला /खालसा करायला बाळाजीपंत नातू कारणीभूत होते
बाळाजी नातू याना पेन्शन १८४२ पर्यंत देत असल्याचा हा पुरावा ...त्या काळी हि रक्कम खूप जास्त होती
बाळाजीपंत नातू यांचे कारस्थान खरे रंगोजी बापू गुप्ते यानीच ओळखले .
पेशवाई संपवण्याचे निम्मित ठरले बडोद्याचे वकील गंगाधर पंत शास्त्री यांचं खून ....त्यांच्या खुनाचे निम्मित करून त्र्यंबकजी डेंगळे यांना बंगाल ला पाठवले आणखी तिकडेच संपवले ...त्र्यंबकजींचे निमित्त करून दुसऱ्या बाजीराव ला पुणे सोडायला लावली ...आणि शनिवार वाडा मराठ्यांच्या हातातून काढून घेतला ..त्यावेळी पुण्यात अनेक खून झाले ...खून झाल्या मध्ये सातारचे वकील /खरसेठजी मोदी/ खरसेठजी मोदी यांचे सहाय्यक बापू साने हे सर्व मराठ्यांना आणि पेशव्याने सहाय्यक कारक माणसे होती ……योगायोगाने ज्यांचे खून झाले ते सर्व मराठा साम्राज्याच्या भलाईसाठी झटणारे लोक होते ...पण शास्त्रींच्या खून्याचे निमित्त करून दुसरा बाजीराव ला परागंदा करणाऱ्या एल्फिन्स्टन आणि बाळाजीपंत नातू यांनी हे सर्व खून कोणी केले ते कधीच इतिहासाला सांगितले नाही .
एके काळी हुशार माणूस पण दुसऱ्या बाजीराव ने याना नोकरी घेण्यास नकार दिला अपमान केला. म्हणून इंग्रजी शिकले . अतिशय मुत्सद्दी पण मराठ्यांच्या विरोधात गेले . एल्फिन्स्टन ला पूर्ण सामील होता . त्यानेच त्र्यंबकजी डेगळे उर्फ पाटील विरुद्ध कां भारावले अर्थात त्याला मराठयांचे आणि त्र्यंबकजी डेगळे पण जबाबदार होते . १८१८ ला शनिवार वाडा सोडून दुसरा बाजीराव निघून गेला तेंव्हा एल्फिन्स्टन आणि बाळाजीपंत नातू ने शनिवार वाड्यावर इंग्रंजांचं झेंडा फडकावला . तुम्ही बाळाजीपंत पेशवे यांचे नातू म्हणता असाल तर ते म्हणजे नानासाहेब पेशवे , राघोबा दादा आणि सदाशिव राव भाऊ . नानासाहेब पेशवे आणि सदाशिव राव भाऊ १७६१ मध्ये मरण पावले तर राघोबा दादा १७८३ मध्ये मरण पावले .
बाळाजीपंत मूळ कोंकणांत पेण वाक्रुळ येथील राहणारा हे पुढें पुण्यास आला, रास्त्यांच्या नोकरी केली यावेळीं दुसरा बाजीराव व रास्ते यांच्यात भांडण होते असून, रास्ते पेशव्यांना शह देण्यासाठी इंग्रजांशीं जवळ होते .मुळा मुठा नदीच्या संगमावर बंगल्यात राहणारा ब्रिटिश रेसिडेंट याच्याशी बोलणें करण्याकरितां रास्त्यांनां हेर असायचे . बाळाजीपंतां नातू ना रास्त्यांनीं त्या काम वर रुजू केले .
पेशवे हे रास्त्यांचे शत्रु असल्यानें त्यांच्या चहाड्या किंवा गुप्त गोष्टी इंग्रजांस सांगितल्यास आपल्या इंग्रजांचे आपण जास्तच फायदा होईल, असा मनाशीं विचार करून, बाळाजीपंत रेसिडेंटास पेशव्यांकडील बातम्या देई
. १८०३ सालापासून बाळाजीपंताचा इंग्रजांशी संबंध येत गेला. त्यावेळी पुण्यास सर बॅरी क्लोज हा रेसिडेंट होता. क्लोजबरोबर १८१० सालीं बाळाजीपंत माळव्यांत होता; त्यावेळीं ``पालखी, पंचवीस स्वार व पन्नास माणूस’’ त्याच्या तैनातींत होतें;
यानंतर एल्फिन्स्टन रेसिडेंट झाला. पुढें पेशवे व इंग्रज यांच्यामध्यें वितुष्ट वाढत जाऊन सन १८१६ ला गंगाधरशास्त्राच्या खुनानें त्यावर वाद वाढवला .
अशा आणीबाणीच्या प्रसंगी बाळाजीपंताचे साहाय्य एल्फिन्स्टन यास गरजेचेवाटले . त्यानें त्याला आपल्या नोकरींत घेतलें . पेशवेना सुद्धा बाळाजीपंत नातू आपल्या हातचा जाऊं देऊं नये म्हणून प्रयत्न केले ; पण त्यांची या कामी निराशा झाल्यावर त्यांनीं फोर्डमार्फत रेसिडेंटास सांगून पाठविलें कीं, हा मनुष्य आपल्याजवळ येऊं देऊं नये. तथापि एल्फिन्स्टनास या मनुष्याची पूर्ण पारख असल्यानें त्याने जामीन देऊन बाळाजीपंतास आपल्याजवळ ठेवून घेतले.
एल्फिन्स्टनचा हुकूम दुसरी बाजीराव याना देण्यात वाड्यांत येई. कधी कधी पेशव्यांस इंग्रजांशी नम्र राहण्याचा सल्ला दिले . नातूमुळें इंग्रजांस पेशव्यांच्या अंतस्थ बातम्या कळू लागल्या व त्याकारणानें पेशव्यांची कारस्थानें फसूं लागलीं. पेशव्यांनीं आणि त्रम्ब्यक डेंगळे यांनी इंग्रजी लष्करांत पेंढाऱ्यां मार्फत आबंद उभारले त्याची बातमी प्रथण बाळाजीपंतानें एल्फिन्स्टन यास देऊन सावध केलें. याप्रमाणें नातू एल्फिन्स्टनचा उजवा हात बनून राहिला
गंगाधर पंत शास्त्री यांचं निम्मित करून त्र्यं दुसऱ्या बाजीराव ला पुणे सोडायला लावली ...आणि शनिवार वाडा मराठ्यांच्या हातातून काढून घेतला . पेशव्यांच्या सुचणे प्रमाणे बाळाजीपंत शनिवार वाडा वरचा ध्वज काढला . पण त्या काळात काही ब्रिटिश पण मराठ्यांना (होळकरांना /शिंदे ना) सामील झालेले .
पुढे शनिवार वाड्यावर मराठ्यांचा झेंडा पडून इंग्रजांचा झेंडा फडकावला नाही तर साताऱ्याच्या म्हणजे मराठ्यांच्या राजधानीचा शेवटचे छत्रपती प्रतापसिंह छत्रपतींचें खालसा सुद्धा करण्यात बाळाजीपंत नातू सर्वत पुढे होते . रंगोजी बापू आणि छत्रपती यांचे खरे दुश्मन इंग्रज आणि बाळाजीपंत नातू !
1]Balaji Pant Natu - Wikipedia
2)राजवाडे मराठ्यांच्याया इतिहासाची साधने खंडे 4 आणि 10
3)मराठी रियासत सरदेसाई
4) Kasutbh kasture : pashwaai
No comments:
Post a Comment