विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 16 January 2023

पानिपतात विरगती प्राप्त झालेले सेनापती.. सरदार यशवंतराव आनंदराव पवार

 


पानिपतात विरगती प्राप्त झालेले सेनापती..
सरदार यशवंतराव आनंदराव पवार
धार संस्थानचे दुसरे अधिपती.
माळव्या तील मराठी राज्याविस्तारात यांचा सहभाग होता.सन १७३४-३५ ची माळव्याची मोहिम,सन १७३६ मध्ये चिमाजी अप्पांसोबत वसईच्या मोहिमेतही ते आघाडीवर होते.त्याच साली आनंदरावांच्या निधनानंतर यशवंतरावांना सरंजामाची वस्त्रे देण्यात आली.
पुढेही पेशव्यांच्या अनेक मोहिमांत ते सहभागी होते.
पानिपताच्या लढाईत ते आपल्या पंचवीस हजाराच्या फौजेसह विश्वासरावांकडच्या बाजूस होते.प्रत्यक्ष लढाईला सुरूवात होताच यशवंतरावांच्या तुकडीने अताईत खानाच्या सैन्यावर हल्ला चढवला.
यशवंतरावांनी हत्तीच्या अंबारीतून तिरंदाजी करणाऱ्या अताईत खानावरच हल्ला करीत,त्याच्या हत्तीवर चढून त्याचं मस्तक धडावेगळं केलं.हा महाभारतीचा रणवीर तेव्हा रुधिराभिषिक्त भैरवंच भासत असावा.
पुढे याच चकमकीत हे रणवीर धारातिर्थी पडले.
वंशपरंपरेनंच मिळालेला शौर्याचा वारसा यथोचित सांभाळत आपल्या यशवंत या नावाला साजेसाच पराक्रम गाजवला हेही तितकंच खरं.
पानिपताच्या रणसंग्रामात धारातिर्थी पडलेले सरदार यशवंतराव पवार तसेच सर्व ज्ञात - अज्ञात शुरवीरांना विनम्र अभिवादन….
राजे धार पवार घराणे Imperial Marathas...!!!

1 comment:

  1. Bhau apratim mahiti lihitos but jrr wordpress vrr lihilis trr hii mahiti google vrr rank zali aasti aani anek lokanparyant pohochli asti...

    ReplyDelete

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...