विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 8 March 2023

शिवराय विलक्षण बुध्दिमान होते,हे परमानंदाने वेगवेगळ्या प्रकारे स्पष्ट केले आहे !


 शिवराय विलक्षण बुध्दिमान होते,हे परमानंदाने वेगवेगळ्या प्रकारे स्पष्ट केले आहे !

ते अफजलखानाच्या भेटीसाठी गेले,तेव्हा त्यांचे वर्णन करण्यासाठी परमानंदाने वापरलेला 'अनल्पधी' हा शब्द माझ्या काळजाला स्पर्श करुन गेला आहे आणि
मस्तकामधे कोरला गेला आहे.शिवराय अफजलखानाशी केवळ हातानी,केवळ शरीराने वा केवळ शस्त्रांनी लढले,असे नाही.ते त्याच्याशी बुध्दीने लढले
बुध्दी हेच शरिराच्या आणि शस्त्रांच्या लढाईचे अधिष्ठान होते.किंबहुना,त्यांच्या आयुष्यभरचा संघर्ष हा मूलत: बौध्दिक संघर्ष होता.तो शरीराच्या व शस्त्रांच्या माध्यामातून व्यक्त होत होता,ईतकेच .बुध्दीच सर्व कर्तृत्वाचे ऊर्जा-केंद्र असते.तीच सर्व पराक्रमांची जननी असते.जीभ,हात,किंबहूना एकूण शरीर आणि विविध शस्त्रे यांना आदेश,दिशा,नियंत्रण,अचूकता व विवेक देण्याचे काम बुध्दीच करते आणि शिवरायांकडे तर ती अनल्प होती! आज आम्हंला त्यांच्याकडून इतर गोष्टींबरोबरच या अनल्प बुध्दीचा वारसा घेण्याची- बुध्दीने लढण्याचे त्यांचे तंत्र आत्मसात केरण्याची गरज आहे !
- प्रच्चविद्यापंडत डॉ.आ.ह.साळुखे सर

मागील काही दशकापासून शिवरायच्या नावानी भडकवून आपली अल्प बुध्दीही नष्ट करुण टाकलेली आहे,आपली हालत डोके नसलेला चालत्या बोलत्या हिंस्त्र वळूप्रमाने केलेली आहे.पुढील पिढीनी मात्र शिवचरित्रातून शिवरायांची अनल्पधी( अनल्पधी = अल्प नाही ती बूध्दीमत्ता) आपल्या डोक्यात घेऊन आपल्या अल्प बुध्दीची वाढ करत राहावी आणि 'अनल्पधी' वाघ व्हावे.वेगवेगळ्या क्षेत्रात
शिक्षण ,व्यवसाय ,खेळ ,राजकारण , प्रशासन,आंतराळ यामधे अनल्पधीच्या जोरावर किर्ती आणि यशची शिखरे पार करावीत आणि

*आपल्या मुलांमधे अनल्पधी शिवचरित्र बीज पेरावेत* !!

#शिवरायकेवढेआकाशाएवढे


No comments:

Post a Comment

मराठे आणि अफगाण संघर्ष – उत्तर भारतातील वर्चस्वासाठीचा ऐतिहासिक सामना

  मराठे आणि अफगाण संघर्ष – उत्तर भारतातील वर्चस्वासाठीचा ऐतिहासिक सामना भारतीय इतिहासात मराठे आणि अफगाण संघर्ष हा अठराव्या शतकातील सर्वात मह...