जय जिजाऊ - जय शिवराय .
------------------------------------
------------------------------------------------------
नामोहरण करू पाहणारेच नामोहरण .
सुलतानशाह्याक्डून दक्षिण भारत स्वतंत्र करण्यासाठी शिवरायांनी स्वातंत्र्याचे बंड पुकारले होते . शिवरायांच्या जन्माच्यावेळेपावेतो दक्षिण भारतात प्रामुख्याने आदिलशाही , मोगलशाही , व कुतुबशाही , ह्या तीन सुलतानशाह्यांचे राज्य होते . बहामनी राज्यातील बिदरची बारिदशाही आदिलशहाने जिंकली होती . तर विदर्भाची इमादशाही अहमदनगरच्या निजामशहाने जिंकली होती व नंतर संपूर्ण निजामशाही शहाजीराजे भोसलेनी अनेक प्रयत्न करून देखील , मोगलशहा शहाजहानने जिंकली होती . त्यावेळी शिवराय केवळ ६ वर्षाचे होते . म्हणजे शिवराय ६ वर्षाचे असताना दक्षिण भारतात आदिलशाही , कुतुबशाही , व मोगलशाहीचा प्रभाव होता . तर विजयनगरच्या साम्राज्याचा र्हास होऊन प्रांताधिकारी म्हणून कार्यरत असलेले म्हैसूर , श्रीरंगपट्टम , मदुरा व तंजावर येथील प्रांताधिकारी राज्यपाल म्हणून सत्ताधारी बनलेले होते . शहाजीराजे आदिलशहाच्या सुभेदारीत राहून त्या राज्यपालांच्या प्रांतावर सत्ता प्रस्थापित करू लागले होते .
ह्याच अवधीत मोगलशहा शहाजहानने आपल्या दख्खनमधील सुभेदार महाबतखान बर्हाणपूर येथे मरण पावल्यामुळे त्या जागी तात्पुरता सुभेदार म्हणून नेमलेल्या खान - ए - दौराणच्या जागी , आपला राजपुत्र औरंगजेब यास दख्खनची सुभेदारी देऊन त्याला दख्खनमध्ये पाठविले . ही औरंगजेबाची इ.स. १६३६ ते १६४४ मधील ८ वर्षाची पहिली सुभेदारी . नंतर सुभेदार म्हणून दख्खनमध्ये पाठविलेल्या शायीस्तेखानाने आपल्या हाताची बोटे तोडून घेतल्यामुळे त्याजागी पुन्हा औरंगजेबास सुभेदार म्हणून पाठविले . ही औरंगजेबाची इस १६५२ ते १६५८ मधील पांच वर्षाची दुसरी सुभेदारी . पण औरंगजेबाला शिवरायांचे दमन करताच आले नाही . शिवरायांच्या मृत्यूनंतर ' अबुल मुजफ्फर मुहिउद्दिन मुहम्मद औरंगजेब बहादूर आलमगीर पादशहा गाजी ' एव्हढा लांबलचक किताब धरण करणारा औरंगजेब आपले दिल्लीचे तख्त सोडून दक्षिण भारत ताब्यात घेण्यासाठी दख्खनमध्ये पंचवीसवर्षे ठाण मांडून राहिला . शेवटपर्यंत दिल्लीचे तख्त सोडून दख्खनमध्येच [ अहमदनगर येथे सं,१७०७ मध्ये .] त्याला आपला प्राण सोडावा लागला . तरी देखील ताराबाईनेसुद्धा संपूर्ण दक्षिणभारत औरंगजेबाच्या ताब्यात मिळू दिला नाही .
शिवरायांना नामोहरण करण्यासाठी आलेल्या मिर्झाराजे जयसिंह यांस पुरंदरचा तह घडून आणून शिवरायांनी त्यला पायबंद केला . त्याला देखील शिवरायांचे पूर्ण दमन करता आले नाही . शेवटी उत्तर भारतातील हिंदू - राजा असलेल्या मिर्झाराजा जयसिंगाला सुभेदारीत राहून शिवरायांची दख्खन भूमी असलेल्या अहमदनगर येथे प्राण सोडावा लागला .
शिवरायांचे दमन करण्यासाठी आलेल्या शायीस्तेखानास पुण्याच्या लाल महालात आपल्या हाताची तीन बोटे व पुत्र अब्दुल फत्तेखान यांस गमवावे लागले . दख्खन मधील सुभेदार महाबतखान देखील अहमदनगरमध्ये '' शिवाजी , शिवाजी '' घोकत मरण पावला .
शिवरायांना ४ महिने पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकवून ठेवणाऱ्या सिद्दी जौहरच्या हातावर ' विर शिवाजी काशीदची तुरी ' देऊन शिवराय विशाळगडाकडे निसटून गेले . शायीस्तेखानाचा पाठपुरावा करण्याच्या उद्देशाने शिवरायांनी सिद्दी जौहरला शांत करण्यासाठी पन्हाळगडाच्या तहाची सिद्दी जौहरच्या हातावर आणखी एक तुरी दिल्यामुळे तो आनंदित झाला खरा पण जौहर शिवरायांना सामील झाला असावा , असा आदिलशहाला संशय येउन त्याने जौहरला मद्यातून विष देऊन ठार केले .
शिवरायांना '' जिवंत वा मृत हस्तगत '' करण्याचा विजापूरच्या दरबारात विडा उचलून आलेल्या अफजलखानाची कबर शिवरायांना प्रतापगडावर बांधावी लागली .
शिवरायांना नामोहरण करू पाहणारे आणखी तीन स्वकीय होते . त्यांना शिवरायांनी नामोहरण करण्याची कारणेही तशीच होती . ते स्वराज्य निर्मितीच्या कार्यातील देशद्रोही होते . म्हणून त्यांना ठार करण्यात आले . ते तीन देशद्रोही म्हणजे बाजी घोरपडे , दुसरा कृष्णा भास्कर कुलकर्णी व तिसरा चंद्रराव मोरे होय .
ह्या सगळ्या शिवरायांच्या शत्रूंनी शिवरायांच्या जीवावर बेतणारी महान संकटे उभी केली होती . शिवराय त्या महान संकटातून वेळोवेळी आपल्या बुद्धी चातुर्याने निभावले होते . शिवरायांना नामोहरण करू पाहणारे तेच शिवरायांच्या कर्मभूमीत रसातळाला गेले .

No comments:
Post a Comment