विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 8 March 2023

येसाजी कंक



येसाजी कंक
येसाजी वेलवंड खोर्याचे प्रतिष्ठित देशमुख होते.शिवाजीराजें तसेच शंभूराजेंचे जवळचे सहकारी होते.शिवाजीराजेंच्या दक्षिण दिग्विजयच्या मोहिमेत ते राजेंसोबत होते.छत्रपतीच्या आदेशानुसार येसाजीने गोवळकोंड्याचा बादशाह अबुलहसन कुतुबशाह याच्या मदमस्त हत्तीला आपल्या अतुल्य पराक्रमाने लोळवले होते.अनेक विजयी मोहिमेचे नेतृत्व येसाजींनी केले होते.
शिवाजीराजेंनंतर शंभूराजेंसोबत त्यांनी फोंड्याला पोतुर्गीजाना पाणी पाजले या युध्दाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे.गोवा जिंकल्यावर शंभूराजेंनी पोर्तुगीजशी तह केला होता.पण औरंगजेबने,कुडाळच्या सावंतने तसेच वेंगुर्ल्याच्या देसाईने,पोर्तुगीजांना फितवून फोंडा किल्यावर आक्रमण करावयास लावले.त्यावेळी फोंडा किल्याचा किल्लेदार येसाजी कंक हा होता.पोर्तुगीजांनी जोरदार आक्रमण करून फोंडा किल्यास भगदाड पाडले.यावेळी किल्यात फक्त आठशे मावळे होते.
पोर्तुगीजांनी किल्याच्या भगदाडातून आत प्रवेश केल्यानंतर येसाजी त्याचा पुत्र कृ्णाजी व मावळ्यांनी असा पराक्रम केला की पोर्तुगीजांची दाणादाण उडाली.पण पोर्तुगीजांची संख्या मोठी असल्यामुळे मराठ्यांचा टिकाव लागेना.याचवेळी शंभूराजें येसाजीच्या मदतीस एक हजार घोडदळ व तितकेच पायदळ घेऊन आले.त्यामुळे मराठ्यांना अधिक चेव चढला.मराठ्यांपुढे पोर्तुगीजांचा टिकाव लागला नाही त्यांचा पराभव झाला.या युध्दात येसाजी कायमचे जायबंदी झाले तर त्यांचा पुत्र कृष्णाजी युध्दात मारला गेला.या युध्दात पराक्रम गाजविल्याबद्दल शंभूराजेंनी येसाजीस एक हजार होन नेमणूक देऊन त्यांचा सन्मान केला.
सदर फोटो मध्ये दिलेली तलवार हि येसाजी कंक यांचीच आहे.
टिप येसाजी कंक यांच्या जवळील एकही तलवार पासष्ट किलोची नाही
मराठयांचा इतिहास असतानाच सुवर्ण अक्षरांनी लिहावा असाच आहे त्यात कोणी अधिकच "घरकुल" वापरून बेचव करण्याचा प्रयत्न करू नये असे लोक खऱ्या पराक्रमाला अतिशयोक्तीची धार चढवून दैवी करण्याचा प्रयत्न करतात हे लक्षात घेतले पाहिजे

 

No comments:

Post a Comment

मराठे आणि अफगाण संघर्ष – उत्तर भारतातील वर्चस्वासाठीचा ऐतिहासिक सामना

  मराठे आणि अफगाण संघर्ष – उत्तर भारतातील वर्चस्वासाठीचा ऐतिहासिक सामना भारतीय इतिहासात मराठे आणि अफगाण संघर्ष हा अठराव्या शतकातील सर्वात मह...