विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 8 March 2023

छ.शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या अधिका-यांना लिहलेले पत्र ....!


छ.शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या अधिका-यांना लिहलेले पत्र ....!

दुरदृष्टीच्या विचारवंताना ही गोष्ट माहित असावी गेली तीन वर्ष बादशहाचे प्रसिद्ध सेनापती आणि अनुभवी कारभारी या भागात येत आहेत. माझा मुलुख आणि किल्ले जिंकूण घ्यावे अशी बादशाहने त्यांना आज्ञा केली. या आज्ञेच्या उत्तरात ते बादशहाला लिहून कळवितात की, “ हा मुलुख आणि किल्ले लवकरच हाती येतील” अपार कष्टरूपी घोडादेखील या कठीन मुलखात संचार करू शकत नाही. हा मुलुख सर होणे अंत्यत कठीन आहे. हि गोष्ट त्यांना माहित नाही ? खोट्या गोष्टी बादशहाकडे पाठवण्याची त्यांना लाजही वाटत नाही. उलट ते सत्य गोष्टी वा-यावर सोडून देतात. ते खरी वस्तुस्थिती लिहून पाठवतील तर श्रेयस्कर होईल. माझा देश म्हणजे उघड्या आणि विशाल मैदानात असलेली बीदर आणि कल्याण ही स्थळे नव्हेत कि मोर्चे लावून हल्ले चढवून जिंकून घेणे शक्य होऊ शकेल.

माझ्या मुलखात पर्वताच्या रांगा आहेत. त्या दोनशे फर्संग लांब चाळीस फर्संग रूंद आहेत. माझ्या मुलखात ओलांडण्यास अवघड असे नद्या नाले आहेत. अत्यंत मजबूत असे साठ किल्ले बांधण्यात आले आहेत. काही किल्ले समुद्रकाठावर वसले आहेत. म्हणून आदिलशाकडून अफजलखान हा प्रचंड सैन्यानिशी आला. तो असमर्थ बनून नाश पावला. जी काही वस्तुस्थिती आहे ती तुम्ही बादशहाला लिहून का कळवित नाही.यामुळे तुमचे नाश होण्याचे टळेल.

अफजलखानाच्या मृत्यूनंतर अमीरूलउमरा शायिस्ताखान हा उंच पर्वतांनी खोल द-यांनी व्यापलेला जो माझा मुलुख , त्यावर चालून आला. त्याने प्रयत्नाची पराकष्टा केली. अगदी अल्पावधीतच मी शिवाजीचा पराजय करून त्याचा मुलुख जिंकून घेईन असे बादशहाला कळविले. हा खोट्या वृत्तीचा जो व्हायचा तोच परिणाम झाला. त्याची फजिती होऊन त्याला निघून जावे लागले. हि गोष्ट सुर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे.
#महाराष्ट्र 

No comments:

Post a Comment

मराठे आणि अफगाण संघर्ष – उत्तर भारतातील वर्चस्वासाठीचा ऐतिहासिक सामना

  मराठे आणि अफगाण संघर्ष – उत्तर भारतातील वर्चस्वासाठीचा ऐतिहासिक सामना भारतीय इतिहासात मराठे आणि अफगाण संघर्ष हा अठराव्या शतकातील सर्वात मह...