होळकर घराण्याचे संस्थापक असलेल्या मल्हारराव होळकर यांचा जन्म दि. १६ मार्च १६९३ रोजी पुण्याजवळील होळ मुरूम गावी झाला.मल्हाररावाच्या वडिलांचे नाव खंडूजी वीरकर असून ते होळ गावी चौगुल्याच्या वतनावर होते. मल्हारराव तीन वर्षांचा असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले. पश्चात भाऊबंदांनी वतनावरून त्रास दिल्याने लहानग्या मल्हारीची आई जिवाई, त्यास घेऊन आपल्या भावाच्या आश्रयार्थ परगणे सुलतानपूर येथील तळोदे गावी गेली.
मल्हाररावचा मामा भोजराज बारगळ त्यावेळी कंठाजी कदमबांडे यांच्याकडे मुलूकगिरीला होता.भोजराज बारगळ हे 25 स्वारांचे मुख्य होते.शिवाजी सुत भोजराज बारगळ हा त्यांचा शिक्का होता.मल्हाररावांची हुशारी आणि कर्तबगारी पाहून बारगळ मामांनी आपल्या मुलीच गौतमीबाई यांच लग्न मल्हाररावांशी लावून दिल.पहिल्यांदा लहान लहान लढाया मध्ये मल्हाररावांनी आपलं शौर्य गाजवल.
प्रधान बाळाजी प्रधान यांच्या सोबत कायम हुजरातीची फौज असे,ही फौज म्हणजे राजांच्या रक्षणासाठी खास असलेली फौंज.या फौजेचे नेतृत्व प्रधाना कडे असायचे.एकदा प्रधान बाळाजी आणि कदमबांडे यांच्या सैन्याचा थोडासा वाद झाला तेव्हा तो वाद मल्हाररावांनी अतिशय सहज मिटवला आणि मोठी हानी वाचवली.
थोरल्या शाहू राजांनी 1719 मध्ये दिल्ली मोहीम काढली होती.त्या मोहीमेत मराठ्यांनी पराक्रम गाजवत दिल्लीतून महाराणी येसूराणी आणि इतर राज कुटुंबियांची सुटका सोबत खूप साऱ्या भागाची चौथाई वसुलीची सनद आणली होती.
याच मोहिमेत सेनापती दाभाडे,जाधव,भोसले सह अनेक सरदार,सेनापती सहभागी होते.या मोहिमेत बाळाजी प्रधाना यांनी पांढरे सरदार यांना सोबत घेतलं.पांढरे आणि बारगळ यांच्यात मैत्रीपूर्व संबंध असल्याने बारगळ यांनी मल्हारराव होळकर यांना सोबत घेतलं होतं.
या मोहिमेचा तळ एका रानात पडला होता आणि नेमका बाळाजी प्रधानचा मुलगा बाजीराव आणि मल्हाररावांचा वाद झाला.रागात मल्हाररावांनी बाजीरावाला ढेकूळ फेकून मारलं.वाद अजून वाढला.बाजीराव आणि मल्हारराव समोरासमोर आले.मल्हाररावांनी बाजीरावाला चांगली शिकस्त देत बाजीरावाच्या छातीत भाला रोवला.ऐन भांडणात पांढरे सरदारांनी मद्यस्थि केली.बाजीरावाच्या जिवावर आलेला प्रसंग थोडक्यात निभावला. मल्हारराव होळकरांच्या या धाडसाने बाळाजी प्रधान आणि बाजीराव चांगलेच प्रभावित झाले.पुढं बाळाजीच्या मृत्यू नंतर बाजीराव आणि मल्हारराव यांच्यात चांगले मैत्रीचे संबंध आले. 1720 मध्ये झालेल्या बाळापूरच्या युद्धात निजाम विरुद्ध मराठांच घनघोर युद्ध झालं त्यात मल्हाररावांनी खूप पराक्रम गाजवला होता.बाजीराव प्रधान झाले तेव्हा त्यांनी 1721 मध्ये कदमबांडे यांना विनंती करून मल्हाररावांना स्वतःच्या सैन्यात घेतलं.
मल्हाररावांनी माळवा प्रांतात चांगली कामगिरी केली.आपल्या पराक्रमाचा जोरावर मुघल आणि निजाम यांच्यावर चांगलाच दबाव टाकला.1723 ला शाहू राजांनी पेशव्यांच्या मार्फत मल्हारराव होळकरांचा योग्य सन्मान करत त्यांना इंदोर सरंजाम म्हणून दिल आणि मल्हारराव होळकर शाहू राजांचे सरंजामी सरदार झाले.पुढं शाहू राजांनी 1727 मध्ये मल्हाररावांनी सरंजाम खर्चासाठी माळवा आणि खांदेश मध्ये 11 परगणे दिले होते.
पुढं मल्हाररावांनी आपल्या मनगटाच्या बळावर आपलं स्वतंत्र राज्य निर्माण करत मराठी साम्राज्याचा जरी पटका भगवा हिंदुस्थानात मोठ्या दिमाखात फडकवला.
(संदर्भ-मल्हारराव होळकर-मु.वा. बर्वे माहितीस्रोत-सरंजामी मरहट्टे)
उपाध्यक्ष पुणे जिल्हा मराठा महासंघ इतिहास परिषद

No comments:
Post a Comment