विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 4 April 2023

सरदार त्रिंबकजी डेंगळेंचे उत्तरआयुष्य

 

सरदार त्रिंबकजी डेंगळेंचे उत्तरआयुष्य 

 

ब्रिटिश सत्तेविरुद्ध दीर्घकाळ संघर्ष करणाऱ्या पेशव्यांचे कारभारी त्रिंबकजी डेंगळेंचं नंतर काय झालं ?, त्यांना इंग्रजांनी कुठे ठेवलं?, त्यांचे कैदेतील दिवस कसे होते ?, त्यांचा मृत्यू कधी व कसा झाला? या सर्व प्रश्नांचा ससंदर्भ घेतलेला वेध …

3 जून 1818 ला श्रीमंत दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी अशीरगडाजवळील ‘धुळकोट’ येथे जनरल माल्कमसमोर शरणागती पत्करली व पेशवाईचा परिणामी मराठेशाहीचा अस्त झाला. शेवटपर्यंत त्रिंबकजींनी पेशव्यांची साथ सोडली नव्हती. त्यावेळी अशीरगडावर असणाऱ्या त्रिंबकजींना पकडण्यासाठी कर्नल डोव्हटनने फौज पाठवली. किल्लेदार यशवंतराव लाडांच्या मदतीने त्रिंबकजी अशीरगडावरून पळाले व दक्षिणेत आले. इंग्रजांनी त्रिंबकजींचा शोध सुरू केला व त्याला शोधून देणाऱ्यास इनाम जाहीर केले.

त्रिंबकजी त्याची सासुरवाडी अहिरगाव (ता.निफाड, जि.नाशिक) येथे गुप्तपणे राहत असल्याची खबर अहिरगावचा पाटील जयाजी याने 28 जून 1818 ला मालेगावला इंग्रजांना दिली. त्यावेळी कॅप्टन ब्रिग्ज खानदेशात होता, त्याने कॅप्टन स्वान्स्टनला त्रिंबकजींना पकडण्यासाठी धाडले. स्वान्स्टनच्या नेतृत्वाखालील 800 घोडेस्वारांच्या फौजेने दुसऱ्या दिवशी (29 जून 1818) भल्या सकाळी चांदवड मार्गे अहिरगाव गाठले व त्रिंबकजींना कैद केले. त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली. त्यांना प्रारंभी चांदवड व नंतर ठाणे येथील तुरुंगवजा किल्ल्यात कैदेत ठेवण्यात आले (जिथून ते सप्टेंबर 1816 ला मोठ्या शिताफीने निसटले होते). काही महिने त्रिंबकजी ठाण्याच्या तुरुंगातच होते परंतु तेथूनही त्यांची गुप्तपणे सुटका करण्याची काही कारस्थानं इंग्रज सरकारच्या कानावर आली, त्यामुळे त्यांना मराठी मुलखात ठेवणे धोक्याचे वाटून त्यांना कलकत्त्याला पाठवण्याचे सक्त आदेश कलकत्त्याच्या गव्हर्नर जनरलने एलफिस्टनला दिले. 5 एप्रिल 1819 ला त्रिंबकजींनी ठाणे सोडले व मुंबईहून त्यांना समुद्रमार्गे बोटीने कलकत्त्याला नेण्यात आले व त्यानंतर त्यांची रवानगी ‘चुनार’च्या किल्ल्यात करण्यात आली.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...