विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 22 April 2023

#शाहू_काळातील_धर्मांतर_शुद्धी #हिंदनृपती_कथा_शंभूपुत्राची

 


#शाहू_काळातील_धर्मांतर_शुद्धी
थोरले शाहू राजे म्हणजे मराठा इतिहासात सर्वात जास्त काळ राज्यकारभार केलेला एकमेव राजा.आपलं प्रशासन कौशल्य,बुद्धिमत्ता आणि योग्य ठिकाणी योग्य माणूस नेमून अतिशय शांत डोक्यांने सातारा मध्ये बसून दिल्लीच राजकारण चालवणारे महान छत्रपती.शाहू राजांचा इतिहास हा जास्त लोकांना माहीत नाही,42 वर्ष हिंदुस्थानभर सत्ता गाजवणाऱ्या धर्मवीर संभाजी राजांच्या मुलाचा म्हणजे थोरल्या शाहू राजांच्या जाज्वल इतिहासावर मात्र इतिहास कारांनी अन्याय केला आहे.मोजकीच हाताच्या बोटावर मोजता येणारी पुस्तके सोडता शाहू राजे यांना इतिहासाने गायबच करून टाकलंय.शाहू राजांचा कागदांच्या आड लपलेला इतिहास आम्ही आज बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत.
भारत हा हिंदूंचा देश म्हणून ओळखला जातो.हिंदू धर्म हा प्राणापेक्षा जास्त जपला जायचा आणि आजही जपला जातोय.इस्लामिक राज्यकर्त्यांनी बऱ्याच हिंदू ची धर्मांतरे करून त्यांना मुस्लिम बनवण्याचा प्रयत्न केला.त्यात छत्रपती शिवाजी राजांनी मुस्लिम किंवा इतर धर्मांत जबरदस्ती धर्मांतर केलेल्या लोकांची धर्मशुद्धी करून त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेतलं.पुढं धर्मवीर संभाजी राजांनी सुद्धा धर्मशुद्धी करण्याचे प्रयोग केले,हे सर्वांना माहीत आहे.
थोरले शाहू राजांच्या काळात सुद्धा धर्मशुद्धी केली जायची.चांभारगोंदे गावचा पुताजी वाडगर म्हणून एक शिलेदार सरलष्कर दावलजी सोमवंशी यांच्या सैन्यात कामाला होता.दावलजी सोमवंशी यांना 1715 मध्ये शाहू राजांनी सरलष्कर बनवलं होत.सुरत प्रांतात दावलजी मुलूखगिरीला गेले तेव्हा मुघलांनी हल्ला चढवला होता त्यात काही लोक कैद करून नेली होती त्यात मुधोजी वाडगर याचा मुलगा पुताजी वाडगर याला कैदी बनवून दिल्ली ला नेला आणि तिथं त्याच धर्मांतर करून त्याला सैन्यात नोकरीला ठेवला.एक दीड वर्ष त्यांनी तिथं नोकरी केली आणि 1719 साली शाहू राजांनी दिल्ली मोहीम आखली ती यशस्वी झाली त्या मोहिमेत हा पुताजी वाडगर बाळाजी विश्वनाथ प्रधान यांच्या सैन्यात सामील झाला आणि पळून आपल्या गावात गेला.मुस्लिम धर्म हा त्याने स्वतः स्वीकारला न्हवत त्याला जबरदस्ती मुस्लिम बनवलं होत म्हणून त्याची धर्मशुद्धी व्हाही आणि त्याला पुन्हा त्याच होत ते इनाम,जमीन आणि प्रतिष्ठा मिळावी म्हणून त्यांच्या जवळच्या सर्व लोकांनी शाहू राजांकडे विनंती अर्ज पाठवला होता.
पुताजी याला परत धर्मात ग्यावे म्हणून चांभारगोंदे गावचे दिपाजी मोकदम,पळसदेव गावचे गोमाजी काळे मोकदम,हिंगणी गावचे भगवंत मोकदम,दिवेगव्हान चे मकाजी मोकदम, राशीन चे साबाजी देशमुख मोकदम,शेटफळ गावचे राघोजी मोकदम,पेडगावचे येमाजी मोकदम,कुंभारगावाचे बाबाजी मोकदम या आसपासच्या गावातील मोकदम व गोतांनी शाहू राजांकडे1720-21च्या आसपास विनंती अर्ज केला.
शाहू राजांनी वरील सर्व मोकदम,गोतांना सूचना केल्या पुताजी हा जबरदस्ती ने धरून धर्मांतर केल्याने त्याची त्यात काही चूक नाही म्हणून सर्वांनी मिळून त्याची धर्मशुद्धी करून त्याला त्याची पूर्वी चालत असलेली मालमत्ता व इनाम परत देऊन त्याला आपल्यात सामावून घेण्यात यावे.
शाहूकाळ हा सुद्धा हिंदू धर्मासाठी सुवर्णकाळ होता.शाहू राजांनी हिंदू देवता आणि धर्मकार्यासाठी 18लक्ष रुपयांचा खर्च रुपयांचा राखीव निधी पंत प्रतिनिधींच्या ताब्यात राखून ठेवला होता.दक्षिणकाशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या संगम माहुली ला तीर्थ क्षेत्राचा दर्जा देऊन कितीतरी ब्राह्मण लोकांना उद्धार शाहू राजांनी केला.
संदर्भ- थोरले शाहू छत्रपती यांची रोजनिशी

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...