छत्रपती थोरले शाहू राजे म्हणजे स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारे महान राज्यकर्ते.थोरले शाहू राजे यांनी 18 वर्ष मुघलांच्या कैदेत काढली,ओरंगजेब मेल्यावर त्यांची सुटका झाली.ताराराणी यांनी शाहू राजांना सुरवातीला विरोध केला पण त्या परिस्तिथी ला तोंड देत अवघ्या एका वर्षात शाहू राजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला,राजकारणाची प्यादी अशी फिरवली की सत्ता आणि बुद्धी च्या जोरावर अवघ्या 10 वर्षात दिल्ली च्या बादशाहची त्याच्याच दरबारात त्याच्याच लोकांकडून हत्या घडवून आणली.तब्बल २९वर्ष मुघलांच्या कैदेत असलेला राजपरिवार सोडवला.शिवाय दिल्ली च्या हिरव्या परचेम च्या असुरक्षेला भगवा लालकिल्ल्यावर फडकवला.हे सर शक्य झालं ते शाहू राजांच्या विलक्षण प्रशासन आणि मुत्सद्दी राजकारणामुळे.42 वर्षं धर्मवीर संभाजीपुत्र थोरले शाहू यांनी अखंड हिंदुस्थान वर राज्य केलं त्यामुळे निजाम त्यांना हिंदपती म्हणतो.
इतका पराक्रमी धोरणी आणि प्रजाहितदक्ष राजा या भूमीत झाला पण इतिहासाने मात्र त्याच्या पराक्रमाची नोंद ठेवली नाही.इतिहासाने त्यांना चैन करणारा राजा,सत्ता भोगणारा राजा,विलासी जीवन जगणारा राजा म्हणून त्यांचा पराक्रम झाकण्याचा प्रयत्न केला पण शाहू राजे मात्र लढवय्ये होते.
शाहू राजे मृदू स्वभावाचे होते पण तितकेच आक्रमक सुद्धा होते.त्यांच्या बोलीत गोडवा होता तितकाच तिखटपणा होता.
औरंगजेबाच्या कैदेत असताना सुद्धा शाहू राजांनी पराक्रम गाजवल्याचे संदर्भ उपलब्द आहेत.1706 च्या सुमारास औरंगजेब यांनी शाहू राजांना नसरतजंग खान आणि तरबियतखान म्हणजे झुल्फिकार खानासोबत कोंढाणाच्या मोहिमेवर पाठवलं होत.
शिवाय जुल्फिकार च्या शेजारी शाहूंच्या तंबूची सोय करून शाहू राजांना एक खास पोशाख आणि मौल्यवान वस्तू भेट दिल्या होत्या.दुर्दैवाने कोंढाणा अलगद मोठी रक्कम देऊन हातात आला.
शिवाय 1705 मध्ये औरंगजेबाच्या सैन्यातील हमीदखान आणि फिरुजगंज ह्या सरदारांच्या मध्ये वाद झाला.तो वाद सोडवण्याची जबाबदारी बादशहाने शाहू राजांवर सोपवली होती.या वरून शाहू राजांना दरबारात असलेला दर्जा आपण लक्षात घेऊ शकतो.
1703 मध्ये शाहू राजांना सोन्याची पंची, पाच हिरेजडित अंगठ्या,रत्नजडित खंजीर आणि एक घोडा भेट देऊन शाहू राजांचा गौरव केल्याचे उल्लेख मिसिरी मध्ये आहेत.
शाहू राजे पराक्रमी तर होते यात शंका नाही पण शाहू राजे कैदेत असताना सुद्धा लढवय्ये होते.मुघलांच्या कैदेत असताना शाहू राजे हे आपली प्रतिष्ठा,मान, मर्यादा पाळून होते.शाहू राजांच्या सुटकेनंतर शाहू राजांनी लोखंडे पाटलांशी केलेला संघर्ष, लढाई यांचे संदर्भ आहेतच शिवाय ताराराणी च्या बाजूने धनाजी जाधव,बालाजी भट भीमा नदीतीरावर शाहू राजांना अडवे येऊन युद्ध प्रसंग घडला तिथं शाहू राजांनी आपली तलवार चांगलीच गाजवली होती.त्यामुळे शाहू राजांना विलासी राजा ,चैन करणारा राजा,लढाई न करणारा राजा ह्या गोष्ठी सांगून बदनाम केलंय ते साफ चुकीचं आहे.
संदर्भ- औरंगजेबनामा,मशिरी
माहिती स्रोत-छत्रपती संभाजी महाराज -वा सी बेंद्रे
चित्र साभार - #karan_waghole

No comments:
Post a Comment