विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 21 April 2023

#छत्रपती_थोरले_शाहू_महाराज #हिंदनृपती_कथा_शंभुपुत्राची

 


#छत्रपती_थोरले_शाहू_महाराज
एक 24-25 वर्षाचा तरुण कैदेतून सुटून महाराष्ट्रात येतो,बरं येतो खरा पण तो आपल्याच भूमीत सुरक्षित नाही,स्वतःची रक्ताची माणस त्याच्या रक्ताने तहान भागवायला त्याच्या शोधात आहे.त्याला तोतया समजून त्याला संपवण्याच्या विचारात आहेत,हुकूम निघालाय आणि बेल भंडारा उचलून शपथा दिल्यात "खरा असेल तर सापडेल तिथं मारून टाका".
कुणा वैर्याच्या वाट्याला न यावं असा प्रसंग आहे.त्या तरुणाच्या मनाची अवस्था काय असेल,त्यानं 28 वर्ष कैदेत जीवन घालवलंय पण तो निराश नाहीये त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आहे आणि डोळ्यांपुढं एकच स्वप्न आहे ते म्हणजे स्वतःच गेलेलं वैभव,स्वतःची हरवलेली माणसं शोधायची,पुन्हा एकदा त्याला स्वतःच राज्य निर्माण करायचं आहे.त्याच्या हृदयात प्रचंड वेदना आहेत.18 वर्ष कैदेत असताना त्याने असंख्य संकटाचा सामना केलाय,त्याच्या काळजात आग पेटलीये 'माझी आई जन्मदात्री,माझी गुरू,माझं सर्वस्व,माझी भावना,माझा आधार अजूनही कैदेत आहे तिला सोडवायच आहे'.
प्रचंड धर्माभिमानी एक वेळ प्राण देईल पण धर्म बदलणार नाही हे ठणकावून शत्रूला सांगणारा हिम्मतबाज तरुण मायभूमीत येतोय.साऱ्या जवळच्या लोकांना जवळ करण्याचा प्रयत्न करू लागलाय.माणसं जवळ येऊ लागली.त्याच्या मनात सुद्धा आता जिंकण्याची आशा निर्माण होऊ लागली.पाहता पाहता आप्त स्वकीय जवळ येऊ लागले.
ज्यांनी सावरायला पाहिजे,ज्यांच्या खांद्यावर सगळं साम्राज्य सांभाळायला दिल होत तेच आता जीवावर उठले होते.पहिलाच प्रयत्न पारद गावच्या परिसरात झाला पाहिलं युद्ध त्या तरुणांन जिंकल आणि आपल्या विजयाची,नवनिर्मिती ची सुरवात मोठ्या जल्लोषात केली.
पूर्वजांच्या स्वाभिमानाची,पराक्रमाची,शौर्याची,त्यागाची आग त्याच्या आईने त्याच्या काळजात पेटवली होती.तिला आता हळूहळू निष्ठावंत सहकाऱ्यांची साथ मिळू लागली आणि अवघ्या एका वर्षात तो 26 वर्षाचा तरुण हिंदवी स्वराज्याचा छत्रपती झाला.सातारा किल्ल्यावर स्वतःची राजगादी निर्माण केली.स्वतःच छत्र निर्माण केलं.पूर्वजांच्या इतिहासाचा वारसा जिवंत ठेवत त्यानं गरूडभरारी घेतली.
'न भूतो न भविष्यती' असा प्रवास करत 18 वर्ष ज्या मुघलांच्या कैदेत हाल अपेष्ठा सहन करत ऐन उमेदीचा काळ घालवला त्याच मुघलांच्या दिल्लीचा बादशहा अवघ्या 12 वर्षात हाताच्या बोटांवर नाचवायच सामर्थ्य मोठ्या कल्पकतेन मिळवलं.आपल्या पित्याच्या मृत्यूचा बदला घेत भर दरबारात दिल्लीपती चे डोळे काढले.400-500वर्ष अखंड हिंदुस्थानवर राज्य करणाऱ्या मुघल सत्तेच शिंहासन परत खिळखिळ करून सोडत,दिल्ली ची सत्ता आपल्याला हवी तशी वाकवून आपल्या आईची 29 वर्षानंतर सुटका करून घेतली.संबंध महाराष्ट्रात चाललेली घरणेशाहीतील भांडण मिटवली सारा मुलुख एक केला.
भगव्याला संपवायला आलेल्या मुघलांच्या हिरव्या परचेमला टिकवून ठेवण्यासाठी त्या लाल किल्ल्यावर अभिमानाने भगवा फडकवत ठेवला.आपल्या राज्यातली रयत सुखी ठेवली.आपल्या रणनीती कौशल्याचा,राजकानाचा वापर करत पराक्रमाची शर्थ करणाऱ्या सामान्य सैनिकाला सुद्धा राजा बनवण्याची ताकद दिली अन भीमथडी घोड्यांनी पाहता पाहता अखंड हिंदुस्थान त्या तरुणांच्या नेतृत्वाखाली भगवामय केला.
प्रचंड तणाव,कोणाचाही आधार नाही,खचलेला तरुण, एकटाच उभा राहतो.लढतो,झुंजतो, संघर्ष करतो पण आपलं ध्येय साध्य करतो आणि ज्या दिल्लीपती च्या कैदेत 18 वर्ष घालवली त्या दिल्लीच्या सिंहासनाला आपल्या घरातून हवं तसं झुकवतो.
एखाध्या चित्रपटाला शोभेल अशी ही कथा आहे.खरंच ही कथा आहे पण तितकीच ती सत्य कथा आहे.धर्मवीर छत्रपती संभाजी राजांच्या मुलाची छत्रपती थोरले शाहू राजांची ही कथा आहे.इतिहासाने आमच्या पासून लपवलेली ही एक सत्य कथा आहे.उध्वस्त स्वराज्याच सराज्यात रूपांतर करणाऱ्या थोरल्या शाहू राजांची ही कथा आहे.राजनीती धुरंधर,प्रजाहितदक्ष,देव,देश,धर्माभिमानी राजा,धर्म सहिष्णू राजा,स्त्री शक्तीचा गौरव करणारा महान राजा आणि शत्रूला सुद्धा आपल्या तेजाने जिंकून घेणारा अजातशत्रू राजा छत्रपती थोरले शाहू महाराज यांची कथा.पराक्रमी,धोरणी,मुत्सद्दी आणि कर्तृत्वाने श्रेष्ठ असलेल्या सैनिकांमधून राज्यकर्ते घडवणारा राजा.
सह्याद्रीच्या कुशीतुन हिमालयाचा झुकवायच स्वप्न पाहून हिमालया सोबत समुद्र सुद्धा झुकवणाऱ्या तमाम मराठी अभिमानी मावळ्यांची ही सत्य कथा आहे.

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...