1] आंग्रे = चंद्रवंश.गोत्र गार्ग्य. कुलदैवत उमा-महेश्वर.विजयी शस्त्र तलवार.लग्नात देवक पंचपल्लव आणी मंत्र गायत्रीमंत्र.गादी कोकण 17वे शतक आणी प्रसिद्ध आरमाराचा राजा ज्याला म्हटले जाते ते सरखेल कान्होजी आंग्रे याच कुळातील होत. उपकुळे= अंधारे, करांडे,सरदार,सबकाळ,सपकाळ.
2]आंगण = हे 96 कुळातील चंद्रवंशी कर्दम-कदम कुळातुनच आलेले कुळ आहे. वंश चंद्रवंश.गोत्र दुर्वास. कुलदैवत तुळजाभवानी. मुळ गादी पलाशिका. लाल सिँहासन, छत्र, निशाण वारु आणी ध्वजस्तंभी सुर्य. विजयी शस्त्र तलवार. वेद ऋग्वेद. देवक कळंब किँवा केतकी. मंत्र गायत्रीमंत्र. राजाचे नाव इंदुवर्मा. उपकुळ= आवटे,कनोजे, घोलप, रणधिर,जघने.
3] इंगळे = हे कुळ चालुक्य वंशातुन निघालेली ही शाखा आहे. दक्षिणचे काही इंगळे भारद्वाज गोत्री आहेत.इंगळासारखे लाल तेजस्वी ते इंगळे. वंश चंद्रवंश. गोत्र भारद्वाज.कुलदैवत ब्रह्मनाथ. देवक कमळ. पिवळे सिँहासन पिवळे छत्र पिवळे निशाण पिवळा वारु आणी ध्वजस्तंभी चंद्र किँवा हानुमान. वेद यजुर्वेद. मंत्र गायत्रिमंत्र. उपकुळे= कावळे,जंगले,ढेपे,कनवजे,चिकटे आदि.
4] कर्दम-कदम-कदंब = मध्य आशियामधिल कर्दम नदिच्या नावावरुन कर्दम-कदंब-कदम हे नाव पडलेले आहे.कदम कुळ हे सुर्य व चंद्रवंश या दोन्ही वंशात आढळते.
** सुर्यवंशातील कर्दम-कदम कुळ = pre-historic काळादरम्यान सरस्वती नदीच्या तिरी सुर्यवंशातील राजा प्रुथु हा कर्दम-कदम कुळातील प्रसिद्ध राजा होऊन गेला. तसेच राजा पलाक्षवरतान हा देखिल सरस्वती नदीच्या तिरी आणी कालीवंगण हा घग्गर नदिच्या तिरी होऊन गेले.महाभारतकाळात जे सारस्वत राज्य होते ते याच कुळाचे होते.
** राजा प्रुथु = हा सुर्यवंशी क्षत्रिय राजा वेण्णा/वेणु याचा पुत्र होय. याने वेदाचे संपुर्ण अध्ययन करुन त्यास राजाश्रय देऊन वेदांचा प्रसार केला.शुक्र हे त्याचे गुरु होते, वालाखिल्यास त्याचा सल्लागार व गर्ग ऋषि त्याचा भविष्यकार होता. त्याची वंशावळ = विराज-किर्तीमत-कर्दम-अंग-अतिवला-वेणा/वेणु-प्रुथु. प्रुथुचे वंशज पुढे सुर्यवंशातील कर्दम-कदंब-कदम गणले गेले.याच कदम वंशाचे मुळ गादी कंदाहार,दुसरी गादी वनवास, 4थ्या शतकात मुंगी पैठण,7 व्या शतकात गोवे आणी 13 व्या शतकात कर्नाटकात पलाशिका/हल्सी अशी उल्लिखेलेली आहे. तसेच महाभारत कालीन सारस्वत राज्यात कर्दम राजानी वैदिक कार्य सारस्वताना घेऊन मोठ्या प्रमाणात केले, त्याचप्रमाणे दक्षिणेत कर्दमराजे गोवे व कोकण भागात आपली राजगादी स्थापन केली त्यावेळी त्यांच्यासमवेत सारस्वत स्थालांतरीत झालेले आढळतात, म्हणुनच गोवे व कोकण भागात कदंबवंशीय राजासोबत सारस्वतांची संख्या जास्त आहे.
**कुलाचार= लाल सिँहासन लाल छत्र लाल निशाण लाल वारु आणी ध्वजस्तंभी सुर्य. कुलदैवत खंडोबा आणी कुलदेवी तुळजाभवानी. देवक सोने हाळद केतक किँवा कळंब. गोत्र भारद्वाज ऋषि तसेच काही कदमांचा गोत्र शिलालेखात मानव्य सांगितले आहे. वेद ऋग्वेद. मंत्र गायत्रि मंत्र. उपकुळे= धुमाळ, फडतरे,घोरडे,भिसे,गात,देवरे,कावळे,कोल्हे,कराळे,ताकट.
**चंद्रवंशातील कर्दम-कदंब-कदम कुळ = चंद्रवंशी बाल्हिक राजांचे जे वंशज कुरु राजे निर्माण झाले त्यात प्रजापती कर्दमा राजा प्रसिद्ध होऊन गेला त्याच्या वंशजाना कर्दमेय-कदंब-कदम म्हणुनच ओळखले जाते. ¤ रामायणात चंद्रवंशी कुरुकुलातील कर्दम राजांचा आलेला उल्लेख= The Ramayana seems to localize the uttarkurus in bahlika country. Accourding to it,ila son of Prajapati karddma {प्रजापती कर्दमा} ,king of bahlika country, gave up bahli in favor of his son sasabindu {शशबिँदु} and founded the city of pratisthana {प्रतिष्ठान-पैठण-पट्टण} in madyadesha. The prince of the alia dynasty {which is also the dynasty of kuru} have been called "KARDDAMEYA" {कर्दमेय-कर्दम-कदंब-कदम}. The Karddameyas obtained their names from the river kardama {कर्दमा} in persia and therefore, their homeland is identified with bahlika/bactria. This indicates that bahlika or bactria was the original home of the kuru clan and maratha kshatriya kardama-kadam clan." यावरुन हेच सिद्ध होते कि प्रसिद्ध कुरुवंश व मराठा क्षत्रिय कर्दम-कदम कुळ हे बाल्हिक जनसमुहातुन आलेले आहे. तसेच कर्दम राजा शशबिँदु याने प्रतिष्ठान-पैठण या शहरास आपली राजधानी बनवले. त्यामुळेच दक्षिणेतील काही कदम कुळे चंद्रवंशी आहेत कारण ते चंद्रवंशी असलेल्या कुरुकुळातुन आलेले कुळ आहे आणी ते दुर्वास गोत्री आहेत. तसेच वर वर्णन केलेले 96 कुळातील आंगण कुळ हे याच चंद्रवंशातील कर्दम-कदम कुळातुन आलेले आहे,त्यांचे गोत्र ऋषि दुर्वास आहेत. अशाप्रकारे मराठा क्षत्रिय कर्दम-कदंब-कदम कुळ हे प्राचिन बाल्हिक जनसमुहातुन आलेले प्रसिद्ध राजघराणे आहे.या राजघराण्याने दक्षिणेतील महाराष्ट्रात मुंगी पैठण,गोवा,कर्नाटकात पलाशिका/हल्शी व वनवासी येथे आपली राज्य स्थापुन साम्राज्य उभे केले आणी याच राजकुळाचे वंशज म्हणजे महाराष्ट्रातील 96 कुळातील कदम व आंगण कुळ होय. तसेच ऋग्वेद काळाती रट्टा-आरट्टा जनसमुहातुनच मराठा क्षत्रियांची निर्मीती झालेली आहे आणी बाल्हिक जनसमुह हा ऋग्वेदकालिन रट्टा जनसमुहातील भारट्टा-भारता जनसमुहातील प्रसिद्ध राजा भारत यांच्या वंशज जनसमुहातील आहे. *रामायणातील बाल्हिक समुहाविषयी वर्णन = "अरट्टा कपीशम बल्हीम ". तसेच काश्मीरचे संस्क्रुत आचार्य क्षेमद्रा यानी = "अरट्टा बाल्हीका कंबोजा ". तसेच अथर्ववेदातील वर्णन = "शकः कंबोजः यवनः परादास्था ! क्रुतवर्मा तु संहीताः अरट्टा बाल्हीकान् !! वनायुजनपार्वतीयानकंबौजः अरट्टा बाल्हीकान ! कंबौज विषये जातैर बाल्हीकाश्चैव हायोत्तोमः !! "
No comments:
Post a Comment