विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 3 June 2023

कोकण मोहिम

 

।।

कोकण मोहिमेत शिवाजी महाराजांनी सिद्धी जोहर सोबत पन्हाळगडावर तोफा डागणाऱ्या इंग्रजांची मस्ती राजापूरच्या वखारीची लूट करुन जिरवली. या लुटीत अनेक मौल्यवान वस्तु मिळाल्या त्यांची तपशिलवार यादी.।।
शिवाजी महाराज तुंगर्ण्यातुन तळकोकणात उतलले त्या वेळेस शाहिस्तेखान हा स्वराज्यावर चालुन आलाच होता. त्याच सुमारास शिवाजी महाराजांनी उंबरखींडीचा पराक्रम गाजवला होता. महाराज आता कोणकात उतरले होते. त्यांच्या सोबत तान्हाजी मालुसरे, पिलाजी शिर्के, त्र्यबकपंत इत्यादी सरदार होते. शिवाजी महाराजांनी निजामपूर लुटले, निजामपूराहुन महाराज आता दाभोळात आले. दाभोळात शिवाजी महाराजांनी दाल्भ्येश्वराचे दर्शन घेतले व लगेच दाभोळ ताब्यात घ्यायला चालु केले. महाराजांनी दाभोळ लुटुन तो मुलुख ताब्यात घेऊन पुढे सरकले. महाराजांनी दाभोळच्या बंदोबस्तासाठी २००० सेन्य ठेऊन ते चिपळूणला आले. तेथे महाराजांनी श्री परशुरामाचे दर्शन घेतले. येथे गोविंद जोशी बिन अनंत जोशी यांनी पुजा सांगितली. त्यानाच महाराजांनी परशुरामक्षेत्रीचे तिर्थोपाध्येपण देऊन सालिना पाऊनशे होनांचे वर्षासन करुन दिले व महाराज आता संगमेश्वरला आले. येथे येताच अदिलशाही अधिकारी महाराजांच्या भितीने पळुन गेले. जास्त काहि न करताच संगमेश्वर महाराजांच्या ताब्यात आले. तेथुन महाराज देवरुखास आले. येथून महाराजांनी पिलाजी निळकंठरावांसह, तानाजी मालुसरे यांना सेन्य सोबत देऊन संगमेश्वर ला रवाना केले. येथून आता शिवाजी महाराजांची संतप्त नजर वळली ति म्हणजे राजापूर कडे. कारण पन्हाळगड च्या वेढ्यात हेन्री रेव्हिंगटन याने सिद्धी जोहरला तोफा, तोफेंची दारु, तोफगोळे पुरविले तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने इंग्रजांचे निशान लावुन पन्हाळगडावर तोफा डागल्या होत्या. म्हणून महाराज इंग्रजांवर खुपच संतापले होते. शिवाजी महाराज ३००० पायदळ व १००० घोडदळासह राजापूर च्या वेशिवर येऊन थांबले. या वेळी मार्च महिन्याचा पहिला पंधरवडा सुरु होता. महारांजे सैन्य आता राजापूरात घुसले त्यानी मोठ्या मोठ्या व्यापाऱ्याना महाराजांच्या भेटिस बोलावले. त्या व्यापाऱ्यानी महाराजांनी खंडनी आनुन दिली.
महाराज आल्याचे कळताच इंग्रज वखारीचा प्रमुख हेन्री रेव्हिटनी डॉल्फ टेलर, रिचर्ड टेलर, फिलीफ गिफर्ड यांच्यासह साळसूदपणे महाराजांच्या भेटीसाठी आता! रेव्हिन्टनला पाहताच महाराजांचे माथे भडकले ! इंग्रजी बावटा फडकाबीत पन्हाळगडी महाराजांवर तोफ डागणारा रेव्हिंग्टन महाराजांच्या आज्ञेनुसार क्षणार्धात कैद झाला त्याचे तीन साथीदारही मराठ्यांनी पकडले. या कैद्यांची रवानगी सोनगडावर केली गेली, इंग्रजांची सारी संपत्ती लुटण्याची व जप्त करण्याची आशा महाराजांनी केली. महाराजांच्या आज्ञेनुसार सूडाने पेटलेले मराठे आता इंग्रज चखारीवर तुटून पडले. इंग्रजांच्या वखारीची पाहता पाहता नागवणूक केली गेली. इंग्रजांनी पुरून ठेवलेला खजिना शोधून काढण्यासाठी मराठ्यांनी बखारीची जमीन कुदळीने खणून काढली. " इंग्रजांची सुमारे २३-२४ हजार होनांची लूट मराठ्यांनी केली. शिवाय फॅरन, नेपियर, सॅम्युएल, बर्नार्ड इत्यादी इंग्रजांना त्यांनी कैद करून महाराजांकडे आणले. या कैद्यांची रवानगी काही दिवसानंतर वासोटा गडावर केली गेली. या कैद्यापैकी नेपियर व बर्नार्ड हे राजापूरच्या कैदेतच मृत्यू पावले, इराण व मस्कतचे व्यापारी आपल्या मालाची विक्री करण्यासाठी राजापूरला आले होते. त्यांचीही मराठ्यांनी लूट केली.
" राजापूरच्या लुटीत महाराजांना सोन्याच्या भरलेल्या कढयांसोबतच अनेक मौल्यवान पदार्थही प्राप्त झाले. शिवभारतकारांनी त्यांची यादी दिली आहे. तीनुसार या लुटीत सोन्याशिवाय रूपे, पितळ, शिसे, तांबे, लोखंड, कथिल, काच, सुवर्णमाक्षिक, मोती, पाचू, माणिक, हिरा, पोवळे, गेंड्याचे शिंग, चामर, हस्तिदंत, कस्तुरी, केशर, चंदन, कापूर, कृष्णागरू, कापूरकाचरी, कंकोळ, रक्तचंदन, वेलदोडा, लवंग, दालचिनी, चीनदारू, निवळी, नक्रनख, बाळा, नागकेशर, जायफळ, भांग, अफू, तमालपत्र, चारोळी, अक्रोड, मनुका, खजूर, खर्बर, मिरी, सुपारी, देवदार, सुंठ, गांठी पिंपळमूळ, जटामांसी, चबक, हळद, सैंधव, पादेलोण, जवखार, सज्जीखार, हिरडा, दशांगधूप, राळ, शिलाजित, मेण, रसांजन, मोरचूद, निळा सुरमा, काळा सुरमा, ओवा, हिंग, जिरे, लोध्र, गुगूळ, पावकशिख, मंजिष्ठ, शेंदूर, पारा, हरताळ, गंधक, मनशीळ, लाख, रक्त्याबोळ, गोरोचन, अभ्रक, निरनिराळ्या प्रकारची विषे व ती उतरण्याची द्रव्ये, रेशमी, गवती, तागी, फळांची, रंकू हरणाच्या लोकरीची इत्यादी वस्त्रे व अनेक दुसरे पदार्थ महाराजांना मिळाले. हे सारे पदार्थ महाराजांनी, घोडे, बैल, कावडे, बेठ्ये यांच्याकडून वाहून नेले व निरनिराळ्या गडांवर ठेवले. असे हि राजापूरच्या इंग्रजांची मस्ती चांगलीच उतरवली.
संदर्भ:-
¤ शककर्ते शिवराय खंड १
शिवकथाकार विजय देशमुख
¤ जेधे शकावली
¤ शिवभारत २९।६७, २९।७४
¤ प.सा.स. ८५२
संकलन:-
दुर्गवेडा कृष्णा घाडगे
@ Un Viral History

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...