संताजी घोरपडे
- भाग ५
राजाराम जिंजी कड़े निसटुन जाताना त्यांना बीदनुरची राणी "चेनम्मा" हिने सहाय्य केले होते. औरंग्जेबास याचा खुप राग आला आणि त्याने जाननिसारखान, मतलबखान, व सर्जाखान यांस फौज देऊन कर्नाटकात त्या राणीचा समाचार घेण्यास पाठवले. पण ही बातमी संताजिस समजता त्यांनी या बादशाही फौजेवर आधीच हल्ला करून तिची धुलाधाण उडविली. साकी मुस्तैद खान याचे दाखले देतो. सर्जाखान हा आदिलशाही सरदार, आदिलशाही अस्ता नंतर तो मोघलांस येउन मिळाला होता. १६९० साली सर्जाखान सातारा किल्ल्यास वेढा देऊन बसला होता. त्याचा वेढा उठवण्या साठी संताजी आणि धनाजी यांनी आपल्या फौजा सातारा आसपास आणल्या. त्यांनी सर्जाखानच्या छावणीवर गनिमी हल्ले चालू केले. अशाच एक लढाइत सर्जाखान आणि त्याचा कुटुंब कबीला मराठ्यांच्या हाती लागला. हजारो मोगल सैनिक कापले गेले. नंतर एक लाख होन घेउन संताजीने सर्जाखानची सुटका केलि. (संदर्भ- जेधे शाकावली). या लढाईचे वृतांत मोगल इतिहासकार ईश्वरदास नागर सुद्धा देतो.खटाव परिसरात संताजी-धनाजी यांनी तर विजयाचा सपाटाच लावला. एका पेक्षा एक मोघल सरदारांना पाणी पाजले. मोगल सैन्यात तर या दोघांचा इतका धाक निर्माण झाला की म्हणे मोगली घोडे पाणी पिण्यास घाबरित कारन त्याना संताजी-धनाजी पाण्यात दिसत. याच दरम्यान राजारामने संताजिंस सेनापती पदावर नियुक्त केले
No comments:
Post a Comment