विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 15 October 2023

समशेर बहादूर सेनाखासखेल दामाजी राव यांचे गायकवाड घराणे . मराठेशाही तील पराक्रमी घराणे.

 

समशेर बहादूर सेनाखासखेल दामाजी राव यांचे गायकवाड घराणे . मराठेशाही तील पराक्रमी घराणे. 
लेखन ::जयदीप भोसले

































१६४० ला बेंगरूळ हुन शहाजीराजे भोसले यांनी सरदार क्रुष्णाजी गायकवाड यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बरोबर पाठवलं. शिवाजी महाराजांच्या आठ राण्यांपैकी सकावारबाई या गायकवाड घराण्यातील होत्या. त्या क्रुष्णाजी गायकवाड यांच्या भगिनी असल्याचा उल्लेख स्वामी परमानंद यांनी लिहिलेल्या शिवभारत मध्ये उल्लेख आहे. अफजलखान चालुन आला त्यावेळी शिवरायांच्या अंगरक्षक म्हणून अग्रभागी क्रुष्णाजी गायकवाड होते. त्यांच्या सोबत माणकोजी दहातोंडे, सुभानजी इंगळे, जिवाजी देवकाते, पिलाजी बेलदरे व संताजी बेलदरे हे होते. राजांनी विचारले भेटीचा बेत कसा करावा , त्यावर क्रुष्णाजी गायकवाड म्हणाले " आतून चिलखत घाला, बाहेरून मुसेजरी वापरा, डाव्या हाताला बिचवा ठेवून उजव्या हाताला छुपी वाघनखे ठेवावी, कारण खान कपटी आहे.. " शिवरायांनी अफझलखानाचा वध केला. पण क्रुष्णाजी गायकवाड यांचा इतिहास अपरिचित राहीला.
गायकवाड घराण्याचे मुळ गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील धावडी निमगाव हे होते. सिध्दराव गायकवाड हे निजामशाहीचे सरदार होते. त्याना एक कन्या दुर्गाबाई आणि तीन पुत्र विजयराव, विश्वासराव, आणि शंकरराव अशी चार अपत्ये होती. दुर्गाबाई या शहाजीराजे भोसले यांचे बंधू शरीफजी राजे यांच्या पत्नी होत. विजयराव यांना , नंदाजी, भिवाजी, कोंडाजी, तिमाजी अशी चार पुत्र तर कन्या जयंती यांचा विवाह शिवरायांच्या मोठ्या बंधु संभाजी राजे यांच्याशी झाला होता. तर विश्वास राव यांना क्रुष्णाजी, सेखोजी, रणबंकी, गणोजी, रंगोजी आणि दामाजी अशी पाच मुले. कन्या सकावारबाई यांचा विवाह शिवरायांच्या बरोबर झाला.
छ संभाजीराजे यांच्या मृत्यूनंतर १६९० रायगडच्या पाडावानंतर महाराणी येसूबाई छत्रपती शाहू यांच्या समावेत सकावारबाई सुध्दा मुघलांच्या कैदेत होत्या. राजकुटुंबातील सदस्या बरोबर संताजी भोसले, आणि रणबंकी गायकवाड यांच्या समावेत तीनशे मावळे येसुबाई शाहू, राजकुटुंबाच्या दिमतीला होते. येसूबाई आणि सकावारबाई यांची सुटका होई पर्यंत संताजी भोसले आणि सकावारबाई यांचे बंधू रणबंकी गायकवाड हे देखील तीनशे मावळ्या सहीत मुघल छावणी त होते.
१६९८ ला राजाराम महाराज यांनी मुघल च्या मुलखात मोहीमा सुरू केल्या त्यावेळी गुजरात खांनदेश, वर्हाड मोहीमेत सरसेनापती धनाजीराव जाधव, रूपाजी भोसले, परसोजी भोसले, खंडेराव दाभाडे, यांच्या बरोबर दामाजी गायकवाड, क्रुष्णाजी बंकी गायकवाड, कंठाजी कदमबांडे, सेखोजी गायकवाड हे देखील सामील झाले होते. राजाराम महाराज यांनी या सरदाराना समावेत खानदेश, वर्हाड यां प्रदेशात मुघलांच्या सरदारांकडुन मोठ्या खंडण्या वसुल करायला सुरुवात केल्या. त्या वेळी राजाराम महाराज यांनी परसोजी भोसले यांना सेनासाहब सुभा, खंडेराव दाभाडे यांना सेना खासकेल, हे किताब देऊन सन्मानित केले. आणि खांनदेशमधुन खंडणी वसूल ची जबाबदारी खंडेराव दाभाडे आणि दामाजी गायकवाड याना दिली.
त्यानंतर शाहू महाराजांच्या काळात १७०८ नंतर छ शाहू महाराजांनी खंडेराव दाभाडे याना , खानदेश ची सुभेदारी दिली. खंडेराव दाभाडे यांचे प्रमुख सरदार दामाजी गायकवाड यांनी गुजरात वर अनेक स्वतंत्रपणे स्वार्या केल्या. दामाजी ने निझामाबरोबर बाळापूर येथे लढाई मध्ये मोठा पराक्रम केला मोठा नावलौकिक मिळविला. शाहू महाराजांनी त्यांचा समशेर बहादूर हा किताब देऊन १७२० ला खंडेराव दाभाडे यांच्या खानदेश चे मुतालिक म्हणून नेमणूक केली. दामाजी गायकवाड यांच्या म्रुत्यु नंतर पिलाजी गायकवाड यांना खानदेश चा मुतालिक झाला. त्यावेळी पिलाजी गायकवाड खानदेशात नवापूर येथे रहात असे. नंतर सरदार पवार यांच्याशी तंटे निर्माण झाले. त्यामुळे त्यानी सोनगढ येथे किल्ला उभारला आणि राजधानी सोनगढला स्थलांतरित केली. गुजरात हा मुघलांच्या ताब्यात होता त्यात उत्तरेतील मुघल सरदारांच्या मध्ये तंटे निर्माण झाले. पिलाजी गायकवाड यांनी त्यात भाग घेतला आणि गुजरात चा चौथाई चा हक्क मिळवला. मोघल सरदार समुद्दीन ला बडोदे कडे येण्यासाठी त्याला विरोध केला. बडोदे येथे राजधानी केली. शाहू महाराजांनी गुजरात सहीत खानदेशची सुभेदारी सरसेनापती खंडेराव दाभाडे आणि पिलाजी गायकवाड यांना कायम ठेवली.
१७३१ ला सरसेनापती दाभाडे, पिलाजी गायकवाड आणि बाजीराव पेशवे यांच्यामध्ये वितुष्ट आले. डभई येथे लढाई झाली पिलाजी गायकवाड़ यांचा एक मुलगा मारला गेला . पेशव्याने माघार घेतली डभई आणि बडोदे हे दाभाडे आणि गायकवाड़ यांच्याकडे राहीले‌ . शाहू महाराजांच्या मध्यस्थीने दाभाडे आणि बाजीराव यांच्या मध्ये सलोखा केला. पुढे शाहू महाराजांनी सरसेनापती पदाची जबाबदारी यशवंतराव दाभाडे यांना दिली. आणि पिलाजीराव गायकवाड यांच्या कडे गुजरातचे मुतालिक म्हणून नेमणूक कायम करण्यात आली. शिवाय सेना खासकेल आणि समशेर बहादूर हे दोन किताब पिलाजी गायकवाड यांना देण्यात आले. बुलंदखानाने गुजरात ची चौथाई ची सनद आणि सरदेशमुखी मराठ्यांना दिल्याने मुघल बादशहा ने त्याच्या जागी अभयसिग ला गुजरात ची सुभेदारी दिली. १७३२ अभयसिग ने चर्चेला बोलवुन पिलाजी गायकवाड यांना कपटाने खून केला.पिलाजी गायकवाड यांचा पुत्र दामाजी गायकवाड दुसरा हा अभयसिग वर चालून गेला आणि बडोदे ताब्यात घेतले. शाहू महाराजांनी दामाजी गायकवाड दुसरा याना सेनाखासखेल हा किताब दिला. १७४९ ला महाराणी ताराबाई आणि छत्रपती रामराजा यांचे पेशव्याबरोबर वितुष्ट आले. खंडेराव दाभाडे आणि दामाजी गायकवाड यांनी पुण्यावर हल्ला केला आणि पेशव्यांच्या कुटुंबाला सिंहगड येथे ओलिस ठेवले. दामाजी गायकवाड यांची १५००० सेना सातारा येथे तैनात करण्यात आली. लिंब येथे झालेल्या लढाईत पेशव्याच्या सैन्याची पिछेहाट झाली. नाना पशवे रायचुर ला होते. १७५१ ला पुढे दिड वर्षात महाराणी ताराबाई छत्रपती रामराजा आणि पेशवे यांच्यामध्ये एकोपा झाला. दामाजी गायकवाड यांना सेनाखासखेल आणि गुजरात चे मुतालिक कायम ठेवण्यात आले. पानिपत युद्धावर गायकवाड यांनी १०००० ची कुमक पाठवली, नागपूरकर भोसले पानिपत मोहिमेत सामील झाले नाहीत. मराठा सैन्य वेढ्यात अडकले. पानिपत युद्धानंतर पण दामाजी गायकवाड यांची सेना वेढ्यातून पानिपत मधुन सुखरूप राहीली. दामाजी गायकवाड यांनी १७६७ पर्यंत गुजरात वर राज्य केले.
त्यानंतर मानाजी सयाजीराव, फत्तेसिंह यांनी राज्य केले. तिसर्या ब्रिटिश मराठा युद्धा नंतर १८१७ मध्ये ब्रिटिश सत्तेच्या बरोबर गायकवाड यांनी तह केला. त्यानंतर १८८१ ब्रिटिश काळात महाराजा सयाजी राव गायकवाड यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली. शिवाजी महाराजांच्या पासुन ते तिसर्या ब्रिटिश मराठा युद्धात गायकवाड घराण्यातील पराक्रमी वीरांनी योगदान दिले . १८८१ ला गादी वर बसलेल्या सयाजीराव गायकवाड यांनी अनेक सामाजिक सुधारणा केल्या. शिक्षण, कला, उद्योग क्षेत्रासाठी त्यानी संस्था उभारल्या.
अशा या मराठा साम्राज्याची सेवा करणार्या गायकवाड घराण्यातील पराक्रमी वीरांना मानाचा मुजरा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐 संदर्भ: Gense, J H Banaji , Gaikwad of Baroda English document.
Menon V P The story of integration of Indian state Madras, 1961
शिवभारत, स्वामी परमानंद,
मराठ्यांच्या इतिहासाची साधने
शाहू दप्तर
सयाजी गायकवाड यांचे चरित्र

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...