____________________________
_____श्रीमंत चांदजीरावांचे बंधू हणुमंतराव यांचे पुञ धारराव पाटणकर रामपूर शाखा हे शाहू छञपतींचे पदरी सरदार होते त्यांनी बरीच मर्दुमकीची कामे केलेली आहेत धारराव पाटणकर हे फौजबंद असून त्यांच्यावर शाहू छञपतींचा खुप विश्वास होता आणि त्यांच्या मर्दुमकिविषयी त्यांना खाञी वाटत होती. 1742 ते 1743 अवैंनमया व अलक रविरावल 18 चे पञ उपलब्ध आहे त्यावरून धाररावांची कामगीरी दिसुन येते.
_____ " कित्तापञें चिटणिशी तथवार छ . मजकुर राजश्री धारराऊ पाटणकर यांस आज्ञा केली ऐसीजें : तुम्ही विनंतीपञ पाठवले ते प्रविष्ट होऊन लेखनार्थ विदित जाहला महाराजांची आज्ञा घेऊन स्वार जाहला ते राजश्री हिंदुराऊ घोरपडे ममलकत मदार यांची भेट घेतली पुढे ञिचन्नापलीकडे जाण्याचा विचार आहे म्हणून लिहले ऐसिंयास निजाम उल्मुल्क ञिचन्नापलीस जाऊन बसला आहे तेथील उपराळ्यास जावयाची आज्ञा राजश्री हिंदुराऊ घोरपडे ममलकत मदार यांस केली आहे ते फौजेसहवर्तमान जातील त्या समागमे तुम्ही फौजेसहवर्तमान जाऊन तेथील उपराळा करून आपले सेवेचा मुजरा करून घेणे म्हणून पञ "
संदर्भ शाहू महाराज रोजनिशी पान क्र. 73
____ या पञावरून चिचन्नापल्लीकडील लढाईत धारराव पाटणकर हे होते आणि त्यांनी आपली मर्दुमकि गाजवल्याचे नकार ता येत नाही परंतु उपलब्ध साधनांच्या अभावी काहीच लिहता येत नाही...
पञ साभार दिग्वीजय पाटणकर सरदार
माहिती संकलन बाळासाहेब पवार
फोटो दिवशी बुद्रुकचे सरदार पाटणकर
No comments:
Post a Comment