औरंगजेबाच्या हालचाली फार काळ टिकणाऱ्या नव्हत्या कारण छत्रपति
संभाजी महाराजांनी जी युद्धनिती चालवली त्यात आलमगीर औरंगजेब बादशहा हरला ही सत्य परिस्थिती आहे. ह्याचं कारण असं की छत्रपति संभाजी महाराजांचे सैन्य औरंगजेबाच्या छावणीत जाणारी रसद आधी तोडून टाकत , प्रतिकार करणाऱ्या मुघलांना ठार मारीत मराठा सैन्य . त्यांचे उंट , घोडे हे धरून नेत , युद्धात उपयुक्त असलेले घोडे मराठे आपल्या सैन्यात बाळगत . एखादा मुघल सरदार हाती सापडला तर त्याला ओलीस धरीत आणि जबर खंडणी घेऊनच त्याला सोडीत. लुटीची मालमत्ता इतकी मराठ्यांच्या हाती येई की ते त्या पैश्याने मोहिमा चालवत .
औरंगजेबाच्या हाती काही न लागत कारण प्रचंड सैन्य पदरी असूनही केवळ शस्त्रबळाने कुठलीच मोहीम आपली सफल होत नाही हे औरंगजेबाच्या लक्षत आले होते. ह्याला कारण श्री छत्रपति संभाजी महाराजांची युद्धनिती आहे.
मुघल प्रदेशात सर्वत्र लुटालूट , एकाच ठिकाणी फार दिवस न थांबणे , मराठ्यांचे घोडदळ चपळ आणि काटक, लांबवरच्या मजला , सैन्याला खाण्या पिण्यास थोडे लागे इतकं सगळ छत्रपति संभाजी महाराजांच्या हालचालींच वैशिष्ट आहे.
श्री राजा शंभू छत्रपति जयते
- अमित सुधीर राणे
No comments:
Post a Comment