विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 28 April 2024

द ग्रेट मराठा महाराजा महादजी शिंदेंचे सेवक राणेखान.

 

इतिहासात अनेक शूर व धाडसी व्यक्ती तसंच विरक्त-वैरागी मंडळीही होऊन गेली त्यातले

द ग्रेट मराठा महाराजा महादजी शिंदेंचे सेवक राणेखान..🚩
पोस्त्साम्भर :Sunil Dhapate
२४ एप्रिल १७८८, रोजी भरतपूरजवळील राणेखानची लढाई..
पानिपतच्या पराभवानंतर त्याचा बदला चुकवायला अकरा वर्षे लागली अन् तो बदला दिल्लीवर नियंत्रण मिळवित महादजी शिंदेंनी चुकता केला. यात त्यांना राणेखानाची मोलाची साथ मिळाली. अनेक लढाया अन्‌ कुरघोड्या मोडून काढण्यात राणेखान वस्ताद होते. १७८७ मध्ये जयपूरचा राजा प्रतापसिंग व महादजी शिंदे यांच्या लढाईत सरदार राणेखान सहभागी होता. महादजी शिंदे उत्तर हिंदुस्थानांत प्रबल झाला तेव्हा गुलाम काद‌‌िरच्या छळापासून बादशहाची मुक्तता करण्याकरिता इ.स.१७८८ साली राणेखानास दिल्लीस पाठविले होते. गुलाम का‌‌द‌िर व इस्मायलबेग यांनी दिलेला आग्र्याचा वेढा उठवून दोन्ही सैन्यांत २४ एप्रिल १७८८ रोजी भरतपूरजवळ झालेल्या लढाईत त्यांचा पराभव करण्यात १७८८ मध्ये सरदार राणेखानाचा पराक्रम मोठा होता..
अनुपगीर गोसावी म्हणजे हिंमतबहादूर गोसावी. दिल्लीच्या शहाअलमने त्याला राजा हिंमतबहाद्दर ही पदवी दिली होती. कुरापतींसाठी प्रसिद्ध असलेल्या अनुपगीरने गोसाव्यांचें एक छोटेसे सैन्य तयार केले होते. गोसाव्यांचा सरदार म्हणून तो प्रसिद्ध होता. त्याने आपल्या कुरापतींमुळे अयोध्येचा नबाब, होळकर, बुंदेलखंडचा अलीबहाद्दर, नाना फडणिस, दत्ताजी शिंदे, जयपूरकर, जोधपूरकरकरांना देखील हैराण केले होते. अनुपगीरला शरण आणण्याची कामगिरी राणेखानाकडे सोपविण्यात आली. १७८९ मध्ये राणेखानाने त्याचा बंदोबस्त करीत पाटीलबाबास शरण आणले. तसेच बादशाहीला हैराण करणाऱ्या गुलाम कादिरच्या बंदोबस्तामुळे मराठ्यांची गेलेली पत व प्रतिष्ठा परत मिळून उत्तरेत त्यांचा वचक पूर्ववत बसला, हे श्रेय महादजी अर्थातच राणेखानाचेच. अलीगडचे पूर्वीचे नाव रामगड असून, नजीबखान रोहिल्याने ते बदलले असा उल्लेख गोविंदराव पुरूषोत्तम यांच्या १७८३ च्या पत्रात आढळतो. पत्रात ते म्हणतात, नजीबखानानें ज्या रामगडचे अलीकडे अलिगड म्हणोन नांव ठेविले आहे, तेथें जाऊन किल्ला खालीं करून पादशाही (हिंदूशाही) अंमल बसवावा असा राणेखान व रायाजी पंत यांचा विचार आहे..
: संदर्भ राजवाडे खंड-१२.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...