विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 28 April 2024

बेळगावचा मोगल सुभेदार बहादुरखान आणि छत्रपती राजाराम महाराज

 

२५ एप्रिल १६८९
स्वराज्याचे दूसरे छत्रपती, छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केल्यानंतर

छत्रपती राजाराम महाराज यांनाही त्याचप्रमाणे कैद करुन ठार करण्याचा औरंगजेबाचा मनसूबा होता. याचीच अंमलबजावणी म्हणुन बेळगावचा मोगल सुभेदार बहादुरखान याने हुकेरीचा देसाई अलगोडा यास अंमलबजावणीसाठी पाठविलेले पत्र. (दि.२५ एप्रिल १६८९)
खान बहादुर-हुकेरी परगण्याचा देसाई अलगोंदा-
या वेळी (बादशहाचा) हुकुम झाला आहे की छत्रपती रामराजा महाराज रायरी किल्ल्याहून बाहेर पडून प्रतापगड उर्फ जावळी किल्ल्यावर पोहचला आहे आणि (तेथून) पळून जाऊ इच्छित आहे. त्याला ठार मारणे अथवा कैद करणे जरुर आहे. तो ज्या बाजूने येईल तिथल्या जमीनदारांनी आपल्या हद्दीतील फौजेच्या सरदाराला त्वरीत खबर द्यावी. जर नाही दिली तर ते अपराधी होतील. म्हणुन इथून तुझी सरहद्द पन्हाळ्याला लागून असल्याने तू (रामराजाला) अडवावेस. हेर काढून राजारामाची बातमी सतत कळवीत असावे. जर तो आढळला तर त्वरित रातोरात खबर पोहचवावी म्हणजे हल्ला करुन त्याला कैद केले जाईल.
जर खबर पोहचविण्यात कुचराई करशील व शत्रु तुमच्या हद्दीतुन निघुन जाईल तर ते चांगले नाही. अपराधी व्हाल. या बाबतीत जराही निष्काळजीपणा करु नये व सक्त ताकिद जाणावी. अशा प्रकारे बातमी कळवणे यातच स्वतःची कर्तव्य परायणता जाण. (समासात) दिरंगाई करु नकोस.
तारीख १४ रजब, (जुलूस) सन ३२
स्वतःच्या वकीलाला त्वरित पाठवा.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...