---------------------------
औरंगजेबाची भेट-
छत्रपती शिवरायांनी औरंगजेबाच्या भेटीला आग्र्यास जावे म्हणून मिर्झाराजे जयसिंगान हजारो आमिषे दाखवली होती. त्यामध्ये विजापूर आणि गोवळकोंड्यावर आक्रमण करण्यासाठी पैसा व सैन्य देणे, जंजिऱ्याचा किल्ला सिद्धीला सांगून बादशहाकडून मिळवणे वगैरे गोष्टींचा समावेश होता. त्यासोबतच शिवाजी राजांना भेटीमध्ये कसलाच धोका नसेल यासाठी सर्व प्रकारच्या शब्द आणि वचन जयसिंगाने दिली होती. जयसिंग चा मुलगा रामसिंग यानेही जीविताला धोका होणार नाही याची हमी घेतली होती.
आग्रा भेटीसाठी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची चोख व्यवस्था लावली होती. माता जिजाबाईंना त्यांनी स्वराज्याच्या शासक म्हणून नेमणूक केली तर मोरोपंत पेशवा आणि निळोजी सोनदेव मुजुमदार जिजाबाईंच्या आदेशानुसार काम पाहणार होते! सर्वांना योग्य त्या सूचना देऊन 5 मार्च 1666 रोजी शिवाजी महाराज राजगडावरून औरंगाबाद कडे निघाले. बादशहाच्या आदेशावरून त्यांना तिजोरीतून प्रवास खर्चासाठी एक लाख रुपये देण्यात आले होते तसेच गाझी बॅग या जयसिंगाच्या सैन्यातील अधिकाऱ्याला मार्गदर्शक म्हणून नेमले होते.
राजे रस्त्यात असतानाच पाच एप्रिल चा बादशहाचा खलिता त्यांना मिळाला- "तुम्ही माझ्या दरबारात येण्यासाठी प्रवास सुरू केला आहे. स्वस्त चित्ताने या आणि भेटीनंतर लगेच घरी परत जा. मी तुम्हाला मानाचा पोशाख पाठवत आहे."
औरंगाबादचा सुभेदार साफशिखनखान वगळता सर्वत्र बादशहाच्या हुकूमाप्रमाणे स्थानिक अधिकाऱ्यांकडून शिवाजी महाराजांना भेटवस्तू मिळाल्या. दिनांक 11 मे रोजी ते आग्र्याच्या जवळ पोहोचले.
या भेटीची इत्थंभूत माहिती जयपूर रेकॉर्ड्समध्ये उपलब्ध आहे. शिवाजी महाराज 100 सेवक आणि 200 ते 250 सैनिकांसह- ज्यामध्ये 100 शिलेदार आणि उर्वरित पागा (घोडेस्वार) आहेत- सोबत घेऊन गेले होते. फौजेची तुकडी लहान असली तरी अनेक शस्त्रांनी सुसज्ज होती. पुढे भगवा ध्वज असलेला हत्ती हत्ती असून तो अलंकारांनी मडविलेला आहे. पाठीमागे पाठीवर हौदा असलेल्या दोन हत्तींणी आहेत . घोड्यांनाही सोन्या-चांदीचे साज घातलेले आहेत. त्याच्या पालखीला चांदीचे पत्रे बसवलेले आहेत व खांब सोन्याने मढवलेले आहेत. त्यांचे सर्व उच्चाधिकारी पालखीतून आले होते.
औरंगजेब आपला वाढदिवस आणि राज्यारोहणाचा वर्धापन दिन दिल्लीत साजरा करत असे. तथापि 22 जानेवारी 1666 रोजी शहाजहानचा मृत्यू झाला. त्यामुळे औरंगजेब आग्र्यास आला आणि तिथल्या राजवाड्यात दरबार भरवला.
त्यावर्षी 12 मे रोजी त्याचा पन्नासावा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने त्याने दिल्लीतील शाही खजिना 1400 बैलगाड्या भरून आग्र्यास आणला आणि आपल्या वैभवाचे व मालमत्तेचे प्रदर्शन घडवले. त्याच दिवशी शिवाजी महाराजांची भेट ठरवण्यामागे संपत्तीचे प्रदर्शन हेही एक कारण होते. परंतु घडले भलतेच. औरंगजेबाच्या दरबारात शिवाजी महाराजांचे शत्रूंनी औरंगजेबाचे कान भरण्याचे काम सतत सुरू ठेवून शिवाजीची हत्या करावी असे तुटणे लावले होते. औरंगजेब ही त्यास बळी पडला आणि त्याने शिवरायांच्या अपमान होईल अशा पद्धतीने नियोजन केले.
11 मे रोजी शिवाजी महाराज आग्र्याच्या बाहेर पोहोचले होते. तेवढ्यात रामसिंगाची नेमणूक राजवाड्याच्या गस्तीवर केली. आता रामसिंग 24 तास तिथून हलू शकत नव्हता. म्हणून त्याने आपला मुंशी शिवाजी महाराजांच्या स्वागतासाठी पाठवला. 12 मे रोजी सकाळी रामसिंगाने रस्तेच काम संपवून शिवाजी महाराजांच्या स्वागतासाठी बाहेर पडले. मुंशी गिरधरलाल शिवाजी महाराजांना घेऊन दहर आरा बगीच्या मार्गे येत होता. त्यामुळे चुकामुक झाली. तरीही नूरगंज बगीच्या जवळ दोन्ही दले एकत्र आली. तेजसिंह कछवाह यास जयसिंगाने राजांच्या सोबत पाठवलं होतं. त्यास रामसिंग दिसले. मग राजे थांबले आणि रामसिंग स्वतः त्यांच्याकडे जाऊन त्यांना आलिंगन दिल व मुखलीस खानाची ओळख करून दिली. नंतर ते रामसिंगाच्या निवासस्थानाजवळच शामियाण्यात गेले.
या सर्व गोंधळात दिवाने आमचं कामकाज संपलं होतं आणि बादशहा दिवाने खास मध्ये निघून गेला होता. तिथे सहाय्यक प्रधान कोषाध्यक्ष असदखानं शिवाजीराजांना औरंगजेबासमोर नेऊन ओळख करून दिली. नजराना म्हणून राजा तर्फे 1000 मोहरा दोन हजार रुपये आणि त्यांच्या पुत्राकडून निसार म्हणून पाच हजार रुपये बादशहा समोर ठेवण्यात आले. पण औरंगजेबाने त्या बदल्यात स्वागताचा किंवा नजराण्याला मान्यता दिल्याचा एक शब्दही उच्चारला नाही अगर कुठलीही महागडी भेटवस्तू दिली नाही. तिथून राजेंना मागेन नेले आणि पाच हजारी मनसबदारांच्या तिसऱ्या रांगेत उभे केले. तिथून महाराज बादशहाच्या नजरेसही पडत नव्हते.
महाराज राम शिंगाला म्हणाले- 'माझ्या नववर्षाच्या छोट्या मुलाला सुद्धा त्याच्या अनुपस्थितीत पाच हजारी मनसबदारी दिली आहे. माझा सेवक नेताजी ही पाच हजारी मनसबदार आहे. मग मला इतक्या कनिष्ठ रांगेत का उभं केलं आहे?'
त्यानंतर त्यांनी विचारले की पुढे उभ्या असलेला सरदार कोण आहे. तो जसवंत सिंग असल्याचे रामसिंगाने सांगितले. मग महाराज संतापले व म्हणाले-'जसवंत म्हणजे माझ्या सैनिकांना पाठ दाखवून पाळलेला ना? मला त्याच्याही मागे का उभा राहावं लागलं? याचा अर्थ काय आहे?'
त्यावेळी सहजाद्यांना, जाफर खान या वजीराला आणि जसवंत सिंगाला मानाचे पोशाख दिले. राजे अत्यंत प्रक्षुद्ध झाले. तिथे गोंधळ सुरू असल्याचे बादशहाच्या लक्षात आले व त्याने रामसिंगाला सांगितले की-'शिवाजीला कसलं दुःख होत आहे ते विचारा.' राम सिंग जवळ येताच महाराज कडाडले-'मी कोणत्या प्रकारचा माणूस आहे हे तू पाहिला आहेस तुझ्या पित्याने पाहिलं आहे आणि बादशहा नाही पाहिला आहे. तरी तुम्ही मला इतक्या मागच्या रांगेत उभे केले आहे. मी तुमची मनसब झिडकारतो.' एवढे बोलून त्यांनी सिंहासनाकडे पाठ फिरवून सरळ बाहेर पडले. राम शिंगाने त्यांचा हात पकडला परंतु त्यांनी तो झिडकारला आणि बाजूच्या खांबाच्या मागच्या बाजूला जाऊन खाली बसले. ते रामसिंगाला म्हणाले-'माझ्या मृत्यूचा दिवस आला आहे एक तर तुम्ही मला ठार करा किंवा मीच माझा जीव घेतो. तुम्हाला हवं तर माझं मुंडकं उडवा पण मी काहीही झालं तरी यापुढे पुन्हा कधीही बादशहाच्या समोर हजर होणार नाही त्याच्या भेटीला जाणार नाही.'
राम शिंगणे ही गोष्ट बादशहाला सांगितली. बादशहाने इतर सरदारांना शिवाजीला शांत करण्याचा आदेश तसेच शिल्लक देऊन पुन्हा आपल्यासमोर हजर करण्यास सांगितले. शिवाजी महाराजांनी खिल्लत घालण्यास नकार दिला. मग बादशहाला सांगण्यात आले की त्यांची तब्येत ठीक नाही. त्यावर बादशहाने दरबार संपण्याची वाट न पाहता शिवाजी राजांना तात्काळ स्वतःच्या निवासस्थानी घेऊन जाण्यास व त्यांच्यावर उपचार करण्यास रामसिंगाला सांगितले.
दुसऱ्या दिवशी बादशहाने रामसिंगाला विचारले-'शिवाजी येणार आहे का?' राम शिंगाने सांगितले की त्यांना ताप आला आहे त्यामुळे ते आज येऊ शकणार नाहीत. राम सिंगा बरोबर दरबारात हजर राहिलेल्या युवराज संभाजी ना संपूर्ण खिल्लत (सर-ओ-पा) दिली तथापि शिवाजी राजे पुन्हा कधीही औरंगजेबासमोर गेले नाहीत.
दिलीप गायकवाड.
१३-०४-२०२४.
No comments:
Post a Comment