त्रिचनापल्लीचा नायक हा शहाजी महाराजांचा शत्रू होता. हे शत्रुत्व पुढील काळात वंशपरंपरेने चालूच राहिले एकदा स्वारी करून दस्तूरखुद्द संभाजी महाराजांनी त्याचा हिशोब चुकता केला होता. आता काळ होता. १६९३ चा याकाळात सत्ता छत्रपती राजाराम महाराजांच्या हाती एकवटली होती. राजाराम महाराज जेव्हा जिंजीच्या वेढ्यात अडकले होते, तेव्हा त्यांनी मोगलांना मदत देखील केली होती. परंतु याकाळात जिंजीपुढील मोगली लष्कराचा जबर पराभव झाल्याने परस्थिती बदलली होती. अशा परिस्थीतीत त्रीचनापालीच्या नायकास धडा शिकविण्याचे राजाराम महाराजांनी ठरविले आणि त्याप्रमाणे आपले सेनापती संताजी घोरपडे यांची मोहीम त्यांनी नायकावर पाठविली..
संताजींनी कूच करून त्रिचनापल्लीस वेढा दिला (मार्च १६९३) हा वेढा चालू असतानाच छत्रपती राजाराम महाराज जिंजीतून बाहेर पडून संताजीस येऊन मिळाले. मराठ्यांच्या लष्करी सामर्थ्यासमोर नायक फार काळ तग धरून शकला नाही त्याने शरणागतीची बोलणी लावली आणि त्याप्रमाणे २३ एप्रिल १६९३ रोजी मराठ्यांचा नायकाशी तह झाला..
―――――――――――

No comments:
Post a Comment