विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 2 May 2024

“अलिबागचा हिराकोट किल्ला”...🚩

 


“अलिबागचा हिराकोट किल्ला”...
🚩लेखन :

गडवाटकरी 'सचिन पोखरकर'

अलिबागच्या न्यायालयाशेजारी एक तटबंदीयुक्त जागा आहे हाच हिराकोट. आता या किल्लात जाताही येत नाही कारण त्याचं रूपांतर आता जिल्हा तुरूंगात झालं आहे. सध्या किल्ल्यामध्ये कैद्यांना ठेवले जाते त्यामुळे आत प्रवेश मिळत नाही..
१७४० मधे बाजीरावपुञ बाळाजी ऊर्फ नानासाहेब ससैन्य कोकणात उतरले होते. त्यांचा मुक्काम ह्याच हिराकोटात होता. एके दिवशी बाजीरावसाहेबांचा नर्मदेकाठी रावेरखेडी मृत्यू झाला आहे, ही बातमी दूताकरवी हिराकोटातील नानासाहेबांना मिळाली आणि हिराकोटात जाताना पेशवापुञ असणारे बाळाजीराव हिराकोटातून बाहेर पडले ते पेशवा होण्यासाठीच.. हिराकोटचा हा प्रसंग अनेकांना कदाचित माहित नसावा..
३० डिसेंबर १८४३ रोजी, आंग्रेसंस्थान खालसा झाले.. हिराकोटात नव्या इंग्लिश राज्यकर्त्यांनी तुरूंग निर्माण करायचा होता आणि तसे झाले सुद्धा १७७० हिराकोटमधे स्थापन करण्यात आलेली आंग्रे घराण्याची कुलदेवता “कालंबिका देवीला” सुद्धा कोटाबाहेर यावं लागलं आज अलिबाग शहरातल्या बालाजी नाक्यावर हे मंदिर आहे. किल्ल्याचा दरवाजा आजही उत्तम स्थितीत आहे दरवाजावर शनीला पायाशी तुडवणारे मारूती शिल्प आहे सहा बुरूज व घडीव दगड एकमेकांवर रचून बांधलेली उंच तटबंदी हे हिराकोटचे खास वैशिष्ट्य..

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...