विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 2 May 2024

अजिंक्यतारा झुंजविणारे मराठ्यांचा किल्लेदार प्रयागजी प्रभू..

 अजिंक्यतारा झुंजविणारे मराठ्यांचा किल्लेदार प्रयागजी प्रभू..

 लेखन :

गडवाटकरी 'सचिन पोखरकर'


गडावरच्या मुठभर मराठ्यांच्या मदतीने प्रयागजींनी तब्बल साडेचार महीने औरंग्जेबाशी झुंज दिली आणि अखेर गडावरचा दाणागोटा, दारुगोळा संपला, तेव्हा गडावरच्या मराठ्यांनी #२१एप्रिल१७०० रोजी शरणागती पत्करली...
राजारामराजे जाउन महिना होउन गेला तरी बादशाहस अजिंक्यतारा काही दाद देत नव्हता. १३ एप्रिल १७०० च्या पहाटे. मोगलांनी किल्ल्याच्या तटा खली दोन भुयारे खणली आणि त्यात सुरुंग पेरून त्यांस बत्ती लाविली. एक सुरुंग फुटला आणि अनेक मराठे त्या खाली गाडले गेले, खुद्द प्रयागजी सुद्धा ढीगाऱ्यात अडकले पण सुदैवाने ते बचावले. तट फुट्ल्याचा आनंदात मोगल वर चढून येऊ लागले, अनेक मोगल किल्ल्यात घुसले. तेवढ्यात अचानक दुसरा सुरुंग उडाला आणि तट चढ़णारे हजारो मोगल त्या खाली गढले गेले. कित्येक मोगल तर उंच फेकले गेले आधीच आत आलेल्या मोगली सैन्यावर आता प्रयागजी आणि त्यांचे मराठे तुटून पडले आणि त्यांना साफ़ कापून काढले...
अजिंक्यतारा झुंजविणारे मराठ्यांचा किल्लेदार प्रयागजी प्रभू....🙏🚩
या युद्धाचा दाखला इतिहासकार डॉ.जयसिंहराव पवार देतात.
――――――――――――
🎨 Ram Deshmukh ♥️🔥

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...