उमेदवारीच्या काळातील दोघांचे विजय :
सन १६७२ मध्ये शिवरायांचा विजापूरकरांशी संघर्ष सुरू होता. विजापूरकरांचा अब्दुल करीम बहलोलखान स्वराज्यावर हल्ले करीत होता. प्रतापरावाने आनंदराव, संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांना सोबत घेऊन वाई ते तुंगभद्रा भागापर्यंत आक्रमण करून मराठ्यांचा अंमल बसविला..
१५ एप्रिल १६७३ ला प्रतापराव गुजर व बहलोलखान यांच्यात उमराणी येथे संघर्ष होऊन त्यात खानाचा मोड झाला. यावेळी प्रतापरावांसोबत विसोजी शिंदे, विठ्ठल पिलदेव, कृष्णाजी भास्कर, आनंदराव व सिद्दी हिलाल, तर जाधव घराण्याच्या कैफियतीत धनाजी जाधव व संताजी घोरपडे सोबत असल्याचे म्हटले आहे. या युध्दात खानास प्रतापरावांने सोडल्याचे समजताच शिवरायांनी प्रतापरावांची चांगलीच कान उघाडणी केल्याने बहलोलखानास नेसरीच्या खिंडीत गाठले. झालेल्या संघर्षात प्रतापराव मारले गेला. हे समजताच जवळच असलेल्या हंबीरराव, धनाजी जाधव व संताजी घोरपडेंने बहलोलखानावर हल्ला करून त्याचा मोठा पराभव केला (२४ फेब्रुवारी १६७४). संपगावची जहागीर आनंदरावाने लुटून खानावर प्रतापरावांच्या मृत्युचा सूड उगविला. ह्या प्रसंगी धनाजी जाधवाने विशेष पराक्रम गाजविला..
――――――――――――

No comments:
Post a Comment