लेखन :
गडवाटकरी 'सचिन पोखरकर'
पानिपतच्या युद्धानंतर उत्तरेत मराठा साम्राज्यचे संवर्धन आणि वाढीसाठी ज्या मावळ्यांनी आपल्या पराक्रमाची शर्थ केली, त्यात विसाजी पंत यांचे नाव अग्रेसर आहे. माधवराव पेशवे झाल्यावर महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विसाजी पंतांनी अतूल पराक्रम गाजवला. सैन्यप्रशिक्षण आणि सुरुवातीच्या काही लढायामधे पंत नेहमी समोर राहून युध्द करत म्हणून त्यांना ‘बिनीवाले’ (आघाडीचे, the person at the front) ही पदवी मिळाली. जी त्यांच्या नावापुढे कायम लागली..
१७५९ ते १७७२ या १३ वर्षाच्या आपल्या पराक्रमी कारकीर्दी मधे त्यांनी अनेक लढाया मारल्या. १७६९ मधे राजपूतांनी युद्ध न करताच ६० लाख रुपये मराठा साम्राज्याला दिले. पुढे ५ एप्रिल १७७० ला हरयानाच्या जाटांना हरवले. तसेच फेब्रुवारी १७७२ मधे झाबताखान याला हरवून त्याचे सारे राज्य खालसा केले त्याकडून ४० लाखांची खंडणी घेतली आणि नजीबाचे थडगे फोडून पानीपतचा बदला घेतला..
पंतांच्या या कामगिरीचा गौरव माधवराव पेशवे यांनी पुण्यात त्यांच्यावर सोन्याची फुले उधळून केला. पंतांनी आपल्या सोबत अमाप खजिना व २२ लाखांचे द्रव्य सोबत आणले होते. उत्तरेत पानिपत नंतर मराठा साम्राज्याची पाळे-मुळे पुन्हा रुजवण्यासाठी मराठा महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पंतांनी पराक्रम गाजवला. त्यांनी आणलेल्या संपत्तीचा उपयोग दौलत उभारणीसाठी झाला. काहीशा विस्मृतीत गेलेल्या पंतांच्या मृत्यु अथवा जन्माविषयी काहीही नोंद नाही..
No comments:
Post a Comment