श्री
श्री +++++++++++++++++यांचे चरणा पासीं शेवक सुरूपजी यादवराव व धनाजी जाधवराव य.णी स्वामी पासी विनति केली की आपणास आपले कडून मला कांहीं देणगी असावी तेव्हा स्वामी संतोषी होऊन
सीवाजी राजे यांज कडून कराडची सरदेशमुखी देवविली ती खाली लिहि-
दुमाला केले त्या प्रमाणे अनभवीत आलों राजश्री साहेबीं कैलासवास केला
त्यावरी राजश्री सीवाजी राजेसाहेब राज्ये करू लागले त्या संनिध किले
विशालगडीचे मुकामी जाऊन विनति केली करीना आदिअंत मनास
आणून देशमुखीचे वतन आपले आपणास करार करून दिल्हे त्या
प्रमाणे हा काल पर्यंत अनभवीत सांप्रत स्वामी दिग्विजई होऊन रा
ज्यांत आले आपण वतनदार आहों या करितां आपले भाऊ धनाजी
जाधवराव स्वामी सनिध आहेत स्वामीनी आपले वतन आहे त्या
प्रमाणे मोकरर करून देविलें पाहिजे ह्मणून विनति केली विनति
मनास आणितां धनाजी जाधवराउ हे पुरातन स्वामीच्या राज्या-
तील पुरातन सेवक सेवा येकनिष्ठपणे पूर्वी पासून करीत आले सांप्रत
स्वामीच्या दर्शनास आले ते समई स्वामीस सर्व प्रकारें अनकूल
होऊन येकनिष्ठपणें सेवा केली येकनिष्ठ सेवक ऐसे कलों आलें याज करितां
स्वामी संतोसी होऊन कराडचे देशमुखीचें वतन अजरामर बकस धनाजी
जाधवराउ यासी करार करून दिल्हे वतन अनभऊन स्वामीसेवा करणे
अणून आज्ञा केली त्या वरी धनाजी जाधवराउ याणी विनति केली कीं
आपण स्वामीसेवा केली या करितां स्वामी कृपाळु होऊन आपणास वतन
दिल्हे परंतु आपण धाकटा आपले वडील बाप भाऊ स्वरूपजी यादव व
पदाजी यादव आहेत त्यास टाकून आपणास वतन्त्र अनभविता येत नाही
तरी स्वामी कृपाळु होऊन जैसे आपणास वतन अजरामर बकस करून
देतात तरी आपले भाऊ हरदु जण आहेत त्यासी व आपणास वतन बाहाल
करून हरतु जण आपले वडील भाऊ परंतु काल विशम वतनास कितेक
खलेल होऊ लागली या करितां आपणास पाठीराखे करून वतना
पैकी खुश खरेदीने रास्ती पैके दिवाणात हुजुर पेशजी सरूपजी यादव
व पदाजी यादव देशमुख याची देशमुखी याची यांस बाहल करून
दिल्ही ते समई याचे माथां सेरणी सदरहु करार केली पैके त्यांस
द्यावयासी ताकत नाही हाणोन राजश्री रामचंद्र पंडित अमात्ये यां सनिध सा ५००० पांच हजार को आपणा कडून देवऊन गांव १० दाहा गांवीची देशमुखी आपणास दिल्ही आणि हरदु जण वडील भाऊ आपण धाकटे भाऊ या न्याये वर्तोन वतन अनभवावें ऐसे महजर करून देऊन दाहा गांवची देशमुखी करीत आहों, त्यास स्वामी स्वराज्यांत आल्या वरी आपली येकनिष्ठा पाहून कृपाळु होऊन सारी देशमुखीचे वतन अजरामर बकस करून दिल्हे तरी आपण धाकटा भाऊ वडील भाऊ यादव असतां नीतीस अंतराये करू नये वंशपरंपरेने चालिलें पाहिजे या निमित्ये वडील भाऊ त्याची तकसीम त्यांस देऊन आपणास स्वामी काये देतील तें अनभ- ऊन असावें त्यास हरदु जण वडील भाऊ व आपण बसोन विचार केला की स्वामी कृपालु होऊन सारें वतन आपणास अजरामर बकस करून देतात परंतु तुझी वडील भाऊ असतां आपण वतन करावें तरी नीतीस अंतराये होतो या करितां तुझी आपणास काये विचार सांगता त्या वरून सरूपजी यादव व पदाजी यादव याणी विचार केला की आपला धाकटा भाऊ धनाजी जाधवराउ यानी स्वामीसेवा बहुत करून वतन बाहाल करून घेतले या करितां चौथी तकसीम देशमुखी देखील पेशजीचे देहाये १० दाहा तुझास दिल्ही तीन तकसीमा देशमुखी आपण घेऊन तुझी व आली येक- रूप होऊन देशमुखीचें वतन अनभऊन असावें ऐसा विचार करून त्रिवर्गानी स्वामीस विनति केली की स्वामी कृपाळु होऊन सदरहु प्रमाणे देशमुखीचें वतन विभाग करून देविलीयां अनभऊन वतनाची सेवा करूं ह्मणौन विनति केली ते विनति मनास आणून पां कराडची देशमुखीचे वतन सरूपजी यादव व पदाजी यादव व धनाजी जाधवराव देशमुख याचे दुमाले केले असे पैकी तीन तकसीमा देशमुखी निसचत यादव देशमुख व चौथी तक सीमा देशमुखी देखील पेशजीचे दाहा गांव निसबत धनाजी जाधवराउ देशमुख यासी मोकरर करून दिल्ही असे प्रां मजकूरच्या वतनास अज देहाये
येकूण देहे येकसें येकूणचालिस देशमुखी प्राा मजकूर यासी मोकरर करून दिल्ही असे तरी देशमुखीचा इक व लाजिमा व इनाम जमीन गांवगना व पालक व इसाफतीचे गांव मौजे कुंभारगाव १ व मौजे येलगाव १ एकून देहे २ दोन व जकायेत विस्वा व इक यात्रा व अंबेकरखा पेंडी गांवगना व बाजे कान्कायेदा बदस्तूर भोगवटा बरहुकूम सालाबाद महत कदीम चालत आले आहे त्या प्रमाणे याचे तुमाला केले असें तरी तुझी यांचेदुमाला करून देशमुखीचे अमल याचे हातून घेत जाणे वतन यास व याच्या पुत्रपौत्रादि वंशपरंपरेने चालवणे याचे माथां सेरणी रुसा १०००० दाहा हजार करार करून हुजूर घेतले असेत या पत्राची तालीका लेहून घेऊन मुख्ये पत्र भोगवनीयासी देशमुखमजकुरा जवल देणे
तेरीख ११ माहे जिल्हेज सुरा समान मंया
____________________
लेख व माहिती संकलित
संतोष झिपरे
संस्थापक
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य
__________________
काा हवेली
१ कसबे कराड
१मजा करा
१ कालगांव
का तबायन
१ तांबर्वे
१ नावडी
१ बेलबर्ड
१ अटके
१ झोपर
१ ऐतवडें
१ सांकुर्डी
१ कोपर्डे खुर्द
१ सेलगांव
१ अरवी
१ अङ्कल
१ इंदोली
१ निसरें
१ कोपर्डे बु।
१ मंद्रल
+१
१ व्येहें
१ किवल
१ सुपने
१ अफलापूर
१ कासील
११
१ अंतवडी
काा अंगापूर
१ कोरटी
१ अंगापूर खुर्द
१ उडालें
१ कोंढीये
१ कोडोली
१ वोडोली नीलेश्वर२
१ कारयें
का मसूर
१ खराडें
१ मसूर
१ कोरगाव
१ कवठें
१ कालवडें
१ केर
१ खोडसी
१ चरेगांव
१ खोलीद
१ नागवणे
१ किरोली
१ डेरवण
१ तुबी
१ बेलवर्डे
१ कांसील
१ बहुले
१ घोणसी
१ रेटरें बु
१ कौडगांव
१ सिरगांव
१ चचेगांव
१ अतीत
१ केसें
१ चिखली
१ चोरें
१ शाहा पूर
१ करवडी
१ नाडोली
१ सरे
१ पांचूद
१ वरणे
१ मारूल
१ बिंग
१ वराहें
१ चिमणगांव
१ हेलगांव
१ गोंदी
१ सिरवडें
१ गारवडें
१ जखीणवाडी
१९
૨ ટેંમૂ
काा सिंगलिम
१ गोवारें
१ येलगांव
१ टालगांव
१ येणर्पे
१ गोळेश्वर
१ सवादें
१ नडसी
१ येवती
१ तासवर्डे
१ नेरलें
४
१ तारगांव
का। झासोली
१ निगडी
१ झासोली
१ तुलसण
१ मटली
१ नागझरी
१ घोगांव
१ दुसेरें
१ भुरभुसी
१ पाडली बु।
१ जिंती
१ बिचूत
१ सालसिबै
१ पाडली खुता
१ येरोलें
६
१ पाल
का। पांचवड
१ वेणेगांव
१ पांचवट
१ पेरलें
१ ईडमिडें
१ रीसवड
१ उडतरें
१ रेटरें खुर्द
१ कलमे
१
१ बाळ खुर्द
४
१ सणे
किता दहे
१ वाटार बुग
१ मुरली
१ सापुर
१ कामती
१ सिवडें
१ पारलें
१ वाघेरी
१ बनवडी
१ सासपडे
१ नाई
१ वाहगाव
१ टोबसे
१ सिरटें
१ वडगांत्र सेद
१ कासार सित्र
१ वडगांव काम
१ सांगवड
१ सांबडे मामीन
६
काा कुंभारगांव देहाये
तेरीज देहे
१ वांरोजी
८६ हावेली
१ हिंगनाले
११ तांइवे
१ येलावी
२ अगापूर
१ वडोली भिकेस्वर
१९ मस्र
१ मरली
४ सिंगलिम
१ उंबरज
६ झासोली
१ कडेगांव
४ पांचवड
१ कोल
६ किता देहे
१ बाँड
१ कुभारगांव
१ सिरवडें
_______
१३९ एकुण गाव
या देशभक्तीतील १६८ गावांपैकी तीन तक्षिमा यादवराव यांना व एक तक्षिमा जाधवराव यांना देण्यात आली या एक तक्षिमेत २९ गाव आहेत
लेख व माहिती संकलित
संतोष झिपरे
तळटीप;- या गावांची नावे जशी आहे तशी दिली आहेत जर काय फरक असतील तर सांगावे कारण तत्कालीन उल्लेखानुसार दिलेली नावे आहेत दुरुस्ती केली जाईल
No comments:
Post a Comment