विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 14 January 2025

होय आमच्या मुळे आजचा हिंदुस्तान आहे....!!

 


होय आमच्या मुळे आजचा हिंदुस्तान आहे....!!

शक्य होतं आम्हाला नर्मदेच्या अल्याड आईने महाल बांधून गाद्या गिर्द्यांवर लोळणं....
आम्ही नाकारलं ते .आमच्या मंगलाष्टकात असलेली यमुना आम्हाला आमच्या हद्दित हवी होती...ज्या राजधानीत युद्धीष्ठीराने राज्य केलं त्यावर आम्हाला भगवा हवा होता....!!
जेव्हा राजपूतान्यातले नावाचे सिंह डरकाळी फोडायला धजावत नव्हते..तेव्हा ओठ पिळले तर दुध निघेल अश्या वयातली आमची पोरं निधड्या छातीने गिलच्यांना भिडली.....!!
ज्याच्या नावाने देशीदेशीच्या सीमा थरथर कापायच्या त्या अब्दालीला मृत्युला भयभित करणार मराठी तांडव आम्ही दाखलय....!!
होय...आम्ही मरण मारून पुढे निघालो....आम्ही मरणाला शिकस्त दिली....उभ्या हिंदुस्तानात महाराष्ट्राला राष्ट्रीयत्व शिकवावं लागत नाही...कारण पाहिजे असेल तर पानिपतावरच्या मातीला प्रश्न करा...!! तिथल्या रणमैदानात उठलेल्या वावटळींवर आजही हर हर महादेव चा रणघोष ऐकू येतो ......!!
आमच्या वर्तमानच्या वागणुकीचा शिलालेख आमच्या बापजाद्यांनी हिंदुस्तानच्या सीमेवर रक्ताने कोरला आहे.....!!
सचिन शिवाजीराव खोपडे

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...