विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 20 November 2025

क्षात्रतेज सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे व्यंकोजी राजे विरूद्ध लढाई... 🚩

 १६ नोव्हेंबर १६७७ रोजी, स्वराज्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत बेधुंद लढणारा धुरंधर योद्धा,


क्षात्रतेज सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे व्यंकोजी राजे विरूद्ध लढाई...

🚩
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या लढायांचा विस्तार इ.स.१६७४-१६८७ तेरा वर्षात सर्व लढाया जिंकणारा सेनापती. आपल्या तेरा वर्षांच्या कार्यकाळात हंबीररावांची सामरिक युद्ध रणनीती जबरदस्त होती...
कर्नाटकात जेसरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा सेनापती प्रतापराव गुजर यांची व विजापुरकर सेनापती बहलोल यांची लढाई झाली. प्रतापरावांनी याच बहलोलास थोड्याच आठवड्यापूर्वीं उदार मनाने उंबराणी येथे हातात सापडला असता सोडून दिले होते. परंतु त्याने विश्वासघाताने पुन्हा प्रतापरावांवर हल्ला केला. याच वेळी शिवाजी महाराजांनीही प्रतापरावांस ठपका दिल्यामुळे, चिडून जाऊन व उतावळीपणा करून त्यांनी बहलोलास तोंड दिले. सैन्य व्यवस्थित नव्हते त्यामुळे हल्ला कारागर न होता पुष्कळ मराठे पडले व शेवटी खासे प्रतापरावहि कामास आले. शिवाजी महाराजांचा दुसरा सरदार हंसाजी मोहिते हा जेसरीच्या जवळच मुक्कामास होता, त्याने ही बातमी समजताच त्वरेने येऊन, विस्कळित झालेले प्रतापरावाचे सैन्य एकत्र करून निकराचा हल्ला चालवून बहलोलचा पराभव केला. तेव्हां बहलोल पळून गेला. याच लढाईत पुढे प्रख्यातीस आलेले संताजी घोरपडे व धनाजी जाधव या शिलेदारांनी चांगला पराक्रम गाजविला. हंसाजीला या कृत्याबद्दल हंबीरराव ही पदवी शिवाजी महाराजांनी १६७४ ला दिली...
● १६७७ ला व्यंकोजीराजे विरूद्ध लढाई :
कर्नाटक मोहिमेवर असताना महाराजांनी व्यंकोजीराजाकडे कर्नाटकातील शहाजीमहाराजांच्या जहागीराचा अर्धा वाटा मागितला पण वाटा न देताच त्यांनी हंबीररावांच्या सैन्यावर आक्रमण केले. व्यंकोजीराजांकडे ४००० घोडदळ व १०००० पायदळ होते. तर हंबीररावांच्या कडे ६००० घोडदळ व ६००० पायदळ होते. दोन्ही सैन्यात जोरदार लढाई होऊन हंबीररावांच्या सेनेचा पराभव झाला. विजय मिळाल्यामुळे व्यंकोजीराजे व त्यांचे सैन्य आराम करू लागले. याप्रसंगी हंबीररावांनी व संताजी भोसले यांनी मराठा सैन्यास एकत्र करून मध्यरात्रीच व्यंकोजीराजांच्या तळावर हल्ला करून त्यांच्या फौजेची दाणादाण उडविली. प्रचंड असा खजिना, हत्ती, घोडे मराठ्यांच्या हाती लागले. व्यंकोजीराजे सुध्दा हाती लागले होते. पण महाराजांच्या बंधूस कैद कसे करावे असा विचार करून त्यांनी व्यंकोजी राजांस सोडून दिले. हे युध्द १६ नोव्हेंबर १६७७ साली झाले. यानंतर हंबीररावांनी कर्नाटकातील असा वेलोरचा बुलंद कोट १६७८ मध्ये काबीज केला...
: क्षात्रतेज सरसेनापती हंबीरराव मोहिते.

No comments:

Post a Comment

#द ग्रेट मराठा #श्रीमंत महादजी बाबा शिंदे

  पानिपतच्या लढाईत पठाण घोडेस्वाराने केलेल्या तलवारीच्या तडाख्याने महादजींचा एक पाय कायमचा अधू झाला ; परंतु तशाही जायबंदी अवस्थेत महादजी सुख...