३ नोव्हेंबर १६७३ रोजी, मुंबईतून सुरतेला पाठवलेले पत्र...
शिवछत्रपतींना आरमार अत्यंत प्रतिकूल परिस्थीत समुद्रात उतरवायचे होते फिरंगी व वलंदेज, इंग्रज, किलाताब ऐशा सत्तावीस पादशाह्या व जमिनी वरील मोहिमा संभाळून हि सर्व लगबग करावी लागणार होती भारतीयांकडे आरमार बांधणीचे ज्ञान नव्हते या करता आरमार बांधणे सुरूंग लावणे इत्यदि कामांसाठी महाराजांनी काही इंग्रज व पोर्तुगीज माणसे नोकरीवर ठेवली होती...
हे युरोपीय हुशार असले तरी ह्यांची आपापसात स्पर्धा असायची आरमार बळकट करण्यासाठी महाराजांना काही तोफांची गरज होती तशी मागणी ही इंग्रजांकडे केली होती पण इंग्रजांनी त्यांच्याकडे काही तोफा असुनही त्या माहाराजांना दिल्या नाहीत असा उल्लेख मुंबईतून सुरतेला पाठवलेल्या १३ नोव्हेंबर १६७३ च्या पत्रात आहेत याचे कारण असे की इंग्रजांच्या तेथील हितसंबंधाना धोखा पोहचण्याची भीती त्यांना होती पण हेच काम फ्रेंचांनी केल २५ ऑगष्ट १६७३ रोजी “ओरिएंट सन” ह्या जहातून ८८ छोट्या तोफा व २००० मण शिसे गुप्तपणे फ्रेंचांनी राजापूरला पाठवल्याची नोंद आहे...
याच दरम्यान महाराज त्यांचे आरमार बळकट करत होते या संदर्भात इंग्रज लिहतात...., (१७ ऑगष्ट १६७५ जेतापूर-मुंबई) “कामगार मिळने आणि त्याही पेक्षा राखणे कठीण होऊन बसले आहे कारण शिवाजीराजें करीता युध्द नौका बांधण्याचे काम चालू असल्याने त्याचे नोकर सापडतील ते सुतार लाकूड कापे व लोहार यांना त्याच कामात जुंपत आहेत....”
: गजानन भास्कर मेंहेंदळे सर.

No comments:
Post a Comment