विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 20 November 2025

गुलबर्गा जिल्ह्यात मराठ्यांची बाकीण खेड्याची लढाई

 


गुलबर्गा जिल्ह्यात मराठ्यांची बाकीण खेड्याची लढाई...

🚩
भीमसेनने सन १७०५ च्या फेब्रुवारी महिन्यातील एका महत्त्वाच्या लढाईचा उल्लेख केला आहे. “बाकीण खेड्याची लढाई” या नावाने तो प्रसंग इतिहासात प्रसिद्ध आहे..
हे ठिकाण गुलबर्गा जिल्ह्यात सुरापूरनजीक असून त्यावर बेडर लोकांची सत्ता होती. ‘बेडरांच्या माऱ्यांमुळे मोगल सैन्य जेरीस आले, मोगलांनीही वेढा अधिक बळकट करण्याचा प्रयत्न चालवला. अशा वेळी धनाजी जाधव आणि हिंदुराव घोरपडे हे पाच हजार स्वार आणि वीस हजार बेडर पायदळ घेऊन पोहोचले आणि त्यांनी भयंकर धुमाकूळ घातला. बादशाही छावणी भोवती भक्कम भिंत उभी करण्यात आली होती. पण किल्ल्यातील सैन्य रात्री बाहेर पडे व बाण आणि बंदूका यांचा मोगल छावणीवर वर्षाव करी. छावणीतील मोगल सैन्य मेटाकुटीस आले. छावणीच्या बाहेर पाऊल टाकण्याची एकाही मोगल सैनिकास हिंमत होईना...’
वरील सर्व वर्णन मोगलांच्याच इतिहासकाराने लिहिलेले आहे. तो बाकीण खेड्याच्या वेढ्यानंतर हिंदुरावांच्या लष्करी हालचाली संबंधीही म्हणतो, ‘बादशाला कळवण्यात आले की पीडनाईक बेडर आणि हिंदुराव घोरपडे यांनी विजापुरी कर्नाटकात असलेला पेन कोंड्याचा किल्ला जिंकून घेतला आहे. तेथील किल्लेदार मराठ्यांच्या हाती कैद झाला. (सन १७०६)...

No comments:

Post a Comment

#द ग्रेट मराठा #श्रीमंत महादजी बाबा शिंदे

  पानिपतच्या लढाईत पठाण घोडेस्वाराने केलेल्या तलवारीच्या तडाख्याने महादजींचा एक पाय कायमचा अधू झाला ; परंतु तशाही जायबंदी अवस्थेत महादजी सुख...