२८ ऑक्टोबर १८११...स्मृतिदिन
राजे यशवंत हे अतिशय महापराक्रमी व लढवय्ये योद्धे होते.. ते इंग्रजांचे केवळ शत्रूच नव्हे तर कर्दनकाळ ठरलेले होते, त्यांनी इंग्रजांच्या बलाढय सेनेस अनेकदा वारंवार पराभूत करून धुळ चारली.. त्यांना सळो की पळो करून सोडले इंग्रजांच्या बेबंदशाहीला लगाम घालून अजेय ठरलेला एकमेव भारतरत्न नावाप्रमाणे सार्थकता ठरविणारा यशवंत होय...!
राजपूतांवर मराठा व मोघल सत्तांनी खंडणी लादली तेव्हा ती भरपाई करताना त्यांचा कोषागार रिता झाला त्यांच्या राज्यातील मंदिरात अमाप संपत्ती असतांना सुद्धा ना वैदिक पुजारी मदतीला आलेत ना राजपूत राजांना मंदिरातील पैसा अडचणीच्या काळात वापरावासा वाटला शेवटी राजस्त्रीयांची अलंकार उतरवून राजपूतांना खंडणीची भरपाई करावी लागली परंतू राजे यशवंत यांनी इंग्रजाविरूद्ध लढा उभारताना आर्थिक टंचाईची भरपाई करण्याकरिता मंदिरातील संपत्तीचा उपयोग करण्यासही मागे पुढे पाहिले नाही त्यांनी देवापेक्षा देश श्रेष्ठ मानला म्हणून ते हे करण्याचे धाडस करू शकलेत...
भारतातून ब्रिटीशांना हाकलून लावण्याकरिता इतर धर्मीय राजांचे सहकार्य प्राप्त करण्यासाठी राजे यशवंत यांनी स्वधर्म त्यागाची केलेली घोषणा ही धर्मापेक्षा देश श्रेष्ठ आहे हे दर्शविते. देशापेक्षा स्वधर्मास श्रेष्ठ ठरविणाऱ्या व मानणाऱ्या धर्म मार्तंडांनी राजे यशवंत यांच्या पासुन बोध घ्यावा..
● पुस्तकाचे लेखक न.र.फाटक, राजे यशवंतराव बद्दल म्हणतात :
लाथ मारिन तेथे पाणी काढीन अशा कर्तबगारीचा पुरूष जसा वागेल तसाच महाराजांचा वर्तनक्रम या काळात दिसतो. महाराज लढाई करीत होते सगळ्या स्वराज्यासाठी, एकटया होळकरशाहीसाठी नव्हे.. त्यांनी या साठीच हत्यार उपसले होते. त्यांच्या अनेक पत्रातून स्वराज्यासाठी, स्वधर्मासाठी आपण साऱ्या देशाला रणांगणाचे रूप दिले आहे. अशा भावना दृष्टिस पडते. हे शब्द भोसल्यांनी देखील वापरले आहे. कदाचित ती महाराजांची उसनावारीही असेल. या शब्दाचा वापर भोसल्यांनी फक्त लेखणीने केला. त्यांना तलवारीचे पाठबळ मात्र पुरवू शकले नाही. महाराज व पेशवाईंचे तत्कालीन घटक सरदार यांचातला हा फरक लक्षात घेऊनच महाराजांच्या कर्तृत्वाचे परीक्षण केल्याशिवाय महाराजांना न्याय मिळण्याची आशा नको, महाराज हे इंग्रजांसारख्या सेनाबलाढ्याला सुद्धा खडे चारू शकणारा युद्धकुशल वीरपुरूष, अशी त्यांनी देशभर ख्याती संपादली..
शिंदे, भोसले, पेशवे, होळकर व तत्सम मराठा सत्तेच्या सर्व सरदारांनी आपसी मतभेद विसरून फिरंग्यांना देशा बाहेर घालविण्यासाठी एकजूटिने प्रयत्न करावे असे महाराज वारंवार निक्षून सांगत होते. परंतू मराठा सत्तेचे सर्व सूत्रधार हात गंडाळून बसलेत. महाराज यशवंत हे इंग्रजांशी एकाकी झूंज पाहत होते. राजे यशवंतराव यांना इंग्रजांशी लढण्या पेक्षा इतर संस्थानांचा भाग काबिज करून होळकर व पर्यायाने मराठा साम्राज्याचा विस्तार सहज करता आला असता, पण त्यांनी देशास महत्वाचे मानले. इतरांच्या सहकार्याची वाट न पाहता, ना उमेद न होता. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत ब्रिटिशांविरूद्ध राजे यशवंत यांनी झूंज दिली. अवघ्या ३५ व्या वर्षी ऐन तारूण्याच्या उंबरठ्यावर असताना या आद्य स्वातंत्र्यवीराने एकाकी देह त्यागला..
अशा महान देशभक्त स्वातंत्र्यवीराचा इतिहास कित्येक वर्षे जाणीवपूर्वक विस्मृतीत ढकलल्या गेला. महाराजांच्या नसानसात व रक्ताच्या थेंबाथेंबात देशभक्ती ओतप्रोत भरलेली होती. हे इतिहासातून स्पष्ट होते. भारताचे खरे आद्य स्वातंत्र्यवीर हे "महाराजा यशवंतराव होळकर" स्वतंत्र्याच्या प्रणेत्यास, राष्ट्रभक्तास स्मृतिदिनी कोटी कोटी प्रणाम...


No comments:
Post a Comment