विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 22 January 2026

इंग्रजांच्या मदतीला पोटाल्याचा डोंगर धावून आला.

 



इंग्रजांच्या मदतीला पोटाल्याचा डोंगर धावून आला.

इतिहास एका रात्रीत घडत नसतो. जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेले परिश्रपूर्वक काम आणि चतुराई मुळे मराठा साम्राज्य घडले , तसेच इंग्रजांनी मराठा साम्राज्याचे दुही आणि कमकुवत झालेला आरमाराचा फायदा घेतला. रायगड फितुरी शिवाय पडणे शक्य नाही असा समज त्यांनी दूर केला ते भूगोल च अभ्यास आणि नवीन तंत्रज्ञान वापरून.
रायगड अभेद्य आणि कणखर असला तरी इंग्रजांच्या मदतीला पोटाल्याचा डोंगर धावून आला. या डोंगरावर इंग्रजांनी खांद्यावरून तोफा चढविल्या आणि तिथून रायगड वर तोफ्यांचे गोळे डागली.
(रायगड वरून दिसतो तो हा पोटल्याचं डोंगर)
पेशवे च काळात रायगड चे महत्त्व कमी होत गेले . कारण भारतातल्या अनेक शाही आदिलशाह, कुतुबशाही आणि मुघल हे मराठ्यांच्य पराक्रम मुळे कमजोर होत गेले . त्यामुळे strategically रायगड चे महत्व कमी होणे हे नक्कीच झाले. सिद्दी ला सुद्धा अंकुश मध्ये ठेवलेले आणि इंग्रज ना नाना फडणवीस आणि माधवराव पेशवे सोडून बाकीच्या राज्यकर्ते नी दुर्लक्ष केले . राघोबा दादा नी बारभाई विरुद्ध मदत मागितली आणि इंग्रजांनी नाक खुपसत गेले. सुरुवातीला मराठ्या कडे नाना फडणवीस ,महादजी शिंदे तुकोजी होळकर सारखे मुत्सद्दी आणि रण झुंजार होते तो पर्यंत इंग्रजांची डाळ शिजली नाही. मात्र हे सर्व महान लोक 1795 ते 1800 मध्ये मरण पावले आणि मराठांच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली. दुसरा बाजीराव सारखा दुर्गुनी पेशवा आणि दौलतराव शिंदे सारखा अविचारी माणूस मुळे यशवंत राव होळकर ला दुखावले. तिथून मराठ्यांची वाताहत सुरू झाली.
दुसरा बाजीराव , बापू गोखले, त्रम्बकजी डेंगळे यांनी मिळून स्वराज्य वाचवण्यासाठी पेंधाऱ्याची मदत घेऊन प्रयत्न केले , पण तो पर्यंत खुप उशीर झालेले होता. होळकर शिंदे गायकवाड भोसले सारखे संस्थानिक आता इंग्रजांशी स्वतंत्र वाटाघाटी चालू केल्या.
१८१८ मध्ये इंग्रजांनी पूर्ण फास आवळत चालले होते. रायगड घेणे साठी त्यांनी कर्नल प्रॉयर ने वेढा घातला. त्यावेळी प्रतापगड आणि कांगोळ मधील मराठी सैनिक रायगड चा मदतीस धावले. त्या वेळी लेफ्टनंट क्रोसबी ने महाड चे सैनिक घेऊन या सैनिक ना अडवले. रायगड एकटाच झुंजत होता. दुसऱ्या बाजीराव ची शहाणी बायको वाराणसी बाई त्यावेळी किल्ल्यावर होती. इंग्रजांनी तिच्या जाण्यासाठी मार्ग मोकळा केलांपण वाराणसी बाई ने किल्ला सोडण्यास नकार दिला आणि लढाई सकाळी ठेवण्याचा मानस ठेवला.
इंग्रजांनी पोटल्याच्या डोंगराचा आधार घेतला. तिथे तोफा नेल्या आणि तिथून मारा चालू केला. ६ मे १८१८, एक ८इंचाचा तोफेचा गोळा सरळ वाराणसी बाई च वाड्यावर पडला आणि आग लागली. किल्लेदाराने आता वाराणसी बाई ल किल्ला सोडण्याचा विचार करायला सांगितला. वाराणसी बाई नी शरणागती ची कलमे ठरवू लागली.७ मे ते ९ मे पर्यंत किल्लेदार शेख बोलणी करत होता पण तो पर्यंत इंग्रजांनी तोफेचा मारा चालूच ठेवला. त्यामुळे मराठे दडपण खाली होते. या तोफा मारा मुळे रायगडचे सर्व इमारती नाश्ता झाल्या. फक्त एक धान्याचे कोठार आणि एक घर सोडले तर काहीच शिल्लक राहिले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सुद्धा इजा पोहोचली. १० मे १८१८ ल रायगड इंग्रजांच्या ताब्यात आला. कर्नल प्रॉयर ने स्वतः वाराणसी बाई ची भेट घेतली.कर्नल प्रॉयर त्यावेळी इंग्रजांना पत्र पाठवून किल्ला पुन्हा दुरुस्त करावा अशी मागणी केली .
कर्नल प्रॉयर ने वाराणसी बाई ना मनानें पुण्याला पाठवले. जाताना खाजगी मालमत्ता हत्ती उंट घेऊन दिले. त्यांना पुण्याच्या विश्रामबावाडा इथे राहायला सांगितले.
कर्नल प्रॉयर ने १२ मे १८१८ मध्ये ब्रिगेड ऑर्डर मध्ये नोंदणी करून ठेवली ती अशी लेफ्टनंट रेमन, जोफ आणि वूड यांनी मोलाची कामगिरी बजावली .हे तिघे मेजर बॉण्ड यांच्या हाताखाली तोफखाना च यांत्रिकी भागात प्रशिक्षण घेतले.

पेशवे शनिवारवाडा सोडून बिठूरला का व कसे स्थायिक झाले?

 अखेरचे



पेशवे शनिवारवाडा सोडून बिठूरला का व कसे स्थायिक झाले? तेथे त्यांनी कोणते कार्य केले?

खरे म्हणजे याची सुरुवात राघोजी पेशवे (दुसऱ्या बाजीराव यांचे वडील ) यांनी केली . सत्ताच्या मोहात त्यांनी नारायण पेशवे यांचा खून केला .मराठ्या मध्ये आणि पुण्यात राघोबा विषयी तीव्र संताप व्यक्त होऊ लागला . बारभाई राजकारण जसे वळण घेऊ लागले . तेंव्हा राघोबा पेशवे यांनी इंग्रजांकडे शरण गेला .पुढे १७७८ -७९ इंग्रजांचे पहिले युद्ध झाले . सर्व लढले इंग्रजांचा पराभव झाला .
दुसरा बाजीराव ने विठोजी हत्तीच्या पायी दिले आणि यशवंत राव होळकर (भारतातच नेपोलियन) याने पेशवे आणि शिंदे हल्ला केला . डिसेंबर १८०२ ला बाजीरावाने इंग्रजांशी वसईचा तह केला. या तहानुसार इंग्रज बाजीरावाला त्याचे पेशवेपद परत मिळवून देणार होते, पण त्याबदल्यात इंग्रजांना त्यांचे सैन्य मराठा साम्राज्यात ठेवण्याची तसेच त्यांचे राजकीय कारभार पुण्यातून करण्याची परवानगी हवी होती. १८०३ ला बाजीराव पेशवेपदावर आले खरे पण इथून प्रत्येक बाबतीत इंग्रज मराठी सत्तेत ढवळाढवळ करू लागले. होळकर आणि शिंदे यांना ब्रिटिशांची मराठ्यांच्या सत्तेत होणारी ढवळाढवळ मान्य नव्हती. यातूनच १८०३ ला दुसरे इंग्रज-मराठा युद्ध सुरू झाले. होळकर आणि शिंदे यांच्यातील गैरसमजुतींमुळे मराठे हे युद्ध हरले.
पळपुटा बाजीराव त्यावेळी बाजीरावास शिंद्यांचा आश्रय राहिला नाही आणि होळकरावर विश्वास ठेवता आला नाही. त्यामुळे त्याने मुंबईकर इंग्रजांची मदत मागवली. त्यानुसार आर्थर वेल्सली याने दक्षिणेत आणि जनरल लेक याने उत्तरेत अशी एकाच वेळी मोहीम सुरु केली.१८०३ साली भारताच्या इतिहासातले एक निर्णायक वर्ष सुरु झाले.बाजीरावाने शिंदे + भोसले याना इंग्रजांचा पराभव करण्यास भरपूर प्रयत्न केला . हो मराठा सैन्य एका बाजूस तर इंग्रज, निझाम आणि थोडे मराठा सरदार दुसऱ्या बाजूस असा निर्णायक लढा सुरु झाला. पण यात मराठ्यांचा पराभव झाला .
एक गोष्ट दिसते की दौलतीस (मग ती पेशवेपद, होळकर, शिंदे अशी कोणतीही असो) पुढचा वारस कोण होणार या प्रश्नावर सतत अंतर्गत कलह चालू राहिला - . त्याचा फायदा घेऊन इंग्रजांनी सर्वांचे लष्करी पराभव केले आणि हा देश ताब्यात घेतला
आपल्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात खुप शहाणपण येऊन त्यांनी त्रांबकजी ठेंगळें बरोबर मराठा साम्राज्य वाचावण्याच प्रयत्न केला असला तरी त्यांनी १७९६मध्ये पेशवा झाल्यावर ज्या चुका केला त्या मुळे मराठा साम्राज्याला वाट लागली. यशवंतराव होळकर यांच्याशी विनाकारण. वैर घेतले. विठोजी होळकर याना दौलतराव शिंदे यांचे ऐकून भर चौकात हत्तीच्या पायी दिले.
त्यामुळे पहिल्या बाजीराव पासून फडणवीस यांनी शिंदे होळकर यांच्या मध्ये समेट आणून साम्राज्य सांभाळले पण दुसरा बाजीराव यांनी त्याची वाट लावली.
पेशवाई संपवण्याचे निम्मित ठरले बडोद्याचे वकील गंगाधर पंत शास्त्री यांचं खून ....त्यांच्या खुनाचे निम्मित करून त्र्यंबकजी डेंगळे यांना बंगाल ला पाठवले आणखी संपवले ...त्र्यंबकजींचे निमित्त करून दुसऱ्या बाजीराव ला पुणे सोडायला लावली ...आणि शनिवार वाडा मराठ्यांच्या हातातून काढून घेतला ..त्यावेळी पुण्यात अनेक खून झाले ...खून झाल्या मध्ये सातारचे वकील /खरसेठजी मोदी/ खरसेठजी मोदी यांचे सहाय्यक बापू साने हे सर्व मराठ्यांना आणि पेशव्याने सहाय्यक कारक माणसे होती ……योगायोगाने ज्यांचे खून झाले ते सर्व मराठा साम्राज्याच्या भलाईसाठी झटणारे लोक होते ...पण शास्त्रींच्या खून्याचे निमित्त करून दुसरा बाजीराव ला परागंदा करणाऱ्या एल्फिन्स्टन आणि बाळाजीपंत नातू यांनी हे सर्व खून कोणी केले ते कधीच इतिहासाला सांगितले नाही .
सन १८१७, महिना नोव्हेंबर, बाजीराव पेशव्यांनी प्रथम इंग्रजांच्या पुण्यातील वसाहतींवर हल्ला चढवला. पुण्यातील खडकी येथे युद्धाला तोंड फुटले. काही दिवस हे युद्ध असेच चालू राहिल्यानंतर बाजीरावांनी 'पुण्यावर संकट येऊ नये' म्हणून पुण्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. जानेवारी १८१८ ला भीमा नदीकाठी मोठे युद्ध पेटले. युद्धात १७५ ब्रिटिश सैनिक मेले, अर्ध्याहून जास्त जखमी झाले. त्र्यंबकजी डेंगळेंनी, बापू गोखल्यांचा मुलगा गोविंदराव गोखलेचा खून केलेल्या लेफ्टनंट चिशमला ठार मारून बदला घेतला. पण ह्या युद्धात मराठ्यांचेसुद्धा मोठे नुकसान झाले. जवळपास ५०० मराठे मारले गेले. शिंदे-होळकर-भोसले यांच्या मदतीची वाट बघत पेशव्यांनी इंग्रजांबरोबर अनेक छोट्या-मोठ्या लढाया केल्या. पण त्यांच्याकडून योग्य ती मदत मिळाली नाही.
१० एप्रिल १८१८ ला इंग्रजांनी सिंहगड आणि पुरंदर हे किल्ले घेतले. ३ जून १८१८ ला बाजीरावांनी धुळकोट येथे शरणागती पत्करली.
इंग्रजांनी बाजीरावाची रवानगी कानपूरजवळ बिठूर केली. इंग्रजांनी रायगड किल्लादेखील ताब्यात घेतला. रायगडवर त्यांनी सगळी हिशेबाची आणि दरबारी कागदपत्रे जाळली व सगळ्या मुख्य इमारती जमीनदोस्त केल्या. इंग्रजांचा काळा कालखंड भारतावर सुरू झाला.
इतिहासकार प्रफुलचन्द्र गुप्ता म्हणतात की "ह्या युद्धाच्या फार काळ आधीपासूनच मराठी सत्तेची अवकळा सुरू झाली होती. यापूर्वी कधीही कोणत्याही पेशव्यावर अशी वेळ आली नव्हती. "
१८५७ स्वतंत्र युद्धात इंग्रजांनी पेशवे चा बिठूर चा वाडा उध्वस्त केला
२७०० सोन्याचांदीच्या अत्तरदाण्या, गूळ दाण्या १५०० सन्याचांदीच्या ताटे ४० पुंड वजनाचे ससोन्याचे तसराळे चांदीची अंबारी आणि तीस लाख रुपये खजिना इंग्जनी लुटला पुढे चर्च बांधण्यासाठी नानासाहेबाने वाडा चे संगमरवरी दगड सुद्धा वापरले .
त्याकाळी ज्ञानोदय वृत्तपत्र मध्ये १६ जानेवारी १८६० मध्ये बातमी पण आली.
"बिठूरतील माणसाहेबांचेच वाड्याचे संगरावरी धोंडे सरकारने जप्त केले आणि कानपुर मुक्कामी जे ख्रिस्ती भाजनालाय आहे त्याची फरसबंदी करण्याकरिता नेले "
1) सरदेसाई गो. स. रियासत उत्तर विभाग [Marathi Riyasat Uttar Vibhag 3 (1795-1848)]
2) पेशवाईच्या सावलीत - नारायण गोविंद चापेकर [192162_OU_Peshavaaiichyaa_Saavaliin't_Gran'tha_34.pdf](https://docs.google.com/.../0B0vwUrnl4.../edit...)...
3) Fall of Mughal empire by Jadunath Sarkar [Fall Of The Mughal Empire Vol-iv ](https://archive.org/details/in.ernet.dli.2015.231251)[: Sarkar Jadunath ](https://archive.org/details/in.ernet.dli.2015.231251)[: Free Download, Borrow, and Streaming ](https://archive.org/details/in.ernet.dli.2015.231251)[: Internet Archive](https://archive.org/details/in.ernet.dli.2015.231251)
4) Battle of Assaye – Wikipedia [Battle of Assaye - Wikipedia](https://en.wikipedia.org/wiki/Battle_of_Assaye)

भारताचा नेपोलियन म्हणून ज्याकडे पाहतात ते म्हणजे यशवंतराव होळकर

 


भारताचा नेपोलियन म्हणून ज्याकडे पाहतात ते म्हणजे यशवंतराव होळकर

भारताचा नेपोलियन म्हणून ज्याकडे पाहतात ते म्हणजे यशवंतराव होळकर…1803 पासून 18 युद्धात त्यांनी इंग्रजांना सतत परभुतच केले.रियासतकारांच्या मते मराठेशाहीच्या अखेरीस यशवंतराव होळकर हे एक असामान्य पुरुष निर्माण झाले, भले ते विक्षिप्त, धाडसी आणि क्रूर म्हणून प्रसिद्ध असले तरी.यशवंतरावांना जिंकता येत नाही म्हणून वेलस्लीसारख्या गवर्नर जनरलची हकालपट्टी इंग्रज सरकारला करावी लागली. भारताबाबतची धोरणे बदलावी लागली. जगात अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रज सेनेची इभ्रत जगाच्या वेशीवर टांगली गेली. एवढे झंझावाती, दुर्दैवाच्या आघातांनी भरलेले त्यांचे जीवन.
दौलतराव शिंदे आणि दुसरे बाजीराव यांनी मिळून यशवंतराव चे सख्खे भाऊ विठोजी होळकर यांचा काहीएक अपराध नसताना सत्तेच्या नशेत धुंद असणाऱ्या बाजीराव आणि त्याच्या साथीदारांनी विठोजीच्या हत्येचे फर्मान काढले. विठोजीला अपमानित करत साखळदंडांनी बांधून हत्तीच्या पायाशी सोडण्यात आले. पिसाळलेल्या हत्तीने विठोजीचा चेंदामेंदा करून टाकला. विठोजीच्या हत्येची बातमी यशवंतरावाला समजली आणि भावाच्या हत्येच्या बातमीने तो पेटून उठला. बाजीरावाची आणि त्याच्या साथीदारांची सत्तेची नशा उतरवण्यासाठी यशवंतराव पुण्यावर चालून आले. दौलतराव शिंद्यांचे वर्चस्व नष्ट करण्यासाठी यशवंतरावांनी दक्षिण मोहीम काढून घोरपडी, वानवडी, हडपसर व बारामती या लढायांत शिंदेव पेशवे यांच्या फौजांचा पराभव केला आणि मराठ्यांची राजधानी पुणे लुटली. भ्याड बाजीराव पुणे सोडून पळून गेला. विठोजीच्या हत्येनंतर खरेतर यशवंतराव फार दुःखी झाले होते. तरीही त्यांनी बाजीरावाशी बोलणी करण्याची तयारी केली. परंतु यशवंतराव आपणाला जिवंत सोडणार नाही असे वाटल्याने चर्चेची सारी निमंत्रणे धुडकावून बाजीरावाने पलायन केले.दुसऱ्या बाजीराव नें केलेली चुकीचे फळे आपण आजपण भोगत आहोत .त्यांनी 1803 नंतर एकही लढाई आपल्या माणसांच्या विरुद्ध लढली नाही
१७९७ ते १८११ असा फक्त चौदा वर्षांचा काळ यशवंतरावांच्या कर्तृत्वासाठी मिळाला. १७९७ ते १८०३ हा काळ यशवंतरावांना स्वत:चे राज्य व अधिकार प्रतिष्ठापित करण्यासाठी, स्वत:ची पत्नी व कन्येस कैदेतून मुक्त करण्यासाठी वेचावी लागली. १८०३ पासून त्यांनी इंग्रजांविरुद्ध र्सवकष अथक लढा उभारला आणि बलाढय़ इंग्रज सेनांना एकामागून एक वेळा पराजित केले.
पण मराठ्या आणि पेशवाई मधील कर्तृत्वान पुरुष म्हणजे शिवाजी महाराज ,संभाजी महाराज, पहिला बाजीराव ,माधवराव, महादजी शिंदे आणि नाना फडणवीस कडे पहाताना आपण या होळकर च्या महान योद्धकडे दुर्लक्ष केले आहे यात वाद नाही.
यशवंतराव होळकर यांचा जन्म १७७६ साली झाला.यशवंतराव हे मल्हारराव होळकर यांचे दत्तकपुत्र तुकोजीराव यांचे धाकटे पुत्र. .यशवंतराव हे तुकोजीराव होळकर यांना यमुनाबाई या दासीपासून झालेले पुत्र होते. त्यांना विठोजीराव हे सख्खे, तर काशीराव व मल्हारराव हे सावत्रभाऊ होते. तुकोजीरावांनंतर इंदूरच्या गादीसाठी तंटे सुरू झाले, तेव्हा काशीराव यांनी पेशव्यांचा, तर दुसऱ्या मल्हाररावांनी सर्जेराव घाटग्यांचा आश्रय घेतला. शिंदे यांच्याकडून दुसरे मल्हारराव भांबुर्ड्याच्या लढाईत मारले गेल्यानंतर (१४ सप्टेंबर १७९७) यशवंतराव व विठोजी हे पुण्यातून उत्तरेकडे पळून गेले. दुसरे मल्हाररावांचे पुत्र खंडोजी यांच्या नावे राज्यकारभार करण्याचे भासवून सर्व होळकरांना एकत्र येण्याचे आवाहन यशवंतरावांनी केले. यशवंतराव हे नागपूरच्या रघुजी भोसल्यांकडे आश्रयास गेले दुसरा बाजीराव आणि दौलतराव शिंदे यांनी रघुजी भोसल्यांस यशवंतरावांस कैद करण्यास भाग पाडले परंतु यशवंतराव मोठ्या चातुर्याने कैदेतून निसटले आणि धारच्या आनंदराव पवार यांच्याकडे तीनशे स्वारांसह चाकरीस राहिले. पुढे त्यांनी गनिमी काव्याने मध्य प्रांतातील मुलखात लुटालूट करून आसपासच्या संस्थानिकांकडून द्रव्य संपादन केले आणि त्यातून पेंढारी, भिल्ल, राजपूत, अफगाण वगैरेंची मोठी फौज तयार केली. दौलतराव शिंद्यांचा सूड घेऊन होळकरांची सत्ता पूर्ववत स्थापण्याचा त्यांचा कृतसंकल्प होता.याशवंतरे हे क्रूर, धाडसी व शूर होते. त्यांस दिल्लीच्या बादशहाने महाराजाधिराज राजराजेश्वर अलिबहादूर असा बहुमानाचा किताब दिला होता. त्या वेळी त्यांच्या तोडीचा दुसरा कोणी सेनानायक नव्हता.पण त्यांची ही समृद्धी काही लोकांच्या डोळ्यांत खुपत होती. गवाल्हेर चे शासक त्यावेळी दौलतराव शिंदे हे देखील होते. होळकर साम्राज्याची ही समृद्धी त्यांना बघवत नव्हती.
1804 च्या सुरुवातीला कर्नल fawcett ला बुंदेलखंडात हरवले.नंतर कर्नल मांसोन आणि लेऊकें ला बुंदी आणि कोटा मध्ये हरवले.
1804 मध्य ब्रिटिशनी शाह आलम 2 ला देखील कैदेत ठेवले त्यावर हल्ला करून बादशहा ला सोडवले.नंतर मेजर फ्राझेर ला यशेत राव नि हरवले.टेंव mason या ब्रिटिश योद्ध पळून गेला फरुखाबाद येथे यशवंतरावा आणि लेक, मानसीओन ,कर्नल मरे ,कर्नल दोन, जनेरल स्मिथ,कर्नल जेटलांड,जनेरल जॉन, सेटन यांच्यात तीन महिने युद्ध चालले .या युद्धाने पूर्ण भारत मध्ये यशेत राव चे कौतुक झाले त्यात एक वेळी तर यशवंतराव नि 300 ब्रिटिश सैनिकांचे नाक कापले.पण इंग्रजनी एक खेळी खेळली त्यांनी होळकर समाजाच्या तुकडे करून जो इंग्रजांना मदत करेल त्याला देण्याचे जाहीर केले.मीर पंढरी नि भवानी शंकर ने होळकर ची साथ सोडून इंग्रजांना सामील झाले.आमिर खान ला टोंक ची जहागीरदार दिल्ली तर भवानी शंकर ला दिल्ली चा काही भाग दिला…आज पण भवानी शंकर च्या दिल्ली मधील हवेली ला नमक हराम की हवेली असे ओळखतात .सररॉबर्ट लिहितात की होळकर हे युद्ध जिंकत असताना अचानकपणे जाट राजा रंजितसिंग ने इंग्रजांशी करार केला त्यामयले होलकर तिथून निघून गेले
होते.यशेतरावणी ऍक्टरोनी आणि बेरने यावर हल्ला केला.
त्यांच्या मागणीला – दोआब आणि बुंदेलखंडमधील प्रदेश द्यावा यास – ब्रिटिशांनी नकार दिला तेव्हा होळकरांच्या सैन्याने पुष्कर आणि अजमीर (अजमेर) लुटले. तसेच यशवंतरावांनी आपल्या सैन्यातील तीन ब्रिटिश अधिकाऱ्यांना( व्हिकर्स, डॉड व रियन) कंठस्नान घातले (१८०४). ब्रिगेडियर विल्यम मॉन्सनचा पराभव केला. यशवंतरावांनी गनिमी युद्धतंत्राने इंग्रजांना हैराण केले. त्यांच्याकडे ६०,००० घोडदळ, १६,००० शिपाई व १९२ बंदुका होत्या. त्यांचा सेनापती हरनाथ सिंग याने दिल्लीवर हल्ला केला. ). त्यानुसार त्यांस बुंदी टेकड्यांच्या उत्तरेकडील प्रदेश व टोंक, रामपुरा व इंदूर मिळाले. स्थिरस्थावर झाल्यावर यशवंत-रावांनी सैन्यात सुधारणा करून निरुपयोगी फौज काढून टाकली. बाणपुरा येथे तोफा ओतविण्याचा कारखाना काढला (१८०७).1806 मध्ये खंडेराव(द्वितुय)आणि काशीराव होळकर चे 1808 मधील निधन, सततचे युद्ध, अपेक्षा-भंग, तापट स्वभाव यांमुळे यशवंतरवांचा ब्रेन स्ट्रोक झाला. या व्याधीतच भानपुरा येथे त्यांचे निधन झाले. त्या काळात (१८०९–११) त्यांची उपस्त्री तुळसाबाई हीच सर्व राज्य चालवीत असे मात्र राज्य-कारभारात अनागोंदी माजली तेव्हा तिने यशवंतरावाचा औरस पुत्र तिसरे मल्हारराव (कार. १८११–३३) यांच्या नावे राज्य केले.
तळ टिपा:
1]त्याशिवाय ब्रिटिशांची अनेक पत्र आहेत
2]मराठी मध्ये ना स इनामदार यांनी त्यांच्या जीवनानावर झुंज आणि संजय सोनवणी यांनी पण सुंदर कादंबरी लिहली आहे

महाबली शहाजीराजे भोसले 🙏🚩

 


महाबली शहाजीराजे भोसले 🙏🚩
हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात शहाजीराजे भोसले यांचे स्थान अत्यंत मूलभूत व निर्णायक आहे. ते केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे पिता नव्हते तर स्वराज्याची संकल्पना प्रथम प्रत्यक्ष कृतीत उतरविणारे द्रष्टे होते. शिवाजी महाराजांच्या घडणीत जिजाऊ साहेबांचे संस्कार जितके महत्त्वाचे होते तितकेच शहाजीराजांच्या जीवनातील संघर्ष, राजकीय अनुभव, युद्धकौशल्य आणि स्वातंत्र्याची तीव्र आकांक्षा महत्त्वाची होती.
शहाजीराजांचा जन्म इ.स. १८ मार्च १५९४ रोजी वेरूळ येथे मालोजीराजे भोसले व उमाबाई यांच्या पोटी झाला. भोसले वंशाची मुळे राजस्थानातील चित्तोडगडच्या पराक्रमी परंपरेशी जोडलेली आहेत. बालपणापासूनच शहाजीराजांना घोडेस्वारी, शस्त्रविद्या, युद्धकौशल्य आणि राजकारणाचे शिक्षण मिळाले. पुढे सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव यांची कन्या जिजाबाई यांच्याशी डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये त्यांचा विवाह झाला. या विवाहामुळे मराठा सरदारांच्या राजकारणात शहाजीराजांचे स्थान अधिक दृढ झाले.
शहाजीराजांचे पिता मालोजीराजे भोसले इ.स. १५९९ मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीत दाखल झाले. पुढे शहाजीराजेही निजामशाहीत एक पराक्रमी सरदार म्हणून उदयास आले. इ.स. १६२४ मध्ये झालेल्या भातवडीच्या युद्धात त्यांनी केवळ २० हजार सैन्याच्या जोरावर मुघल व आदिलशाहीच्या प्रचंड संयुक्त सैन्याचा पराभव केला. मेखरी नदीजवळील छावण्यांवर केलेल्या रणनीतीपूर्ण हल्ल्यामुळे शत्रुसैन्याची वाताहत झाली आणि शहाजीराजांचे नाव दख्खनभर दुमदुमले. मात्र याच युद्धात त्यांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले.
निजामशाहीचा ऱ्हास सुरू झाल्यावर शहाजीराजांनी अहमदनगर जिल्ह्यातील पेमगिरी ( भीमगड ) किल्ल्यावर निजामशाहीच्या वंशातील बाल वारस मुर्तझाला गादीवर बसवून स्वतंत्र कारभार सुरू केला. जवळजवळ तीन वर्षे त्यांनी हा स्वायत्त राज्यकारभार चालविला परंतू हा प्रयत्न अपयशी ठरला. पुढे मुर्तझाच्या सुरक्षिततेसाठी दिलेल्या शब्दासाठी शहाजीराजांनी मुघल बादशहा शहाजहानशी तह करून आदिलशाहीत प्रवेश केला.
इ.स. १६३६ नंतर शहाजीराजे आदिलशाहीच्या सेवेत गेले आणि त्यांना कर्नाटकातील बंगळूरची जहागीर देण्यात आली. बंगळूर, शिरे, कोलार, अर्काट, जिंजी, हुस्कोट, आर्णी अशा विस्तीर्ण प्रदेशात त्यांनी जवळजवळ स्वतंत्र राजाप्रमाणे प्रशासन चालवले. दक्षिणेतील मोहिमांमध्ये त्यांनी पराभूत राजांना मांडलिक म्हणून ठेवले ज्यामुळे आदिलशाहीचा विस्तारही झाला आणि स्थैर्यही निर्माण झाले.
शहाजीराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अनुकूल राजकीय परिस्थिती निर्माण केली. योग्य वेळ साधून त्यांनी शिवाजी महाराजांना पुणे जहागिरीत स्वतंत्र कारभारासाठी पाठवले आणि अनुभवी मुत्सद्दी, सरदार त्यांच्या हाती दिले. स्वराज्य उभारणीमागे शहाजीराजांचा अप्रत्यक्ष पण अत्यंत महत्त्वाचा हात होता. शिवाजी महाराजांच्या वाढत्या कारवायांमुळे संशयग्रस्त झालेल्या आदिलशाहीने २५ जुलै इ.स. १६४८ रोजी शहाजीराजांना जिंजीजवळ दग्याने पकडून विजापूर दरबारात साखळदंडात हजर केले. या प्रसंगी शिवाजी महाराजांनी विलक्षण मुत्सद्देगिरी दाखवत मुघल बादशहा शहाजहानकडे पत्र पाठवले आणि शहाजीराजांची सुटका करून घेतली. इ.स. १६४९ रोजी शहाजीराजांची सन्मानपूर्वक मुक्तता झाली.
इ.स. १६६१-६२ दरम्यान शहाजीराजे महाराष्ट्रात आले आणि शिवाजी महाराज व जिजाऊ साहेबांसमवेत काही काळ घालवला. आपल्या आयुष्यभर जोपासलेल्या स्वराज्याच्या संकल्पनेचे विशाल रूप पाहून ते समाधान पावले. २३ जानेवारी इ.स. १६६४ रोजी कर्नाटकातील होदेगिरी जंगलात शिकारीदरम्यान घोड्यावरून पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यांची समाधी शिमोग्याजवळ होदेगिरी येथे आहे. शहाजीराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जहागिरीचा वारसा धाकटा पुत्र व्यंकोजी यांच्याकडे गेला, ज्यांनी पुढे तंजावरचे मराठा राज्य स्थापन केले. शहाजीराजांचे स्वतंत्र राज्य उभारण्याचे स्वप्न प्रत्यक्षात शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात आणि व्यंकोजीने तंजावरात साकार केले.
शहाजीराजे भोसले हे पराक्रम, युद्धकौशल्य, मुत्सद्देगिरी आणि प्रशासन यांचा संगम असलेले व्यक्तिमत्त्व होते. स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले यांना विनम्र अभिवादन 🙏🚩
संदर्भ :-
शककर्ते शिवराय, विजयराव देशमुख
महाबली शहाजीराजे भोसले, गुरुप्रसाद कानिटकर

इंग्रजांच्या मदतीला पोटाल्याचा डोंगर धावून आला.

  इंग्रजांच्या मदतीला पोटाल्याचा डोंगर धावून आला. इतिहास एका रात्रीत घडत नसतो. जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेले परिश्रपूर्वक काम आणि चत...