मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्वाची रतनपूरची लढाई...
ती तारिख होती, ४ मार्च १७०६ आणि या “पराक्रमाचे श्रेय सेनापती धनाजी जाधवांचे”...

उत्तरेतील दिग्विजयाची मुहूर्तमेढ रोवली ४ मार्च १७०६ च्या गुजरातेवरील आक्रमणाचे नेतृत्व सेनापती धनाजी जाधवांकडे होते. यावेळी मराठ्यांकडे १५-१६ हजाराची जंगी फौज होती. मराठ्यांनी सुरत, बडोदा व अहमदाबादवर धाड टाकून वसूल केली...
गुजरात मधील अब्दुल हमीदखान, नजरअलीखान, इल्तिफातखान व सफदरअलीखान बाबीसाररख्या १०-१२ मोगल अधिकाऱ्यांच्या २० हजार फौजेशी मराठ्यांचा संघर्ष घडून आला. ही रतनपूरची लढाई मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्वाची लढाई होय.. !
या लढाईने मराठ्यांना गुजरातचे दार मोकळे झाले. (नियतीच्या विळख्यात औरंगजेब). यानंतर पन्नास वर्षे गुजरातेत सतत युध्दे करून मराठ्यांनी गुजरातेतून मोगलांना नाहीसे केले आणि तो प्रांत आपल्या ताब्यात आणला. औरंगजेबाच्या हयातीतच मराठे गुजरातेत शिरले आणि तेथे त्यांनी मोगलांवर दणदणीत विजय मिळविल्याने औरंगजेब हतबल झाला. मोगलांशी लढताना मराठ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. माळवा व गुजरात या मोगल सुभ्यांवर त्यांनी आक्रमणे सुरू केली. त्यातूनच वर उल्लेखिलेली रतनपूरची लढाई उदभवली. या पराक्रमाचे श्रेय सेनापती धनाजी जाधवांचे होते. धनाजींच्या या धाडसी पराक्रमामुळेच मराठ्यांनी गुजरातेत प्रवेश मिळविला आणि औरंगजेबाच्या मृत्यूनंतर थोड्याच काळात गुजरातेतून मोगलांची सत्ता नाहिशी केली. भावी काळात मराठ्यांनी उत्तरेत जो दिग्विजय संपादन केला. त्या दिग्विजयाची मुहूर्तमेढ सेनापतीबधनाजी जाधवांच्या गुजरात विजयाने तिची पायाभरणी केली होती. गुजरातवरील विजय मराठ्यांच्या इतिहासातील एक दैदिप्यमान घटना म्हणून उल्लेख करावा लागेल...
――――――――――――

No comments:
Post a Comment