छत्रपती शाहूमहाराज स्वतः युद्धभूमीवर मिरज ला तळ ठोकून नेतृत्व करून कर्नाटकावर स्वारी...
२४ फेब्रुवारी १७३९ रोजी मोगल आणि नादिरशहा यांच्यात कर्नाल येथे मोठे युद्ध झाले. त्यात मोगलांचा मोठा पराभव झाला. सुमारे २०,००० मोगल सैन्य मारले गेले आणि जिवंत सापडलेल्या सैन्याचे हालहाल करून अत्यन्त क्रूरतेने त्यांना मारण्यात आले असे लोक सुमारे १५००० होते. नादीर सैन्यासह दिल्लीसमोर ठाकला तेथे बादशाह मुहम्मद शाह ने शरणागती पत्करली आणि दिल्ली नादीर च्या हवाली केली .नादीर च्या सैन्याने दिल्ली आणि उत्तर हिंदुस्तानात हैदोस घालत सुमारे २ लाख लोक कत्तल केले, अनेक स्त्रिया गुलाम म्हणून ताब्यात घेतल्या, अनेक शहरे जाळली,.मंदिरे जमीनदोस्त केली. दरम्यान नादीर ने मोठा दरबार भरवत स्वतःला हिंदुस्थान चा बादशाह घोषित केले, नादीर ला हिंदुस्थानात पाचारण करणाऱ्यांनी त्याला मराठ्यांच्या राजधानीवर म्हणजे साताऱ्यावर चालून जाण्याचे आणि छत्रपती शाहूंना संपवण्याचे सल्ले दिले...
छत्रपती शाहूमहाराज स्वतः युद्धभूमीवर मिरज ला तळ ठोकून कर्नाटक स्वारीचे नेतृत्व करत होते, बादशहाचे पत्र हातात पडताच कर्नाटक मोहीम रघुजी भोसल्यांकडे सोपवून त्यांनी साताऱ्याला कूच केले आणि बाजीराव पेशव्यांना नादिरशहा विरुद्ध लढण्यासाठी उत्तरेस पाठवले. इकडे उत्तरेत स्थिती बिकट होऊन सगळीकडे हलकल्लोळ माजला होता. नादीर असेपर्यंत म्हणजे सुमारे ५० दिवस सर्व व्यापार, व्यवहार ठप्प झाले. नादीर दक्षिणेत उतरणार या बातमीमुळे मंदिरांमधील देव सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. प्रजेला सतर्कतेचे इशारे दिले गेले...
चंबळ च्या उत्तरेस पोचून नादिरशहा ला तिथेच गाठण्याचा बाजीरावांचा मानस होता जेणेकरून नादिरशहा माळव्यात शिरू शकणार नाही. मराठा आणि मोगल हेरांनी उत्तरेत अफ़वा पेरल्या कि शाहूंनी पूर्व,पश्चिम आणि दक्षिणेतून एकत्रित २ लाखांची फौज बाजीरावांच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या रक्षणास पाठवली. या बातमीचा योग्य तो परिणाम होऊन नादिरशहा मराठ्यांच्या भीतीने दिल्ली सोडून इराण ला ५ मे १७३९ ला निघाला...
जाण्यापूर्वी २५ एप्रिल ला त्याने दिल्लीहून शाहू छत्रपती आणि बाजीराव यांना पत्रे लिहिली ज्यात "हिंदुस्थान चा कारभार चालवण्यास हिंदुपती शाहूच योग्य व्यक्ती आहेत,मोहम्मद शाह याला पुन्हा बादशाह नेमले आहे त्यांचे साथीने कारभार चालवावा " असे नमूद केले...
अहमदशाह अब्दालीचा गुरु असलेला नादिरशहा हा अब्दाली पेक्षा क्रूर,विक्षिप्त आणि जिहादी प्रेरणेने भारलेला कडवा राजा होता. जर नादिरशहा बादशाह म्हणून हिंदुस्थानात स्थिरावला असता आणि दक्खनेत जाऊन त्याने मराठ्यांचा पराभव केला असता तर नादिरशहा च्या कडव्या विचारसरणीने हिंदुस्थानचे इस्लामीकरण नक्कीच झाले असते.मराठे जर उत्तरेत गेले नसते, तर संपूर्ण उत्तर हिंदुस्थान नादिरशहा किंवा अबदाली अशा धर्मवेड्या प्रवृत्तींच्या हाती गेला असता...
: मालोजीराव जगदाळे.
चित्रकार @rambdeshmukh
―――――――――――――

No comments:
Post a Comment