२४ फेब्रुवारी १६७० रोजी छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म झाला ..
छत्रपती राजाराम महाराज म्हणजे स्थिरबुद्धी सौम्य प्रकृती अशी जी प्रतिमा निर्माण करण्यात आली होती ती निराधार असून छत्रपती राजाराम महाराज हे पराक्रमी, मुत्सद्दी, समंजस, निर्भीड, उत्तम संघटक, धोरणी राजे होते. राजाराम महाराजांच्या वाट्याला फक्त तीस वर्षांचे (१६७०-१७००) आयुष्य आले वयाच्या १९ व्या वर्षी स्वराज्य रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर आली छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर विस्कटलेले स्वराज्य सावरण्याचे महान कार्य छत्रपती राजाराम महाराजांनी केले. निराशेच्या गर्तेत अडकलेल्या मराठा साम्राज्याला उर्जितावस्था देण्याचे काम त्यांनी केले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठा साम्राज्याचे रक्षण करणे ही तुमची माझी सर्वांची जबाबदारी आहे याची जाणीव त्यांनी मराठा सरदारांना करून दिली...
अत्यंत कठीण अशा परीस्थितीत, अत्यंत स्थिर बुद्धीने, मुत्सुदीपणे संपुर्ण आयुष्यभर सतत अविरत संघर्ष करणाऱ्या संयमाने पराक्रम करणाऱ्या थोर राजाची कारकिर्द म्हणून छत्रपती राजाराम महाराजांकडे पहावे लागते.. दुरदेशी राहून सैन्याच्या मनातील निष्ठेला सतत जागृत ठेऊन गनिमी कावा या युद्धतंत्राचा अतिशय परिणामकारक वापर, मुघल सैन्यावर निर्माण केलेली दहशत अतिशय तुटपुंजी रसद असताना सुद्धा केल्या गेलेल्या यशस्वी चढाया आदी बाबी म्हणजे राजराम महाराजांच्या मुत्सुदी धोरणांची परिणीती म्हणावी लागेल...
छत्रपती संभाजी महाराजांना वीरमरण आलं तेव्हा राजाराम महाराज उण्यापुरे १९ वर्षाचे होते. संभाजी महाराजांच्या मृत्युमुळे मराठ्यांच्या गोटात जी अभुतपर्व परिस्थिती निर्माण झाली तिचा गुंता महाराणी येसूबाई सरकारांच्या विवेकबुध्दीने सुटले. हिंदवी स्वराज्याचा भार खांद्यावर घेऊन राजाराम महाराजांना राजधानी रायगड सोडुन दुर दक्षिणेत जिॅजी इथे राजधानी निर्माण करावी लागली. युध्दसन्मुख छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यु, रायगडचा पाडाव, येसुराणी सरकार आणि बाल शाहुंची अटक, शिरजोर झालेले मुघल, जिॅजीसारख्या स्वराज्यातल्याच पण नवख्या मुलुखात घ्यावा लागलेला आसरा अशा सगळ्या वादळी वातावरणात स्वराज्याची धुरा सांभाळणं खचितच अवघड कार्य होतं. राजाराम महाराजांनी त्यांच्या छोट्या पण अत्यंत महत्वाच्या कारकिर्दीत स्वराज्याची धुरा अत्यंत चिवटपणे सांभाळली...
औरंगजेबचा मनसबदार मिर्झा मुहंमद आपल्या ‘तारीखे मुहंमदी’ या ग्रंथात राजाराम महाराजांबद्दल लिहितो,
“शहाजीराजेंचा नातू व शिवाजीराजेंचा मुलगा रामजी उर्फ रामराजे यांनी आपला भाऊ संभाजीराजें यांच्या मृत्युनंतर दक्षिणेत मोठे तेज व धाडस दाखविले...”
इतिहासकार : वा.सी.बेंद्रे.
――――――――――

No comments:
Post a Comment