तामिळनाडूमधील पालार नदीच्या काठावर असलेला "अर्काटचा किल्ला"...
स्वतंत्रपणे धोरण आखण्याची आणि ते स्वतःच्या हिंमतीवर पार पाडण्याची मुराररावांची कर्तबगारी त्यावेळी आणि त्या नंतरच्या अनेक प्रसंगांत पेशव्यांनी कर्नाटकावर सन १७५७ मध्ये आणखी एक स्वारी केली. 'श्रीरंगपट्टणाची स्वारी' असे त्या स्वारीला नाव दिले जाते. त्यावेळी मुराररावांचे दिसून आली. सहाय्य पेशव्यांना घ्यावे लागले. हे प्रकरण संपवण्या पूर्वी मुराररावांचे समयोचित धोरण आणि गुणग्राहक वृत्ती या संबंधीचा एक महत्त्वाचा प्रसंग सांगितला पाहिजे. तो प्रसंग अर्काट किल्ल्याच्या वेढ्याच्या वेळचा आहे. इंग्रज सेनाधिकारी क्लाईव्ह आणि त्याचे शिपाई अर्काट किल्ल्याच्या वेढ्यात अडकून पडले होते. त्याला बाहेरून मदत येण्याची शक्यता दिसत नव्हती. मद्रासकडून केव्हा मदत येईल याची ते वाट पहात होते. त्या दिशेने मदत येण्याची काहीही चिन्हे दिसत नव्हती. क्लाईव्हचे सैनिक थकून गेले आणि निराशही झाले होते. अशा स्थितीत क्लाईव्हला मुराररावांच्या घोडेस्वारांची अत्यंत योग्य वेळी कुमक मिळाली. मुराररावांची मदत मिळाली नसती तर क्लाईव्हचा पराभव अटळ होता आणि त्यांचे सैनिकही मारले गेले असते..
● तो प्रसंग असा :
नासिरजंगच्या मृत्यूनंतर सन १७५१ पासून दक्षिणेकडील लष्करी हालचालीत मुराररावांचे वर्चस्व खूपच वाढले. चा उपयोग आपल्याला व्हावा यासंबंधी फ्रेंच आणि इंग्रज यांची जणू चढाओढ लागली होती. त्याच सुमाराला क्लाईव्ह अर्काटच्या वेढ्यात गुंतला होता. मुरारराव महंमदअलीला मदत करण्याची हालचाल करीत होते. मुरारराव यांच्याजवळ त्यावेळी सहा हजार स्वार होते आणि त्यांची छावणी अर्काटच्या पश्चिमेला ३० मैलांवर पडलेली होती. अर्काटच्या वेढ्याचे वृत्त त्यांना समजत होते. क्लाईव्ह रझासाहेबांच्या विरुद्ध अर्काटचा किल्ला मोठ्या शर्थीने लढवत होता. पण त्यात त्याला यश येण्याची चिन्हे दिसत नव्हती. तो अगदी मेटाकुटीला आला होता. त्या प्रसंगीचे सविस्तर वर्णन सर फिलीप्स गिब याने आपल्या इतिहास ग्रंथात केलेले अहे. त्यात त्याने क्लाईव्हने मुराररावांना कसे मदतीला बोलावले आणि मुराररावांनीही क्लाईव्हला तेवढ्याच तत्परतेने कशी कुमक दिली यासंबंधी माहिती दिली आहे. दक्षिण भारतात इंग्रजांची सत्ता बळकट होण्याच्या मार्गावरील अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणून अर्काटच्या वेढ्याचा उल्लेख केला जातो. फ्रेंचांची पिछेहाट होऊन इंग्रजांना आपले स्थान बळकट करण्याची अत्यंत महत्त्वाची संधी अर्काटच्या वेढ्याने मिळवून दिली. क्लाइव्हसारखा मिळवू शकला, पण लष्करी डावपेचात कुशल असलेला सेनाधिकारी ते यश त्यामागे मुराररावांच्या समयोचित मदतीचा वाटा होता हे इंग्रज इतिहासकारांनाही मान्य करावे लागले, त्यावरून मुराररावांच्या त्यावेळच्या लष्करी सामर्थ्याचीही कल्पना येते..
● सर फिलीप गिबने अर्काट किल्ल्याच्या वेढ्याच्या संदर्भात खालील प्रमाणे वर्णन केले आहे :
'हा वेढा सात आठवड्यांपेक्षा अधिक काळ चालू होता. उपासमारीमुळे लोकांच्या अंगात त्राण उरले नव्हते, त्यांच्या अंगावरील कपडे फाटले होते. आणि बंदुकीची दारू व इतर मलीनतेमुळे त्यांच्या अंगाला दुर्गंधी सुटली होती. पण एवढे होऊनही त्यांचे मानसिक धैर्य मात्र कायम होते. तथापी अशा स्थितीतच वेढ्याचा पन्नासावा दिवस उजाडला आणि खाण्या पिण्याचे सर्व जिन्नस जवळ जवळ संपुष्टात आले तेव्हा मात्र क्लाईव्हला तीव्रतेने असे वाटू लागले की यानंतरही बाहेरून काहीतरी मदत आली नाही तर आपल्यावर उपासमारीने मृत्यू ओढवण्याची पाळी आल्याशिवाय रहाणार नाही. 'पण त्याच वेळी रझासाहेबाच्या दोन्ही बाजूला मुराररावांच्या नेतृत्वाखाली मराठा घोडेस्वार उभे राहून वेढ्याच्या हालचाली मोठ्या कुतुहलाने पहात होते. क्लाईव्हने मुराररावांकडे मदतीची याचना करण्यासाठी एक दूत पाठवला. मुराररावांनीही त्या शूर सेनाप्रमुखाच्या मदतीसाठी आपली तलवार उपसण्याची तयारी दर्शवली. दूतांकडून क्लाईव्हला हे समजले तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. वस्तुतः त्या रात्री क्लाईव्ह आणि त्याचे सैनिक शत्रूचा पुन्हा हल्ला होईल असेच समजत होते. पण सकाळ उजाडली आणि तेथे शत्रूचा एकही सैनिक नसल्याचे त्यांना दिसून आले. उलट पहाटेच्या त्या अंधुक प्रकाशात त्यांना मराठे घोडेस्वाराच्या अनेक रांगा उभ्या असलेल्या दिसल्या. ते घोडेस्वार मराररावांचे होते आणि क्लाईव्हच्या मदतीसाठी व त्या शूर माणसाचा सन्मान करण्यासाठी ते सज्ज होते..

No comments:
Post a Comment