One of the Greatest Diplomat Warrior Chhatrapati Shivaji Maharaj...
स्वराज्य स्थापनेच्या विश्वसनीय प्रक्रियेमध्ये शिवरायांनी राष्ट्रीय आदर्शासाठी राज्यातील अनेक गुणवान माणसांना एकत्र आणण्याचे कार्य केले. हे फक्त शिवरायांच्या प्रभावशाली व्यक्तिमत्वामुळे शक्य झाले. शिवरायांची हिच थोरवी समर्थ रामदासांनी शिवरायांना लिहिलेल्या पत्रात उत्कटपणे जाणवते. आपल्या पित्याचे अनुकरण करा असा उपदेश करताना ते लिहितात...,
राज्यामध्यें सकळ लोक । सलगी देऊन करावे सेवक।
लोकांचे मनामध्यें धाक । उपजोंचि नये ।
बहुत लोक मिळवावे । एक विचारें भरावे ।
कष्टें करोनि घसरावें । म्लेंच्छावरी ॥
माणसांची अचूकपणे पारख करून एका विश्वसनीय प्रक्रिये मध्ये त्यांना रुळवत असताना शिवरायांनी रयतेला सुद्धा सोबत घेतले. कोणताही राजा रयतेचा संपूर्ण पाठिंबा असल्याशिवाय आपले राज्यनिर्मितीचे कार्य पूर्णत्वास नेऊ शकत नाही. आणि यामुळेच शिवरायांना 'रयतेचा राजा' असे म्हटले जाते. शिवरायांचे पहिले महत्वाचे कार्य म्हणजे राज्यातील सर्व थरांतील लोकांना एकजूट करून त्यांची एकसंध समाज म्हणून निर्मिती करणे हे होते. राज्य निर्मिती मध्ये रयतेची काय जबाबदारी आहे आणि रयतेची नैतिक जबाबदारी व तत्वे काय आहेत याची जाणीव शिवरायांनी रयतेला करून दिली...
जनतेला एकत्वाने बांधणाऱ्या तत्वांना सर जदुनाथ सरकार यांनी 'सामाजिक विचारांची जीवनशैली' असे म्हटले. आज जर देशातील वेगवेगळे वर्ग आणि स्थानिक गट एकत्र करून एक राजकीय संघटना तयार करावयाची असेल तर राजा आणि त्याच्या दंडाधिकाऱ्यांना सुज्ञपणे, न्यायाने व खंबीरपणे लोकांच्या कल्याणासाठी राज्य राबवावे लागेल...
ज्या व्यक्तिच्या वडीलांची, अजोबांची, पणजोबांची उभी हयात रणांगणावर समेशर गाजवण्यात गेली. ज्यांच्या वडीलांची गणना One of the Greatest Diplomat Warrior मध्ये केली जाते. ज्यांच्या मातेला जगातील सर्वकालीन सर्वश्रेष्ठ माता असे संबोधले जाते. त्या व्यक्तिला लष्करी व राजकिय कारणांसाठी दुसऱ्या एखाद्या गुरूची गरज पडली असावी असे वाटत नाही...
―――――――――――――
#इतिहासकर्ते_महराट्टे #हिंदवी_स्वराज्य
#छत्रपतीशिवाजीमहाराज #मावळे
#गडवाटप्रवाससह्याद्रीचा #मराठा

No comments:
Post a Comment