विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 18 July 2026

बाप्पा रावळ

 पाकिस्तानातील रावळपिंडी ह्या शहराचे नाव


बाप्पा रावळ यांच्या नावावरून ठेवण्यात आलेले आहे. या अगोदर तो गजनीचा प्रदेश म्हणून ओळखला जात असे. गजनीच्या प्रदेशात बाप्पाच्या सैनिकाची छावणी होती. तिथून ते अरबांच्या हालचालींवर ठेवत. मेवाडमध्ये यांना बापा म्हणूनही ओळखले जाते. बाप्पा रावळ अशा हिंदू राजांपैकी होते, ज्यांचे नाव ऐकताच शत्रूचे हातपाय थंड पडत असत. इसवी सन ७३४मध्ये जेव्हा भारतावर अरबांनी आक्रमण केले, तेव्हा भारतातील राजस्थानात बाप्पा रावळ हा वीर योद्धा जन्मास आला. त्यांनी अरबांना धूळ चारून हाकलवून लावले. बाप्पाची दहशत एवढी होती की, त्यानंतर ४०० वर्षं मुस्लिम आक्रमकांनी भारताकडे डोळे उचलूनसुध्दा बघितले नाही.

मोहम्मद बिन कासीमने सातव्या तर गझनीच्या मोहम्मदाने अकराव्या शतकात भारतावर हल्ला केला. मग प्रश्न असा की मधली तीनशे वर्षं भारतावर अरबी, तुर्की किंवा कोणतेही मुस्लिम आक्रमण का झाले नाही? याचे प्रमुख श्रेय जाते बाप्पा रावळ यांना. याच काळात इतरही अनेक विचारी, पराक्रमी राजे भारतात होऊन गेले. काश्मीरचे ललितादित्य असोत किंवा चालुक्यचे विक्रमादित्य. नागभट्ट यशोवर्मन यांनी ह्या काळात अरबी आक्रमण रोखले आणि उलट प्रहार केला.
युरोपात हाच काळ देदिप्यमान म्हणून साजरा करतात (The Battle of Tours — 732 AD).पण अशाच पराक्रमी पर्वाची भारतात मात्र जाणीवही नाही.
प्रत्येक शतकात अशी काही माणसे होऊन गेली ज्यांनी आपला धर्म आणि स्वाभिमान जपला. शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे भारताचे रक्षण केले, त्याप्रमाणेच बाप्पा रावळ यांनी ७व्या शतकात मुस्लिम आक्रमणापासून भारतचा बचाव केला. भारताच्या इतिहासात अनेक असे राजे महाराजे होऊन गेलेले आहेत ज्यांच्याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. इतिहासातून यांचे नाव पुसट झालेले आहे. परंतु आजही पाकिस्तानातील रावळपिंडी शहराचे नाव निघाल्यास आठवण येते त्या हिंदू राजाची, ज्याचे नाव ऐकून मुघल थरथर कापायचे : बाप्पा रावळ!
बाप्पा हा चित्तोडच्या मोरी राजाचा मांडलिक होता. रावळ म्हणजे लहानसा राजा, उदेपूरच्या उत्तरेस नागदा (पूर्वीचे नाग-हद) नामक जे लहानसे गांव आहे, तेथे बाप्पा राबळ राज्य करीत असे; व अरवली पर्वताच्या दर्याखोर्यांवर व तेथे राहणार्या भिल्ल वगैरे लोकांवर त्याचा अंमल असे.
बाप्पाचे वडील महेंद्र रावळ यांची शत्रूने हत्या केली होती. आईही वडिलांसोबत सती गेली. लहानपणीच आईवडिलांचे छत्र हरविल्याने बाप्पांचे पालनपोषण इतरांनी केले. बाप्पा एकलिंगजीचे मोठे भक्त होते. समस्त युध्दप्रकारात ते निपुण होते. यामुळेच बाप्पांनी त्यांच्या हरलेले राज्य २१व्या वर्षीच परत मिळविले आणि एक कुशल शासक ते जतन केले.
बाप्पा रावळ याचे लाहोरच्या आसपासच्या प्रदेशात राज्य होते. इस्लामी आक्रमणास टक्कर देण्यासाठी बाप्पा रावळ यांनीच राजपुतांची एकजूट घडवून आणली. त्यावेळी चित्तोडगडावर परमारांचे राज्य होते. बाप्पा रावळांनी परमारांचा पराभव करून चित्तोडगडावर आपले राज्य स्थापन केले. बाप्पा रावळ म्हणजे महेंद्र की कालभोज यावरही इतिहासकारांचे एकमत नाही. मात्र या बाप्पा रावळचे पालनपोषण ब्राह्मणाने केल्याचे काही इतिहासकार नमूद करतात. तसेच तो भिल्लांमध्ये वाढल्याचेही काही जणांचे मत आहे.
बाप्परावळ हा अत्यंत स्वधर्माभिमानी होता. त्याने दर्याखोर्यांत राहणार्या भिल्लांना आपलेसे केले व त्यांच्या साहाय्याने त्याने प्रथम अरबांचे हल्ले परतवले. या विजयाने बाप्पा अत्यंत विख्यात झाला आणि होता होता त्यास चित्तोडचे सार्वभौम पद प्राप्त झाले. याविषयी बर्याच अख्यायिका आहेत.
बाप्पारावळ हा दीर्घायुषी होता. त्याच्या अनेक भार्या वारल्या होत्या व त्यास संततीही बरीच झाली. तो इतका दीर्घकाळ जगला की, राज्यकारभारास कंटाळून त्याने सर्व अधिकार युवराजाच्या स्वाधीन केले व आपण शिवोपासक यति झाला.

No comments:

Post a Comment

बाजीराव पेशव्यांचे पालखेडचे युद्ध.

  इतिहासात अशी काही युद्धे आहेत ज्यांनी केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगातील लष्करी अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतले. त्यापैकी एक म्हणजे छत्रपत...