टिपूला संपवण्यात मराठ्यांचा मोठा हात होता.
टिपूला संपवून मराठ्यांना फायदा झाला कि तोटा हे मात्र अजून कळात नाही. त्याचा फायदा ब्रिटिशांना झाला. त्यांनी आधी टिपू नंतर मराठे आणि नंतर शीख संपवत आणले.
टिपू सुलतानचे दोन यश वादातीत आहे पाहिले म्हणजे रॉकेटचा शोध आणि दुसरा दूरदृष्टी कोण त्याने नेपोलियन बोनपार्टशी संपर्क केला हित इंग्रज विरुद्ध (तसे महादजी नि पण केला हि प्रयत्न)
टिपू च्या विरुद्ध जसे बोलणारे आहेत तसेच त्याच्या बाजूने बोलणारे पण आहेत.आपल्याबसरख्या कन्नड न येणाऱ्या माणसाला हे खूप विचित्र वाटते आणि कोण बरोबर ते कळत नाही.म्हणून मोठ्या मोठ्या लोकांचे टिपू सुलतान विषयी मत किंवा दाखले दिले ते मी इथे मांडतो. पण टिपू कसा होता हे उमगने कठीण आहे.टिपू चे समर्थन करणार्यानि भरपूर आरोपाचे खंडन करण्याचे प्रयत्न केले.भरपूर ब्रिटिश दस्तावेज खोटे आहेत असे सांगत आहे.तर टिपूला विरोध करणाऱ्या नि सुद्धा आरोपांक्सही राळ उठलेली.त्यात दोन्ही कडूनखुप प्रचार झाला अन लोकांच्या मनात गोंधळ उडाला.
गिरीश कर्नाड यांनी "टिपू जर हिंदू असता तर त्याला आज कर्नाटकात ज्याप्रमाणे शिवाजीस महाराष्ट्रात मान मिळतो तसा मान मिळता" अशी प्रतिक्रिया दिल असे 2015 ला बोलले होते.( सन २०१५)
टिपूच्या समर्थ करणार्यांनी त्यांना शिवाजी महाराज यांच्या रांगेत आणून बसवले ही मोठी चूक आहे.शिवाजी महाराजांच्या विरोधात आता पर्यंत त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणार्या चा एक ही पुरावा दस्तावेज ना इंग्रजांकडे लिहला गेला ना मुघल ना आदिलशाही ना कुतुबशाही.
टिपू च्या विरोधातील दस्तावेल किंवा कागदी पुरावे इंग्रजांकडे ढीगभर आहे मराठ्यांच्या कडे काही आहेत, पण त्याबवेळीच मराठे आणि इंग्रज हे टिपू चे शत्रू होत्र म्हणून त्यांनी बदनामी किंवा जनमत विरोधात राहील या भावनेने केले असे टिपू सुलतान चे समर्थक म्हणतात (मग ही बाब शिवाजी महाराजांच्या बाबतीत का लागू होत नाही? हा प्रश्न पडतो).
एक मान्य की टिपू च्या बाबतीत खूप इतिहासकार टोकाची आणि विरुद्ध बाजू घेतात.त्यामुळे मी इथे फक्त दोन्ही पक्षाची बाजू लिहीन.खरे काय खोटे काय कोणालाच नक्की उमजत नाही.
मुळात हा वाद आहे दोन पक्षाच्या समर्थक चा …एक पक्षाने आता पर्यंत धर्मनिरपेक्षततेच्या नावाखाली कित्येक ऐतिहासिक व्यक्तींची कट-कारस्थाने, नरसंहार आणि अत्याचार दडपून ठेवले हे जितकं खरं! तितकंच दुसऱ्या पक्षाने धर्म पुर्नस्थापनेच्या नावाखाली काही ऐतिहासिक व्यक्तींच्या शिरावर नसलेली कट-कारस्थाने, नरसंहार आणि अत्याचार चढवले हे देखील तितकंच खरं आहे.
मुळात टिपू सुलतान वर जे जे आरोप झाले म्हणजे खालील प्रमाणे यानि त्याला उत्तर दिले पण असे.खरे काय न खोटे काय देवाला माहीत.
१. आरोप
१० नोव्हेंबर रोजी टिपूने ७०० मेलकोट अय्यंगार ब्राह्मणांना फाशी दिली होती. १७८४ मध्ये ख्रिश्चन नेत्याने टिपूचा असहिष्णुतेचा उल्लेखही केला आहे. त्याने मंगलोरचे मिलीग्रेस चर्च पाडले. इंग्रजांचे खबरी असल्याच्या संशयावरून टिपूने ६० हून अधिक कॅथलिकांना ताब्यात घेतले होते आणि त्यांना म्हैसूरला चालत जाण्यास भाग पाडले होते .
खंडन
याचे खंडन करताना टिपू चे पाठीराखे म्हणतात की मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक आणि इतिहाससंशोधक संजय सोनवणींनी नोंदलेली ही माहिती , सोनवणी लिहितात, ‘‘टिपूने ७०० अय्यंगारांना दिवाळीच्या दिवशी मारले असे मानले जाते. खरे तर इतिहासात कोठेही ही घटनेची नोंद नाही. डॉ. एम.ए.जयश्री व डॉ. एम.ए. नरसिंहन यांनी अलिकडेच एक पेपर प्रसिद्ध करून ज्याला इतिहासात कोठेही स्थान मिळालेले नाही. याबाबत इतिहासात कसलाही पुरावा नाही. हे प्रकरण दडवले गेले असाही आरोप आहे. आपण तरीही घटकाभर हे प्रकरण खरेमानू. टिपूचा जन्म १७५०सालचा, वरील घटना १७६० किंवा १७६१ ची. म्हणजे ही घटना घडली तेव्हा टिपू १०-११ वर्षांचा होता. हे हत्याकांड त्याने कसे केले?
२. आरोप
टिपू सुलतानने तामिळनाडू आणि केरळवर अनेक वेळा हल्ला केला आणि हल्ला करताना पकडलेल्या लोकांचे मोठ्या संख्येने धर्मांतर केले. १९ जानेवारी १७९० मध्ये, बुंदुजझन खान नावाच्या व्यक्तीला एक पत्र लिहिले. त्यात टिपू सुलतान म्हणतो, “तुम्हाला माहित आहे का? मी नुकताच मलबारवर विजय मिळवला आहे आणि जबरदस्तीने चार लाखाहून अधिक हिंदूंना इस्लाममध्ये धर्मांतरित केले आहे?”
१९ व्या शतकात ब्रिटीश अधिकारी लोगॉन याने ‘मालाबार मॅन्युएल’ मध्ये लिहिले आहे की कसा टिपू सुलतानने त्याच्या 30 हजार सैनिकांनिशी कालिकतमध्ये आतंक माजवला आणि १७८८ मध्ये टिपू सुलतानाच्या सैन्याने कूर्गवर आक्रमण करून परिसरातील सर्व गावे जाळून टाकली.
फ्रीडम स्ट्रगल ऑफ केरळ’मध्ये ५ लाख हिंदूंना मुसलमान बनवलयाचा उल्लेख आहे.
लेविस बी बाऊरी ने टिपू सुलतानाच्या हिंदूंवरील क्रौर्याची तुलना मुहम्मद गझनी आणि नादिरशहाच्या क्रौर्याशी केली.
खंडन
याचे खंडन करताना टिपू चे पाठीराखे म्हणतात की या वरील आरोपाची म्हैसूर गॅझेटियर’चा संदर्भ दिला जातो. पण संदर्भ ‘म्हैसूर गॅझेटियर’मध्ये कुठेही आढळत नाहीत. मग हे संदर्भ येतात कुठून ‘कर्नल माईल्स’च्या ‘हिस्ट्री ऑफ म्हैसूर’मधून(written by Meer Hussein Ali Khan, Kirmani. Translated from an original Persian manuscript, in the library of Her Most Gracious Majesty) कर्नल माईल्सचा दावा आहे, त्याने हे संदर्भ महाराणी व्हिक्टोरियाच्या व्यक्तिगत वाचनालयामधल्या प्राचीन फारशी साधनेतून मिळवले महारानी व्हिक्टोरियाच्या कोर्टात जेंव्हा हे आरोप गेला. तेंव्हा ही साधने उपलब्ध च नाहीत असं कळले,
टिपू एवढा धर्माणध होता तर टिपूची राजधानी श्रीरंगपट्टण येथे होती. ल्याच्या राजवाड्याच्या जवळच श्रीरंगनाथस्वामींचे खूप पुरातन देवालय आहे. या दोन्ही वास्तू आजसुद्धा पहायला मिळतात. सैतान टिपूला काफिरांच्या या देवालयाचा विध्वंस करण्याची सैतानी इच्छा का झाली नाही?
3. आरोप
सावरकर टिपूविषयी अनेक आक्षेप घेतात. टिपूची राजवट म्हणजे हिंदू-मुस्लीम महायुद्धातली, हजार वर्षातली शेवटची मुस्लीम राजवट असल्याचा दावा सावरकरांनी केला आहे.‘ सावरकर म्हणतात, ‘कोणत्याही मुस्लीम सुलतानांचे त्याच्या परंपरेनुसार जे पहिले कर्तव्य त्या काळी समजले गेले, त्याप्रमाणे टिपूने ‘सर्व काफरांना मी मुसलमान करून सोडीन’ अशी प्रतिज्ञा प्रकटपणे भरवलेल्या त्याच्या दरबारात केली आणि लगोलग त्याच्या राज्यातील सर्व हिंदूंना मुसलमान होण्याची आज्ञा केली. आपल्या गावोगावच्या मुस्लीम अधिकार्यांना लेखी कळवले की, ‘झाडून सार्या हिंदू पुरुषांना दीक्षा द्या. जे हिंदू स्वेच्छेने मुसलमान न होतील त्यांना बळाने मुसलमान करा, नाहीतर हिंदू पुरुषांना ठार करा आणि पकडून आणलेल्या हिंदू स्त्रियांना बटकी करून मुसलमानांना वाटून घ्या’. पांचजन्य’च्या लेख मध्ये असाच आरोप झालाय.
कर्नाटकमधील मराठ्यांच्या राज्यावर त्याने स्वारी केली. तेथील हिंदू स्त्री-पुरुषांना टिपूच्या अत्याचारी आक्रमणास तोंड देणे अशक्य असल्यामुळे, मुस्लिम सैन्याच्या तावडीत सापडण्या-आधीच, कृष्णा, तुनगभद्रेसारख्या नद्दांतून लहानग्या मुलांसोबत उडया घेउन जीव दिले. काही जण तर आगीत उडया टाकून भस्मसात झाले नि हा आरोप सावरकर यांनी भारतीय इतिहासाची सहा सुवर्णपणे मध्ये केली आहे.युद्धानंतर शत्रूंच्या स्त्रियांचं शोषण केल्याचाही आरोप सावरकर टिपूवर करतात.
खंडन
याचे खंडन करताना टिपू चे पाठीराखे म्हणतात -
1.नरगुंदमध्ये अशी कोणतीही घटना घडली नसताना याला भक्कम पुरावा नाही .
2.सावरकरांच्या या लेखनामुळेच त्यांच्या इतिहास-लेखनाला इतिहासकार ‘जदुनाथ सरकार’ यांनी ‘रोमँटिक इतिहासलेखन’ म्हटले होते. सावरकरांची रोमँटिक हिस्ट्री मनोरंजनापुरती मर्यादित राहिली असती, असा आरोप सरकार यांनी केला होता.ज्या दरबारात सावरकरांनी धर्मांतराचा आदेश देण्यात आल्याचं सांगितलं आहे, त्या पहिल्या दरबारात टिपूनं रयतेसाठी ‘आठ कलमी’ घोषणापत्र प्रसिद्ध केलं होतं. ‘राज्याविषयी आपण कोणती कर्तव्ये पार पाडणार आहोत’, ‘राज्य चालवण्याची आपली ध्येयधोरणं काय आहेत’, या विषयी टिपूनं आपली भूमिका त्यातून मांडली आहे
3. मोहम्मद इलियास नदवी या इतिहासकाराने खंडन करून संगीगलेला प्रसंग ‘‘रात्रीच्या वेळी झालेल्या युद्धात टिपूच्या फौजेनं आपलं रणशौर्य दाखवून दिलं. सैन्याच्या आक्रमक आघाडीपुढे पेशव्यांच्या लष्कराची वाईट अवस्था झाली. त्यांचं सैन्य जीवाच्या आकांतानं पळून गेलं. पेशव्यांच्या लष्करी छावणीतच कित्येक सैनिकांना कैद करण्यात आलं. सकाळी शत्रूंच्या सैनिकी छावणीतील स्त्रिया आणि लहान मुलांना वेगळं करून स्वतंत्र मंडपात ठेवण्यात आलं. काही दिवसांनी टिपू सुलतान यांनी युद्धात हाती आलेल्या स्त्रियांचा सन्मान देऊन कपड्यांचा आहेर केला. लहान मुलांना सोन्याचं कडं भेट दिलं. आपल्या सैनिकी तुकडीच्या संरक्षणात त्यांना स्वगृही पाठवलं. त्या स्त्रियांनी हरिपंत फडके यांस टिपू सुलताननं आपल्याला कशा रीतीनं वागवले याची हकीगत सांगितली.”
(मूळ मुद्दा त्यानंतर सावरकरांनी ‘ पुराव्यांसाठी खरे, पारसनीस, सरदेसाई आणि या इतिहासकारांच्या दाखल घेतलाय, ते इतिहासकार आता नाहीत ,त्याचा काय?.)
4. आरोप
मराठी रियासती’च्या सातव्या खंडात ते म्हणतात. ‘‘१७८४ च्या पावसाळ्यात नानाने महादजीस लिहिले. टिपूची चाल ठीक नाही. उजम (गर्व) भारी आहे. वर्तणूक मनस्वी क्षेत्र चांगले नाही. अलिकडे नूर महंमद खानास (सलतनत इ खुदादचा पुणे दरबारातील वकील) टिपूचे पत्र आले की, एके दिवशी पन्नास हजार हिंदू बायकामुले सुद्धा बाटवून मुसलमान केले, अशी गोष्ट ती म्हणे. पूर्वी पातशहा वजीर मोठमोठे झाले. परंतु जाली नाही ती खुदाचे फज्ले करून झाली. नवाबाच्या लष्करात टिपूचे वकील आहेत. त्यासही त्याने असेच लिहिले. सवंत्सर व महिने यांची नावे सोडून नवी केली. पुढेही गावचे गाव बाटवत चालला आहे. यास्तव हरीपंत त्यावर सुरापूर पावेतो गेले. इतक्यात मुंबईकरांचे पत्र टिपूचा तह झाला म्हणोन आले. त्यावरून मजबूद मनसुबा केल्याखेरीत टिपूचे तालुक्यात उपद्रव करू नये.” असे हरिपंतास नानाने लिहून ठेवले.
खंडन
याचे खंडन करताना टिपू चे पाठीराखे म्हणतात की या पत्राद्वारे महादजीला टिपू सुलतान यांच्याविरोधात भडकवण्याचा व लष्करी सहाय्य मिळवण्याचा नाना फडणवीसाचा हेतू दिसतो . त्यामुळे महादजीच्या धार्मिक पुळका येईल नि महादजी आपल्या मदतीला उभा राहील असे नानाला वाटले असेल. त्यामुळे नानानं अशी अवास्तव माहिती पत्रातून दिली होती.यानइ तो आपल्या वकिलाला पत्र पाठवून ही गोष्ट सांगत आहे याच्यावर विश्वास नाही .
(महादजी नाना फडणवीस च्या शब्दावर विश्वास ठेवून आले असते काय?)
5. टिपूच्या पाठीराखे म्हणतात की टिपू सुलतानने महिलांना कंबरेच्यावर कपडे घालण्याचा अधिकार दिला होता.
पण दलित महिलांना कंबरेच्यावर कपडे घालण्याचा अधिकार टिपू सुलतानने नाही तर, ब्रिटिशांमुळे 1859 साली त्रावणकोर संस्थानाकडून मिळाला. टिपू सुलतान हा म्हैसुर साम्राज्याचा राजा होता. त्याचा मृत्यू 1799 सालीच झाला.
ब्रिटिश, मराठे आणि निझाम अशी सर्व मिळून एकूण ५०,००० ची फौज घेऊन हे एकत्रित सैन्य श्रीरंगपट्टणमला वेढा देऊन लढाईला सज्ज झाले. याउलट टिपू सुलतान यांचे सैन्य जवळपास ३०,००० इतकेच होते. पण इंग्रजांना भीती होती ती टिपू च्या रॉकेटची. टिपू सुलतानच्या सैन्याची हि रॉकेट्स साधारण २ किलोमीटर पर्यंत असलेले लक्ष्य सहज भेदू शकेल इतकी सक्षम होती.
टिपू सुलतानाची ही वैश्विक राजकारणाची जाण म्हणजे नेपोलियन बोनपार्टशी केलेले संधान आणि आधुनिकतेची कास म्हणजे रॉकेट चा शोध हे इंग्रजांना नेहमी खटकत असे. ब्रिटिशांना पुणे, हैदराबाद आणि म्हैसूर संपवायचे होते.
No comments:
Post a Comment